Breaking
ब्रेकिंग

काका कोयटे यांच्या वाढदिवसानिमित्त ७५ रक्तदात्यांचे रक्तदान

0 0 5 6 1 3

काका कोयटे यांच्या वाढदिवसानिमित्त ७५ रक्तदात्यांचे रक्तदान

कोपरगाव : समता परिवाराचे संस्थापक ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत २३ सप्टेंबर रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. गेल्या १३ वर्षांपासून काका कोयटे यांच्या वाढदिवसानिमित्त २३ सप्टेंबर रोजी रक्तदान शिबिर आयोजित करण्याची परंपरा याही वर्षी कायम ठेवण्यात आली. समता परिवाराचे सदस्य संदीप कोयटे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम दरवर्षी आयोजित केला जातो.

समता चॅरिटेबल ट्रस्टच्या पुढाकाराने लायन्स क्लब ऑफ कोपरगाव, लिओ क्लब ऑफ कोपरगाव, लिंगायत संघर्ष समिती, कोपरगाव तालुका किराणा मर्चंट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने समता पतसंस्थेच्या समता सभागृहात हे रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न झाले.

याप्रसंगी समता चॅरिटेबल ट्रस्ट, समता पतसंस्था, समता इंटरनॅशनल स्कूल, तालुका किराणा मर्चंट असोसिएशन, लायन्स क्लब ऑफ कोपरगाव, लिओ क्लब ऑफ कोपरगाव आणि लिंगायत संघर्ष समिती पदाधिकाऱ्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून शिबिराची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर लायन्स क्लब ऑफ कोपरगावचे संदीप राशिनकर व सौ. शिला संदीप राशिनकर यांनी रक्तदान करून शिबिरास प्रत्यक्ष सुरुवात केली.

रक्तदान हे केवळ सामाजिक कर्तव्य नसून एखाद्या गरजू व्यक्तीच्या आयुष्यात आशेचा किरण निर्माण करणारे मानवतेचे कार्य आहे. “आपले रक्तदान – कोणासाठी तरी जीवदान” या भावनेतून काका कोयटे यांच्या वाढदिवसानिमित्त हा समाजोपयोगी उपक्रम सातत्याने राबविला जात आहे.

यंदा ७५ रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. समता परिवाराशी संलग्न असलेल्या समता इंटरनॅशनल स्कूल, समता पतसंस्था, समता चॅरिटेबल ट्रस्ट, सुधन गोल्ड लोन आणि स्व. दादाप्पा खंडाप्पा कोयटे विद्यालयातील अधिकारी, कर्मचारी तसेच हितचिंतकांनी या उपक्रमात सहभाग नोंदविला.

यावेळी समता पतसंस्थेचे संचालक कचरू मोकळ, दीपक अग्रवाल, गिरीश सोनेकर, लायन्स क्लब ऑफ कोपरगावचे अध्यक्ष सचिन भडकवाडे, किरण शिरोडे, सुमित भट्टड, माजी अध्यक्ष अक्षय गिरमे, राजेश ठोळे, राजेंद्र शिरोडे, आनंद लोढा, अभिनंदन शिंगी, बाळासाहेब ज्युरी, व्यापारी महासंघाचे कार्याध्यक्ष सुधीर डागा, खजिनदार तुलसीदास खुबानी, सचिव प्रदीप साखरे, लिओ क्लब कोपरगावचे अध्यक्ष करण शहा, सम्यक फुलफगर, धीरज कराचीवाला, मानस नागरे आदींसह आयोजित संस्थांचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

रक्तदान शिबिरासाठी लायन्स समता ब्लड सेंटरचे संचालक डॉ. इरफान खान, टेक्निकल सुपरवायझर अशर शेख, टेक्निशियन गिरीश जाधव, उज्वला आहेर, आकांक्षा, तेजस्विनी, हबीब शेख व सागर बागुल यांचे सहकार्य लाभले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 5 6 1 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे