संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालय आयएसटीई कडून ग्रामीण महाराष्ट्रातील एकमेव ‘बेस्ट कॉलेज अवार्ड-२०२३’ ने सन्मानित
संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालय आयएसटीई कडून ग्रामीण महाराष्ट्रातील एकमेव ‘बेस्ट कॉलेज अवार्ड-२०२३’ ने सन्मानित
आग न्यूज पोर्टल नेटवर्क
कोपरगांव :— संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाला इंडियन सोसायटी फॉर टेक्निकल एज्युकेशन (आयएसटीई) (महाराष्ट्र -गोवा क्षेत्र) या संस्थेने वेगवेगळ्याा निकषांच्या आधारे ग्रामीण महाराष्ट्रातील एकमेव महाविद्यालय म्हणून ‘बेस्ट कॉलेज अवार्ड-२०२३’ या पुरस्कारने गौरविले.
छत्रपती संभाजीनगर येथे एका शानदार सोहळ्यात महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षणालयाचे संचालक डॉ.व्ही. एम. मोहितकर व डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेक्निकल युनिर्व्हसिटी, लोनेरेच उपकुलगुरू प्रा. के. व्ही. काळे यांचे हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. हा पुरस्कार प्राप्त करणारे संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालय हे ग्रामिण महाराश्ट्रातील एकमेव महाविद्यालय असुन या पुरस्काराने संजीवनीच्या शिरपेचात अधिकचा एक मानाचा तुुरा खोवला गेला असल्याने या
इलेक्ट्रॉनिक्स अँड कॉम्प्युटर इजिनिअरींगचे विभाग प्रमुख डॉ. बी. एस. आगरकर व संजीवनी विध्यार्थी विकास विभागाचे डीन डॉ. मकरंद कुलकर्णी यांनी
आयएसटीई, नवी दिल्लीचे प्रेसिडेंट डॉ. प्रतापसिंह देसाई, आयएसटीई, महाराष्ट्र -गोवा विभागाचे चेअरमन डॉ. रणजित सावंत, आयएसटीई, महाराष्ट्र -गोवा विभागाचे सेक्रेटरी डॉ. के.पी. कुंभार व छ. संभाजीनगर येथिल छ. शाहू महाराज कॉलेज ऑफ इंजिनिअरींगचे प्रशासकिय अधिकारी डॉ. एस.जी. देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार स्वीकारला. आयएसटीई ही आपल्या देशातील तंत्रशिक्षण प्रणालीसाठी प्रमुख राष्ट्रीय संस्था आहे. ही संस्था विध्यार्थी व शिक्षकांचा तंत्रशिक्षणाचा विकास करते. या संस्थेमार्फत शहरी व ग्रामिण भागातील प्रत्येकी एक अभियांत्रिकी महाविद्यालयाला पुरस्कार दिला जातो.
संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागामार्फत विध्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या नामांकित कंपन्यामधिल नोकऱ्या , देशातील कंपन्या तसेच परदेशी विद्यापीठांबरोबर केलेले सामंजस्य करार, इतर मिळालेले पुरस्कार, विध्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाठी राबविण्यात येणारे विविध उपक्रम, शिक्षकांसाठीच्या कार्यशाळा, संस्थेला मिळालेला स्वायत्त दर्जा, विविध स्पर्धांमध्ये शिक्षक व विध्यार्थ्यांचा सहभाग व मिळविलेले नैपुण्य, विध्यार्थ्यांसाठी असलेल्या सोयी सुविधा, महाविद्यालयाच्या प्रयोगशाळांमधिल आधुनिक साहित्य, आदी अनेक बाबी पुरस्कारासाठी ग्राह्य धरण्यात आल्या.
संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे अध्यक्ष श्री नितिन कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी श्री अमित कोल्हे व विश्वस्त श्री सुमित कोल्हे यांनी या उपलब्धीबाबत समाधान व्यक्त केले असुन महाविद्यालयाचे संचालक डॉ. ए. जी. ठाकुर, सर्व विभाग प्रमुख, सर्व विभागाचे डीन व प्राद्यापकांचे अभिनंदन केले आहे.
संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयास आयएसटीई कडून बेस्ट कॉलेज आवार्ड-२०२३ पुरस्कार मिळाला. महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षणालयाचे संचालक डॉ.व्ही. एम. मोहितकर व डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेक्निकल युनिर्व्हसिटी, लोनेरेच उपकुलगुरू प्रा. के. व्ही. काळे यांचे हस्ते हा पुरस्कार स्वीकारताना डॉ. आगरकर व डॉ. कुलकर्णी.