Breaking
ब्रेकिंग

संजीवनी पाॅलीटेक्निकचे विभागीय पातळीवर विविध क्रीडा सपर्धांमध्ये राज्य पातळीवर निवड

0 0 1 9 4 7

संजीवनी पाॅलीटेक्निकचे विभागीय पातळीवर विविध क्रीडा सपर्धांमध्ये राज्य पातळीवर निवड

🔥 आग न्युज पोर्टल नेटवर्क

कोपरगांव : महाराष्ट्र शासन पुरस्कृत इंटर इंजिनिअरींग डीप्लोमा स्टुडंटस् स्पोर्टस् असोसिएशन आयोजीत अहमदनगर जिल्ह्यातील (ई १ झोन) विविध पाॅलीटेक्निकस् व डी. फार्मसी संस्थांमधिल खेळाडूंच्या जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी स्पर्धा घेण्यात आल्या. यात संजीवनी के.बी.पी. पाॅलीटेक्निकच्या व्हाॅलीबाॅल, बास्केटबाॅल, बॅडमिंटन, टेबलटेनिस, भाला फेक, धावणे, बुध्दिबळ, कॅरम, इत्यादी स्पर्धांमध्ये प्रथम क्रमांक मिळवुन संजीवनी पाॅलीटेक्निक हे शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच क्रीडा क्षेत्रातही जिल्ह्याात अव्वल असल्याचे सिध्द केले.

आता सर्व खेळाडू राज्यस्तरीय स्पर्धांसाठी सज्ज झाले आहेत, अशी माहिती कार्यकारी विश्वस्त अमित कोल्हे यांनी दिली.


संजीवनी पाॅलीटेक्निकमध्ये घेण्यात आलेल्या ई १ झोन अंतर्गत व्हाॅलीबाॅल स्पर्धांमध्ये संजीवनीच्या मुलांच्या संघाने अशोक पाॅलीटेक्निक विरूध्द एकतर्फी विजय मिळवीला तर बास्केटबाॅल संघानेही छत्रपती शिवाजी पाॅलीटेक्निक, नेप्ती, अहमदनगरच्या संघाविरूध्द विजय मिळवित थेट राज्य स्पर्धेसाठी सज्ज झाला.

तसेच संजीवनीच्या बॅडमिंटन मुलांच्या संघाने गव्हर्नमेंट पाॅलीटेक्निक, अहमदनगर विरूध्द विजय मिळविला. टेबलटेनिस मध्ये संजीवनी पाॅलीटेक्निकच्या संघाने संजीवनी डी. फार्मसी विरूध्द विजय मिळविला. तर मुलींच्या टेबलटेनिस संघानेही परीक्रमा डी. फार्मसी, काष्टी विरूध्द विजय मिळविला. अकोले येथिल पाॅलीटेकिनक मध्ये घेण्यात आलेल्या भाला फेक स्पर्धेत संजीवनीच्या अंजली पवारने २१. ९० मीटर भाला फेकुन प्रथम क्रमांक मिळविला.

तसेच अंजली जाधव हीने २०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत बाजी मारीत राज्यस्तरीय स्पर्धेसाठी सज्ज झाली. याचबरोबर मुलांमध्ये आयुश घेगडमल यानेही २०० मीटर धावण्याच्या शर्यतीत पहिला क्रमांक मिळविला. अहमदनगर येथे झालेल्या बुध्दीबळ स्पर्धेतही संजीवनीने बाजी मारली.

मुलींच्या बास्केटबाॅल संघाने प्रवरा फार्मसी विरूध्द सामना जिंकला. काष्टी येथे घेण्यात आलेल्या वेट लिफ्टिींग स्पर्धेत संजीवनीच्या यश कांबळेने ६२ किलो वजन गटात प्रथम क्रमांक मिळविला तर दिलशाद खान याने ५० किलो वजन गटात पहिला नंबर मिळविला. अशा प्रकारे संजीवनीच्या खेळाडूंनी यशस्वीतेची लयलुट करीत राज्यस्तरीय सपर्धांसाठी सज्ज झाले आहेत.


संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे अध्यक्ष श्री नितिन कोल्हे यांनी सर्व विजयी खेळाडूंचे अभिनंदन करून त्यांना राज्यस्तरीय स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. मॅनेजिंग ट्रस्टी श्री अमित कोल्हे यांनी सर्व विजयी खेळाडूंचा छोटेखानी कार्यक्रमात सत्कार करून त्यांना पुढील सपर्धांसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी प्राचार्य ए. आर. मिरीकर, क्रीडा प्रशिक्षक श्री शिवराज पाळणे, सर्व विभाग प्रमुख, डीन व राजिस्ट्रार उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 1 9 4 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे