Breaking
ब्रेकिंग

*सर्वंधर्म आणि जातींचे मागासवर्गीय आरक्षण अखेर मृगजळ*!!!

0 0 1 1 4 1

*सर्वंधर्म आणि जातींचे मागासवर्गीय आरक्षण अखेर मृगजळ*!!!

 *अरूण आहेर* 🔥 *आग* *न्युज पोर्टल नेटवर्क* *९०९६६६४५३३* 

 *. देशातील हजारो वर्षांपासून भारतीयांचे अस्तित्व व अखंड भारत देशाची अखंडता , सामाजिक* *आर्थिक ऐक्य धोक्यात आणणारी धर्मांधता , जातीयता* *समूळ नष्ट करण्यासाठी खुद्द घटनेतच* *जातीय आधारावर आरक्षणाची दहा वर्षे कालमर्यादेत तरतूद केली .परंतु वेळोवेळी संबंधित राज्य व राष्ट्रीय पातळीवरील* *शासन, वेगवेगळ्या राजकीय – जातीय पक्ष, धार्मिक जातीय संघटनांच्या दबावाखाली कोणत्याही परिस्थितीत* *कोणत्याही स्वरूपात संबंधित धार्मिक अथवा जातीय लोक संख्येंची जनगणना धार्मिक , आर्थिक ,राजकीय मागासलेपण कोणत्याही स्वरूपात प्रत्यक्ष जागेवर अथवा व्यक्तिंची भेट न घेता वेगवेगळ्या कार्यालयात बसून मागणी करणाऱ्यां संबंधित* ‌ *धार्मिक व जातीय संघटना प्रतिनिधीसमवेत झालेल्या एकतर्फी चर्चेत दाखल केलेल्या कागद पत्रावर* *आधारित वैयक्तिक राजकीय स्वार्थापोटी धार्मिक व* *जातीय आरक्षण संबंधित कालानुरूप बदल ऩकरता बेकायदा दिले. देशात व सर्व राज्यांतील विविध मागासवर्गीय आयोगांचे शेकडो* *धार्मिक व जातीय आरक्षण अहवाल संबंधित क्षेत्रातील उच्च आणि सर्वोच्च न्यायालयात कायदेशीर कसोटीत टिकत नसल्यानेच निकालाचे प्रतिक्षेत आहे तर कित्येक कायद्याच्या चौकटीत न बसल्याने फेटाळले गेले आहे. दुर्दैवाने या फेटाळलेल्या दाव्यांतीलअपयशी मांडणी व निकालाचे शासन, संबंधित गरजू नागरिक व जातीय संघटनांनी कोणत्याही स्वरूपात आत्मपरीक्षण आणि आपल्या मांडणीतील कमतरता न शोधल्या नाही केवळ न्यायव्यवस्थेवर खापर फोडून जनतेची दिशाभूल करणारी खेळी करण्यात धन्यता मानली आहे . यामुळे आज ह्या समस्येने उग्र रूप धारण केले आहे*.

          *याच कसोटीवर सन 1950 दरम्यान आरक्षण यादीत समाविष्ट असलेल्या शेकडो दुर्बल व गरजु जाती गेल्या साठ वर्षांत* *आरक्षण यादीतून वगळण्यात आल्या तर बलवान जातींचा समावेश करण्यात* *आला. अशा परिस्थितीत आपले अपयश झाकण्यासाठी आज जिवघेण्या महागाईत,जातीय संघर्ष वणवा विविध राजकीय, जातीय पक्ष- संघटनांकडून तेल ओतून पेटविला जात आहेत हा वणवा सर्व भारतीयांनी* *सामाजिक बांधिलकीतून एकदिलाने संघटीत होऊन या क्षणी विझवला नाही तर देशाचे अस्तित्व* *धोक्यात आले शिवाय रहाणार नाही.या स़ंघर्षात केंद्र व राज्य शासनाच्या* *सवलतींचा लाभ घेण्यासाठी* *कोण कोण जिवंत राहील की नाही हे कोणीच सांगू* *शकतो* *का ?* 

       *या संकटातून बाहेर पडण्यासाठी देशपातळीवर सर्व धर्म,जातींचे आर्थिक, राजकीय ,सामाजिक मागासलेपणाचे सर्व्हेक्षण, परिक्षण माध्यमातून आर्थिक निकर्षावर सर्व राज्यांतील उच्च व सर्वोच्च न्यायालयाच्या कायदेशीर कसोटीत टिकणारे सर्वं प्रकारचें आरक्षण लागू करण्यामध्ये हित आहे परंतु सर्वच राजकारणी , धार्मिक ,जातीय स्वार्थांध हेच याला मोठे* *अडसर आहे . राजकीय स्वार्थ, धर्मांधता,जातीयवादी* *संघर्ष* *हीच ह्यांची रोजीरोटी व धंदा असल्याने हे होऊच देणार* *नाही* 

*सर्वात महत्त्वाचे म्हणजे या धार्मिक , जातीय आरक्षण संघर्षांत कोणीच समाधानी होऊ शकणार नाही. घटनेतील तरतुदीनुसार केंद्र व राज्य शासन, न्यायालये बांधील असल्याने सर्व पातळ्यांवर जनतेला सहजपणे उपलब्ध सवलती – लाभ आपल्याच म्हणण्यानुसार कोणासही मिळणार नाही. तसेच हे कोणीच मान्य करण्याचे मानसिकतेत नाही . याकरिता ह्या समस्या कायमच्या सोडविण्यासाठी सर्व भारतीय जनतेने देशाचे सार्वभौमत्व, अखंडता,सामाजिक, धार्मिक आर्थिक विकासात्मक ऐक्य अबाधित राखण्यासाठी समान नागरी कायद्यानुसार केवळआर्थिक निकर्षावर धार्मिक व जातीयतेला तिलांजली देऊन अति मागास, मध्यम मागास , किमान मागासप्रवर्गांची व संबंधित मागासप्रवर्गांचे स्वतंत्र अनुसूचित जाती जमाती व इतर मागासप्रवर्ग आयोग धर्तीवर स्थापना निर्मिती करण्यातच भारत देशाचे हित आहे.* 

  *या संकटातून बाहेर पडण्यासाठी देशपातळीवर सातव्या जनगणना सर्व्हेक्षण मोहिमेतच सर्व पातळ्यांवर सर्वं प्रकारच्या धार्मिक व जातीय नागरिकांचे* *आर्थिक , सामाजिक आणि राजकीय मागासलेपणाचे सर्व्हेक्षण प्रत्यक्ष व्यक्ती व संबंधित प्रदेश व परिसर पहाणी करण्यासाठी नविन अनुसूचित जाती – जमाती व इतर मागासप्रवर्ग धर्तीवर केवळ आर्थिक वेगवेगळे स्वतंत्र दहा वर्षे मुदतीच्या मागासआयोगांची स्थापना करुन कायद्याच्या चौकटीत व कसोटीला सिध्द होणारे मागासलेपणाचे अहवाल तयार करण्यासाठी प्रत्येक समाज संघटनांनी आपले कायदेशीर मागासलेपण सिध्द करण्यासाठी प्रत्येक धार्मिक व जातीय समाज संघटनांनीसंघटीत व्हावे* *याशिवाय अन्य कुठल्याही स्वरूपाचा पर्याय शिल्लक राहिला नाही.हे निश्चित !* *अशा परिस्थितीत ही परिस्थिती कायम असल्यानेच* *केंद्र व राज्य शासनावर कायमस्वरूपी दबाव आणून भारतीय अखंडता घट्ट* *ठेवण्यासाठी संघटीत व्हावे हीच जनता जनार्दन चरणी प्रार्थना !!!* 

     :- *अरुण आहेर 🔥 आग* न्युज ९०९६६६४५३३*

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 1 1 4 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे