शिक्षण हेच मानवी विकास क्रांतीचे जनक —- प्राचार्य डॉ बी . एस. यादव
शिक्षण हेच मानवी विकास क्रांतीचे जनक —- प्राचार्य डॉ बी . एस. यादव
🔥 आग न्यूज पोर्टल नेटवर्क
कोपरगांव —
केवळ शिक्षणाच्या बळावर मानव सर्वार्थाने श्रेष्ठ अजिंक्य ठरला आहे. कोणत्याही स्वरूपात शिक्षण घ्यावयाचे असेल तर परिश्रमी पाठ्यक्रमाशिवाय पर्याय नाही. नवीन नवीन जडणघडणीत ही बदलत्या परिस्थितीनूसार या पाठ्यक्रमात अत्याधुनिक तंत्रज्ञान व माहितीच्या मदतीने बदल करण्यात के. जे सोमय्या महाविद्यालय व के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालय आघाडीवर असल्याने दर्जेदार उच्च शिक्षण देण्यात यशस्वी ठरले आहे.
हिंदी ही राष्ट्रभाषा म्हणून के. जे सौमय्या महाविद्यालयाने विशेष अभ्यासक्रम , उपक्रम राबविण्यात भर देत आहेत असे प्रतिपादन कोपरगांव तालुका एज्युकेशन सोसायटी संचलित के.जे. सोमैया (वरिष्ठ) व के.बी.रोहमारे (कनिष्ठ)
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एस यादव यांनी केले
कोपरगांव तालुका एज्युकेशन सोसायटीचे के. जे. सोमय्या महाविद्यालय व के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालय,
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, हिंदी अभ्यास मंडळ व महाविद्यालयातील हिंदी विभागाच्या संयुक्त विद्यमाने ‘हिंदी पाठ्यक्रम निर्मिती’ या विषयावर एकदिवशीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यावेळी अध्यक्ष पदावरून प्राचार्य डॉ बी एस यादव बोलत होते.
या कार्यशाळेचे उद्घाटन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हिंदी अभ्यास मंडळाचे समन्वयक प्रो.(डॉ) सदानंद भोसले, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हिंदी विभागप्रमुख प्रो. (डॉ) विजयकुमार रोडे, डॉ. पुरुषोत्तम कुंदे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.एस.यादव व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हिंदी अभ्यास मंडळाच्या सर्व सदस्यांच्या हस्ते संपन्न झाले. कार्यशाळेच्या उद्घाटन सत्रात प्रो.(डॉ) सदानंद भोसले यांनी नवीन शैक्षणिक धोरण व हिंदी पाठ्यक्रम निर्मिती यावर मार्गदर्शन करतांना पाठ्यक्रम निर्मिती ही विद्यार्थी व रोजगारकेंद्रित असणे आवश्यक असल्याचे नमूद केले. प्रो. (डॉ) विजयकुमार रोडे यांनी आपल्या मनोगतात हिंदी भाषा, साहित्य व समाज यांचा सहसंबंध नमूद करतानांच
पाठ्यक्रम हा विद्यार्थ्यांची संशोधन दृष्टि वाढविणारी असल्याचे नमूद केले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एस. यादव यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हिंदी अभ्यास मंडळाने आयोजित केलेल्या पाठ्यक्रम निर्मिती कार्यशाळेचे कौतुक करतांना हिंदी विभागाने प्रायोगिक तत्त्वावर आधारित बनविलेल्या अभ्यासक्रमाचा फायदा विद्यार्थ्यांना निश्चित होईल असे म्हटले. कार्यशाळेच्या दोनही सत्रात डॉ.पुरुषोत्तम कुंदे, प्रो. बाळासाहेब सोनवणे, प्रो. नानासाहेब जावळे, डॉ. वैशाली खेडकर, डॉ. अनंत केदारे या अभ्यास मंडळातील सदस्यांनी बनविलेल्या हिंदी अभ्यासक्रमाचे प्रस्तुतिकरण करतांनाच उपस्थित प्राध्यापकांच्या शंकेचे निरसन केले तसेच प्राध्यापकांच्या वतीने आलेल्या सूचनांचा समावेश अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात येणार असल्याचे सांगितले. या कार्यशाळेचे प्रास्ताविक प्रो. जिभाऊ मोरे तर उपस्थित मान्यवरांचा परिचय डॉ. संजय दवंगे यांनी करून दिला.
कार्यशाळेच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.श्रध्दा सिनगर यांनी तर आभार प्रा. जयश्री ठोकळे यांनी केले. कार्यशाळा यशस्वीतेसाठी रजिस्ट्रार डॉ.अभिजित नाईकवाडे, प्रा.किरण सोळसे, श्री.संजय पाचोरे, श्री. संजय वेताळ यांनी विशेष परिश्रम घेतले. हिंदी अभ्यास मंडळाच्या वतीने आयोजित या कार्यशाळेसाठी अहमदनगर व नाशिक जिल्हातील हिंदी विषयाच्या बहुसंख्य प्राध्यापकांचा लक्षणीय प्रतिसाद होता.
महाविद्यालयात आयोजित झालेल्या हिंदी पाठ्यक्रम निर्मिती कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनाबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा. अशोकराव रोहमारे, सचिव मा. ॲड.संजीव कुलकर्णी, विश्वस्त मा. संदीपराव रोहमारे, प्राचार्य डॉ. बी. एस. यादव यांनी हिंदी विभागाचे अभिनंदन केले.