आमदार आशुतोष काळें मराठा आरक्षण देण्याशी सहमत
आमदार आशुतोष काळें मराठा आरक्षण देण्याशी सहमत
🔥 आग न्युज पोर्टल नेटवर्क
कोपरगांव. —- मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी उपोषण करणारे मा.श्री. मनोजजी जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी कोपरगाव येथे सुरु असलेल्या मराठा समाजाच्या साखळी उपोषणाला आमदार मा.श्री. आशुतोष काळे यांनी भेट देऊन पाठींबा दिला
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी हिवाळी अधिवेशनात आमदारांनी बाजू मांडली असून सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सकारात्मक आहे असे आश्वासन यावेळी आमदार मा.श्री. आशुतोष काळे यांनी उपोषणकर्त्यांना दिले.
यावेळी आंदोलनकर्ते विमलताई पुंड, विनाताई भगत, सुनिताताई नरोडे, संगीताताई नरोडे, कमलताई नरोडे, चंद्रकलाताई नरोडे, मधुमीताताई निळेकर, उमाताई वहाडणे, सुवर्णाताई दरपेल, शारदाताई सुराळे, माधुरीताई साळुंखे, सीमाताई नरोडे, सुनित्राताई टिळेकर, अनिल गायकवाड, विनय भगत, आदींसह महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरम बागरेचा, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कृष्णा आढाव, सोशल मीडिया सेलचे प्रदेश सरचिटणीस अशोक आव्हाटे, माजी नगरसेवक मंदार पहाडे, रमेश गवळी, दिनकर खरे, सुनील शिलेदार, बाळासाहेब रुईकर, मुकुंद इंगळे, प्रशांत वाबळे, राजेंद्र खैरनार, शुभम लासुरे, मनोज नरोडे, सचिन गवारे, शैलेश साबळे, सोमनाथ आढाव, एकनाथ गंगूले, विकास बेंद्रे, अक्षय आंग्रे, योगेश खालकर, राहुल देशपांडे, दत्ता पुंडे, प्रवीण आभाळे, अमोल आढाव, सुमित आढाव, अमोल पवार, अमोल देवकर, निलेश डांगे, विशाल निकम, विजयजी जगताप, संतोष शेजवळ, विकास आढाव, अनिरुद्ध काळे आदींसह मराठा समाजबांधव उपस्थित होते.