डोक्यावरचा विजयी फेटा म्हणजे जनसेवेच्या जबाबदारीची जाणीव– विवेकभैय्या कोल्हे

डोक्यावरचा विजयी फेटा म्हणजे जनसेवेच्या जबाबदारीची जाणीव– विवेकभैय्या कोल्हे
नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी कोपरगाव शहरातील प्रभाग क्रमांक तीन निवारा येथे संगीतमय भक्तिगीतांच्या कार्यक्रमातून नववर्षाचे स्वागत करण्यात आले.नगरपालिकेच्या निवडणुकीत लोकनियुक्त नगराध्यक्ष व नगरसेवक निवडून आल्यानंतर त्यांच्या नागरी सत्काराची सुरुवात याच प्रभागातून करण्यात आली. हा केवळ सत्कार नसून विकासाच्या गंगेची सुरुवात याच प्रभागातून होत आहे. नगरसेवक पदाचे सर्व उमेदवार व नगराध्यक्षांचा सत्कार करून नागरिकांनी त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून दिली असून, हा विश्वास सार्थ ठरेल असा विकास होईल. ३० नगरसेवक पदाचे आणि नगराध्यक्ष पराग संधान हे पूर्वीही जनतेच्या सेवेत होते, आणि इथून पुढे सत्तेत आल्यामुळे दुपटीने जनतेच्या सेवेत उतरणार असल्याचे प्रतिपादन युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांनी केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी कालच भेट झाली असून त्यांनी विश्वासनामा पूर्णत्वास जाण्यासाठी लागणारी सर्व ताकद देणार असल्याचे पुन्हा सूतोवाच केले आहे आणि येत्या काळात महानगरपालिका निवडणुकीची व्यस्तता संपली की मुख्यमंत्री महोदय पुन्हा कोपरगावला येणार असल्याचे कोल्हे यांनी यावेळी जाहीर केले.

यावेळी संजीवनी महिला बचत गटाच्या अध्यक्षा रेणुकाताई कोल्हे म्हणाल्या की, कोपरगाव नगरपालिकेची निवडणूक तब्बल नऊ वर्षांनी झाली. या काळात प्रभाग क्रमांक तीनमध्ये झालेला विकास मा. आ.स्नेहलताताई कोल्हे व कोल्हे परिवाराच्या माध्यमातूनच झाला आहे. रस्ते, पेव्हर ब्लॉक, स्ट्रीट लाईट, हायमास्ट दिवे यासह झालेली सर्व विकासकामे कोल्हे परिवाराच्या प्रयत्नांतूनच झाली असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.रेणुकाताई कोल्हे पुढे म्हणाल्या की, “निवाऱ्यात आले की माहेरी आल्यासारखे वाटते. येथील प्रत्येक घराशी माझा ऋणानुबंध कुटुंबाप्रमाणे या झाला आहे. हा प्रभाग माझ्यासाठी माहेर आहे. निवडणूक जिंकल्यानंतर मी येथे कार्यालय सुरू करणार असून, पुढील पाच वर्षे माझे वैयक्तिक लक्ष प्रभाग क्रमांक तीनवर राहील.” असे म्हणाले होते त्या प्रमाणे लवकरच येथे कार्यालय सुरू करणार असल्याचे त्या म्हणाल्या.नगराध्यक्ष पराग संधान तसेच या प्रभागात पल्लवी दडियाल व मयूर गायकवाड यांच्या माध्यमातून सर्व विकासकामे पूर्ण केली जातील, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

भाजप, आरपीआय मित्रपक्ष लोकसेवा आघाडीचे लोकनियुक्त नगराध्यक्ष पराग संधान तसेच नवनिर्वाचित नगरसेवकांचा नागरी सत्कार गुरुवार (दि. १) रोजी सप्तश्रृंगी माता मंदिर परिसरात उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रविकाका बोरावके होते. यावेळी ‘गौरव महाराष्ट्राचा’ फेम विजेते राहुल खरे यांच्या सुरेल आवाजातील भजन संध्येमुळे परिसर भक्तीमय झाला होता.
नूतन नगराध्यक्ष पराग संधान म्हणाले की, काहींना प्रभाग क्रमांक तीन हा त्यांचा बालेकिल्ला वाटत होता. मात्र युवानेते विवेकभैय्या कोल्हे व रेणुकाताई कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ३० नगरसेवकांसह संपूर्ण नगरपालिकेवर विजय मिळवला यात या प्रभागाचे अतिशय मोलाची साथ दिली. प्रभाग तीन मधील मतदारांनी दिलेल्या विशेष आशीर्वादामुळे हे शक्य झाले. ते पुढे म्हणाले की, स्वच्छ रस्ते, धूळमुक्त शहर, स्वच्छ पाणी व स्वच्छ प्रशासन देण्याचा संकल्प पहिल्या दिवसापासून राबविण्यास सुरुवात झाली आहे. निवडणूक संपल्यानंतर राजकारण संपून समाजकारण सुरू झाले पाहिजे, हीच शिकवण कोल्हे परिवाराकडून मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी अध्यक्ष भाषणात रवी काका बोरावके म्हणाले की, युवा नेते विवेकभैय्या कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपालिकेची निवडणूक लढवली. अतिशय सुंदर पद्धतीने त्यांनी निवडणुकीचे नियोजन केले. विश्वासनामा कोपरगावच्या जनतेसमोर दिला तो खरोखर उत्कृष्ट आहे.विश्वासनाम्यामध्ये जी जी कामे लिहिलेले आहेत ती सर्व विवेकभैय्या कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण होतील. कोपरगावला भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून वेगळी दिशा मिळणार आहे. भारतीय जनता पक्षाचा हा युवा नेता विवेकभैय्यांच्या रूपाने संपूर्ण महाराष्ट्राला लाभला आहे. त्यांच्या कामाचे कौतुक स्वतः अमितभाई शहा यांनी केले आहे. अतिशय चांगले नेतृत्व विवेकभैय्यांच्या रूपाने समस्त कोपरगावकरांना मिळाले आहे.
कार्यक्रमाचे आयोजन साई समर्थ प्रतिष्ठानचे संस्थापक कलविंदरसिंग दडियाल व प्रभाग क्रमांक तीनमधील भाजप व मित्रपक्षांच्या कार्यकर्त्यांनी केले होते. तसेच पराग संधान मित्रपरिवार, तसेच प्रभाग क्रमांक तीन मधील विविध सामाजिक प्रतिष्ठान व सर्व नागरिक यांच्या सहकार्याने करण्यात आला आहे. यामध्ये निवारा, कोजागिरी, जानकी विश्व, रिद्धी-सिद्धी, सुभद्रा नगर, येवला रोड, आढाव वस्ती,विद्यानगर,रचना पार्क परिसरातील नागरिकांचा सक्रिय सहभाग होता.नवीन वर्षाच्या निमित्ताने झालेल्या या भव्य व भक्तीमय कार्यक्रमामुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त झाले. यावेळी कार्यक्रमात अनेक प्रतिष्ठित मान्यवर,आजी माजी नगराध्यक्ष, पार्लमेंटरी बोर्ड,नगरसेवक,विविध संस्थेचे पदाधिकारी,नगरसेवक पदांचे सर्व उमेदवार तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
निवडणुकीत जय पराजय याचा विचार न करता ज्या उमेदवारांना लढून अपयश आले असेल त्यांच्याही पाठीशी ताकद देऊन जनतेचे कामे अधिक प्रमाणात करणार आहोत.त्यांनी देखील आपण नगरसेवकच आहोत या भावनेने जनसेवचे काम जोमाने सुरू ठेवावे अशी प्रतिक्रिया विवेकभैय्या कोल्हे यांनी दिली.






