के.जे. सोमैया महाविद्यालयात २फेब्रुवारीस शिक्षण महर्षी व सहकार रत्न माजी आमदार के. बी. रोहमारे स्मृति-करंडक राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा
के.जे. सोमैया महाविद्यालयात २फेब्रुवारीस शिक्षण महर्षी व सहकार रत्न माजी आमदार के. बी. रोहमारे स्मृति-करंडक राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा
🔥 आग न्युज पोर्टल नेटवर्क कोपरगाव :—
के. जे. सोमैया वरिष्ठ व के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयात २ फेब्रुवारी रोजी के. बी. रोहमारे स्मृति-करंडक राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एस. यादव यांनी दिली.
के. बी. रोहमारे स्मृति करंडक राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा ही माजी आमदार के. बी. रोहमारे यांच्या सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक कर्तृत्वाची स्मृती म्हणून तसेच एक प्रतिष्ठेची वक्तृत्व स्पर्धा म्हणून महाराष्ट्रात ओळखली जाते.
यंदा या स्पर्धेसाठी ‘होय ! मला संविधान समजलय !, ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मानवी भवितव्य’, ‘नवीन शैक्षणिक धोरण पूरक की मारक’, ‘राष्ट्रनिर्मितीमध्ये युवकांची भूमिका’ असे ज्वलंत विषय ठेवण्यात आले असल्याचे स्पर्धेचे संयोजक डॉ. जिभाऊ मोरे यांनी सांगितले.
या स्पर्धेचे उद्घाटन शुक्रवार दिनांक ०२ फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता अहमदनगर जिल्ह्यातील राष्ट्रपती पारितोषिक विजेते आदर्श शिक्षक अमोल बागुल आणि कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक मा. संदीप कोळी यांच्या शुभहस्ते आणि कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोकराव रोहमारे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. स्पर्धकांच्या निवास आणि भोजनाची मोफत व्यवस्था केली असल्याची तसेच राज्यातील जास्तीत जास्त स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन संस्थेचे विश्वस्त संदीपराव रोहमारे आणि संयोजन समितीने केले .