स्नेहलता कोल्हे यांनी मुख्यमंत्री व गृहमंत्री नामदार ॲड. देवेंद्र फडणवीस यांच्या कडे कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील पोलिस दुर क्षेत्रातील पोलिस गैरहजेरीत सामान्य जनतेच्या संरक्षणासाठी तातडीने २४ तास पोलिस संरक्षणासाठी पोलिस पुरविण्याच घातल साकडं
भाजप प्रदेश सचिव सौ स्नेहलता कोल्हे यांनी मुख्यमंत्री व गृहमंत्री नामदार ॲड. देवेंद्र फडणवीस यांच्या कडे कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील पोलिस दुर क्षेत्रातील पोलिस गैरहजेरीत सामान्य जनतेच्या संरक्षणासाठी तातडीने २४ तास पोलिस संरक्षणासाठी पोलिस पुरविण्याच घातल साकडं
अरूण आहेर 🔥 आगन्यूज पोर्टल ९०९६६६४५३३/ अरुण आहेर दैनिक गणेश श्रध्दा न्यूज पोर्टल ९४२२७६४५३३/ arun aher4321@gmail.com/arun aher0312@gmail.com
कोपरगांव :– कोपरगाव मतदारसंघात अनेक ठिकाणी गेले काही वर्षात सातत्यानं दरोडा आणि जबरी चोरी सारख्या घटना अहोरात्र घडल्या व घडत आहेत.यामागे मुख्यतः पोलिस दूरक्षेत्रात नियुक्ती असलेल्याअपुऱ्या पोलिस गैरहजेरीत हा तालुका व मतदारसंघ नासिक, अहिल्यानगर , छत्रपती संभाजी नगर यां जिल्ह्यांचे सिमेवरील असून येथील दुहेरी रेल्वेमार्ग, संपूर्ण देशाला सर्वं दिशांना मध्यवर्ती जोडणारे पाच महामार्ग, समृद्धी आणि द्रुतगती महामार्ग , आंतरराष्ट्रीय विमानतळ, आंतरराष्ट्रीय पातळीवरील देवस्थाने आदी मुळे रोज २४ तास लाखो नागरिक आणि हजारो वाहनाचे दळणवळण होत असल्याचा चोर गैरफायदा घेतात त्यामुळे पोलिसांना अपुऱ्या साधनसामग्री व मानवी बळावर वाढती गुन्हेगारी रोखण्यात कायम अपयश येत असल्याने कोपरगाव मतदारसंघातील जनतेत कायमस्वरूपी भितीचे वातावरण पसरले असुन सर्व सामान्य जनतेच्या जीवन व व्यावसायिक क्षेत्रात वर वाईट परिणाम घडून दहशत पसरली आहे
.आपण स्वतः याची तातडीने दखल घेऊन कायमस्वरूपी २४ तास पोलिस दुरक्षेत्र तातडीने कार्यान्वित करावे असे कळकळीचे साकडं भाजप प्रदेश सचिव आणि माजी आमदार.्सौ स्नेहलता कोल्हे यांनी मुख्यमंत्री व गृहमंत्री नामदार ॲड. देवेंद्र फडणवीस यांना घातलं आहे.
याविषयी मुख्यमंत्री व गृहमंत्री यांना पाठवलेल्या निवेदनात
कोपरगाव तालुका पोलिस स्टेशन अंकित कोळपेवाडी दुरक्षेत्र आणि वारी पोलिस दूरक्षेत्र,शिर्डी पो.अंकित पोहेगाव दुरक्षेत्र, राहता पो.अंकित पुणतांबा दुरक्षेत्र,श्रीरामपूर तालुका पो.अंकित चितळी दुरक्षेत्र कार्यान्वित झाल्यास ग्रामीण भागातील नागरिकांना दिलासा मिळणार आहे.थेट तालुका स्तरावरून पोलिस पाचारण होई पर्यंत घटना स्थळावरून गुन्हेगार पलायन करण्यात यशस्वी होतात त्यामुळे वरील मंजूर असणारे दूरक्षेत्रे कार्यान्वित झाल्यास मोठा दिलासा मिळणार आहे.
कोळपेवाडी येथे सन २०१८ मध्ये सुवर्णकार दुकानावर दरोडा पडून व्यावसायिकाचा मृत्यू झाला होता त्याच प्रकारे नुकतेच पोहेगाव येथे २१ जानेवारी२०२५ रोजी दिवसा गजबजलेल्या बाजारपेठेत असणाऱ्या सुवर्णकार दुकानावर तलवारीचा धाक दाखवून दरोडा पडल्याने नागरिक भयभीत झाले आहेत.कोळपेवाडी येथील दिवसा प्राणघातक भर बाजारपेठ तील दरोड्यासह हजारावर लहान मोठ्या गुन्ह्यांचे तपासात पोलिस कमी साधन सामग्री व मनुष्यबळामुळे अपयशी ठरले आहे यामुळे गुन्हे गारांचे मनोधैर्य वाढले आहे त्यात देश व राज्य पातळीवरील गुन्हे गारांचा मोठ्या प्रमाणात वावर वाढला आहे या समस्येला व दरोडे,घरफोड्या,चोऱ्या यांना आळा घालण्यासाठी मतदारसंघातील मंजूर असणारे पोलिस दुरक्षेत्र कार्यान्वित करावे अशी मागणी करणारे माजी आमदार सौ. स्नेहलता कोल्हे यांनी नामदार फडणवीस यांना साकड घातलं आहे.
पोलिस हा समाज व्यवस्थेला सुरळीत आणि भयमुक्त राहण्यासाठी मदत होणारा महत्वाचा घटक आहेत त्यांना दूरक्षेत्रात दिलेली जबाबदारीचे नेटके नियोजन होऊन ही दुरक्षेत्रे कार्यान्वित होणे हा महत्वाचा भाग कायदा आणि सुव्यवस्था जतन करण्यास ठरणार आहे.तरीही या प्रश्नावर नामदार फडणवीस साहेब लक्ष घालून लवकरच तोडगा निघेल असा ठाम पणे विश्वास कोल्हे यांनी व्यक्त केला आहे.
याशिवाय पोहेगांव येथील दिवसा ढवळ्या भर बाजारात शस्त्र धारी दरोडेखोराकडून होत असलेला प्राणघातक दरोड्याचा प्रयत्न निशस्त्र बेडर नागरिकांच्या धाडसी कारवाईत नागरिकांनी दोन दरोडेखोरांना जागेवर पकडून नि:ष्फळ ठरविला हे वृत्त समजताच भाजपचे युवा नेते विवेक कोल्हे यांनी घटनेचे* *गांभीर्य लक्षात घेत तातडीने उपविभागीय पोलिस अधिकारी शिरीष वमने यांच्याशी घटनेबद्दल दूरध्वनीवरून माहिती देऊन चर्चा करत आरोपींना कठोर शासन होण्यासाठी मागणी केली तसेच या घटनेवेळी नागरिकांनी दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे मोठा बाका प्रसंग टळला असून लवकरच दुरक्षेत्रे कार्यान्वित झाल्यास भविष्यात नक्कीच कायदा सुव्यवस्थेचा अधिक धाक गुन्हेगारांवर बसण्यास मदत होईल.अशी आशा व्यक्त करीत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे आवाहन केले आहे