संजीवनी ग्रामीण उद्योग समूहाचे अध्यक्ष मान.बिपिन दादा कोल्हे आणि कर्मयोगी शंकरराव कोल्हे साहेब सहकारी साखर कारखाना अध्यक्ष मान.विवेक भैय्या कोल्हे यांनी रंगनाथ लोंढे यांच्या केलेल्या सर्वोत्तम निवडीचे सहर्ष स्वागत — जेष्ठ व्यापारी नारायण अग्रवाल
संजीवनी ग्रामीण उद्योग समूहाचे अध्यक्ष मान.बिपिन दादा कोल्हे आणि कर्मयोगी शंकरराव कोल्हे साहेब सहकारी साखर कारखाना अध्यक्ष मान.विवेक भैय्या कोल्हे यांनी रंगनाथ लोंढे यांच्या केलेल्या सर्वोत्तम निवडीचे सहर्ष स्वागत — जेष्ठ व्यापारी नारायण अग्रवाल
कर्मयोगी आणि माजी मंत्री स्व शंकरराव कोल्हे साहेब यांनी संजीवनी ग्रामीण शिक्षण समूह व उद्योग समूहाचे बिजारोपण करुन रक्ताचे शिंपणातील जोपासणेतून उभारलेल्या वटवृक्षाने या दोन्ही समूहात अनेकांना आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी उपलब्ध करून दिली .
कोकमठाण येथील रंगनाथ लोंढे या युवकाने सन १९८९ पासून संजीवनी उद्योग समूहात सेवा सुरू केली .कर्मयोगी स्व.शंकरराव कोल्हे साहेब, संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष मान.बिपीन दादा कोल्हे, माजी आमदार सौ. स्नेहलताताई कोल्हे, युवानेते कर्मयोगी स्व.शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना अध्यक्ष मान विवेक भैय्या कोल्हे यांना व त्यांच्याशी संपर्कात येणाऱ्या नागरिकांना सहकार्य,माहिती आणि आवश्यक तिथे मार्गदर्शन व नागरीकांना सहकार्य देण्याचे काम केवळ रंगनाथ लोंढे यांनी केले नाही तर कोल्हे कुटुंबियांच्या राजकिय, कौटुंबिक, सहकारी, स्थानिक स्वराज्य संस्था,विविध संस्था कामकाज व पदाधिकारी निवडीत उपयुक्त सहभागात सर्वस्व पणाला लावले. गेल्या ३५ वर्षांत विविध स्वरूपात नागरिकांना आपुलकीने वागवत समस्या सोडवितांना संबंधित जनता ,कर्मचारी, अधिकारी यांचेशी सलोख्याचे संबंध कायम ठेवून कोल्हे कुटुंबियांच्या पाठीशी जनपाठिंबा सतत अबाधित राखला .व कोल्हे कुटुंबियांचा विश्वास कमावला
याच बळावर कोल्हे कुटुंबियांनी संजीवनी उद्योग संस्था अर्थातच कोल्हे कुटुंबाचे विश्वासू सहकारी,जनसामान्यांचे प्रश्न सुटण्यासाठी महत्वाचे प्रतिनिधी म्हणून रंगनाथ लोंढे यांचेवर जनसंपर्क अधिकारी पदाच्या (पब्लिक रिलेशन ऑफिसर) या पदाची जबाबदारी सोपविली ही निवड अभिनंदनीय ठरते.
कर्मयोगी शंकरराव कोल्हे साहेब,मान. बिपिन दादा कोल्हे माजी आमदार सौ. स्नेहलता कोल्हे ताई व मान.विवेक भैय्या कोल्हे यांची सर्वसामान्य कुटुंबातून नोकरीला सुरुवात केलेल्या रंगनाथ लोंढे यांनी अल्पावधीच आप्पा अशी प्रेमळ ओळख निर्माण करीत कोल्हे कुटुंबाच्या माध्यमातून सेवा देत विश्वास हर्ता मिळवली. मितभाषी रंगनाथ लोंढे यांची स्व.शंकरराव कोल्हे साहेब आणि संजीवनी ग्रामीण उद्योग समूहाचे अध्यक्ष मान.बिपिनदादा कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली शासकीय, निमशासकीय,राजकीय अशी सर्वसमावेशक जडणघडण झाली आहे.अधिकारी वर्गाशी आणि नागरिकांशी आपुलकीने वागण्याचा स्वभाव त्यांची कार्यशैली आजवर अधिक उजळ करणारा ठरला आहे. कोल्हे कुटुंबांचे विश्वासू आणि जेष्ठ प्रतिनिधी म्हणून त्यांचा जनसंपर्क चांगला आहे.आपल्या सहकाऱ्यांना योग्य संधी आणि जबाबदारी देण्यासाठी परिचित असणारे मान. बिपिन दादा कोल्हे , युवानेते मान..विवेकभैय्या कोल्हे यांनी जनसेवेचा ध्यास असणारे कोल्हे कुटुंब आणि संजीवनी उद्योग समुहाचा व्यापक जनसंपर्क यासाठी एक उत्तम समन्वयक म्हणून लोंढे यांना आपले कसब दाखविण्याची ही संधी मानली जात असल्याने रंगनाथ लोंढे निश्चित या संधीचे सोने केल्या शिवाय रहाणार नाही. यापुढे ही जनसेवा लोंढे यांचेकडून घडो हीच ईश्वरचरणी प्रार्थना !!!
— जेष्ठ व्यापारी नारायण अग्रवाल कोपरगांव