Breaking
ब्रेकिंग

संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांच्या चिकाटीने इथेनॉलचे निर्बंध मागे

0 0 1 9 4 9

संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांच्या चिकाटीने इथेनॉलचे निर्बंध मागे

🔥 आगन्युज पोर्टल नेटवर्क

देशातील ग्रामिण अर्थकारणांत साखर कारखानदारीसह इथेनॉल निर्मीतीस सर्वोच्च प्राधान्य देत पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी वर्षी उसाचा तुटवडा जाणवणार असल्याने इथेनॉल निर्मीतीत थेट उसाच्या रसापासुन ३३ टक्के, सिरप पासुन ३३ टक्के व बी हेवी मोलॅसेसपासुन ३३ टक्के याप्रमाणे इथेनॉल निर्मीतीचे धोरण पुन्हा कायम करावे अशी मागणी संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांनी केंद्रीय शासनाकडे विविध पातळीवर केली होती त्यास शुकवारी केंद्र शासनाने पुर्नविचार करून १७ लाख मे. टन साखर मर्यादा टाकुन त्याप्रमाणे इथेनॉल निर्मिती थेट उसाचा रस व बी हेवी या दोन्ही बाबींस परवानगी दिल्याने त्या प्रयत्नांना यश आले आहे. या निर्णयाबददल केंद्र शासनाचे संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांनी विशेष अभिनंदन केले आहे.

देशात सर्वप्रथम गेल्या ४ ते ५ वर्षापासुन थेट उसाच्या रसापासुन इथेनॉल निर्मीतीत सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांने निर्मिती करून या इथेनॉल निर्मितीस दरवर्षी आघाडी घेतली आहे असे सांगुन बिपीनदादा कोल्हे पुढे म्हणाले की, चालु वर्षी उसाचा तुटवडा जाणवणार असल्याने केंद्रांने या निर्णयावर अचानक बंदी घातली होती ती उठविण्यांबाबत संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांनी गेल्या आठवडाभरापासुन केंद्र शासनाबरोबरच नॅशनल फेडरेशन तसेच इस्मा, विस्मा यांच्याकडे प्रयत्न केले होते त्या प्रयत्नाला अखेर यश आले हा उस उत्पादक शेतक-यांबरोबरच साखर कारखान्यांना दिलासा देणारा मोठा निर्णय आहे.


देशामध्ये सुमारे ३५५ कारखाने इथेनॉल निर्मिती करत आहे त्यापैकी १५५ कारखाने महाराष्ट्र राज्यात आहे. यासाठी ७ ते ८ हजार कोटी रूपयांची अंदाजे गुंतवणुक झाली आहे. मागील वर्षी १२० कोटी लिटर इथेनॉल ऑईल कंपन्यांना दिले होते, चालु वर्षी त्यात ३०० कोटी लिटर्स पर्यंत वाढ झाली आहे.

सहकारी साखर कारखान्यांना उस उत्पादक शेतक-यांना एफ. आर. पी ची रक्कम देण्यासाठी इथेनॉल निर्मीतीचा मोठा फायदा होत आहे. चालु वर्षी पर्जन्यमान अत्यंत कमी झाले, अनेक साखर कारखान्यांनी दैनंदिन गाळप क्षमता वाढविली त्याचबरोबर विविध ऑईल कंपन्याबरोबर इथेनॉलचे करारही केले होते मात्र अचानक इथेनॉल निर्मीतीवर बंदी आल्यांने त्याचा आर्थिक फटका बसुन या गळीत हंगामात साखर कारखान्यांचे आर्थिक असंतुलन मोठ्या प्रमाणांत वाढणार होते, त्यासाठी थेट उसाच्या रसापासुन, बी हेवी मोलॅसेस पासुन इथेनॉल निर्मीती करू द्यावी अशी मागणी सातत्यांने लावुन धरली त्यात यश मिळाल्याने संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे

केंद्र शासनाने ज्युस टु इथेनॉल व बी हेवी मोलॅसेस पासुन इथेनॉल निर्मितीस घेतलेला निर्णय व पुर्नविचार केल्याबददल युवानेते, कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी केंद्राचे विशेष आभार मानले. यामुळे संपुर्ण साखर उद्योगास मोठा दिलासा मिळणार आहे असे मतही त्यांनी व्यक्त केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 1 9 4 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे