Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

नासिक विभागीय विधानपरिषद मतदारसंघ निवडणुकी कोल्हे विरुद्ध विखे या तीन पिढ्यांच्या कुटुंबातील पारंपरिक चुरशीची हॅट्ट्रिक लढत !!!

संपादक - अरुण आहेर

0 0 1 4 1 5

नासिक विभागीय विधानपरिषद मतदारसंघ निवडणुकी कोल्हे विरुद्ध विखे या तीन पिढ्यांच्या कुटुंबातील पारंपरिक चुरशीची हॅट्ट्रिक लढत !!!

🔥 आग न्यूज पोर्टल 9096664533 arunaher4321@gmail.com

कोपरगाव : कर्मयोगी शंकरराव कोल्हे यांचें नातू संजीवनी उद्द्योग समूहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे आणि कोपरगाव तालुका पहिल्या महिला आमदार सौ स्नेहलता कोल्हे या़चेसुपुत्र आंतरराष्ट्रीय पातळीवरील इफको कृषी सहकारी संस्था व अहिल्या नगर (अहमदनगर) जिल्हा सहकारी बँक संचालक सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी नाशिक शिक्षक विधानपरिषद मतदारसंघ निवडणूक उमेदवारी बाबत भाजप श्रेष्ठींनी संमती दर्शवल्या नंतर विवेक कोल्हे यांनी मतदार चाचपणी सुरु केल्यावर त्यांचे कट्टर वैरी आणि पक्षभाऊबंद महसूल मंत्री नाम राधाकृष्ण विखे यांचे ब़ंधू प्रवरा आरोग्य अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. राजेंद्र विखे पाटील यांनीही एका मीडियाच्या प्रतिनिधीशी संपर्क साधून

आपली उमेदवारी जाहीर केली. सध्या उत्तरेच्या राजकारणात विखे पाटील आणि कोल्हे परिवार हा भाजपत असून शुगर लॉबीतील दिग्गज जवळचे नातेवाईक परिवारात आहे तरी सर्वं पातळीवर जोरदार राजकीय संघर्ष सुरू आहे. एकाच म्यानात दोन तलवारी राहू शकत नसल्याने पद्मश्री माजी केंद्रीय स्वर्गीय बाळासाहेब विखे पासून अहमदनगर जिल्हा सहकारी बँक, कॉंग्रेस पक्ष , निळवंडे धरण निर्माण पाणी वाटप गोदावरी डावे उजवे कालवे पाणी पश्न , विधानसभा विधानपरिषद निवडणूक, राज्याचे मंत्री पदें , सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना , गणेश साखर कारखाना , गोदावरी दूध उत्पादक संघ , जिल्हा परिषद, तालुका पंचायत समिती ग्रामपंचायत , सहकारी संस्था, आदी क्षेत्रांत गेल्या ६०वर्षातील संघर्ष बिजारोपणातून सततच्या खतपाणी शिंपणातून आता या कोल्हे – विखे कुटुंबीय तीन पिढ्यांचा संघर्ष हॅट्ट्रिक करीत असल्याने त्याचे वटवृक्षात रूपांतर कधी झाले हे कोणालाच कळले नाही.

याचमुळे नामदार राधाकृष्ण विखे यांनी एकाच पक्षात असून सुद्धा स्वतःच्या जवळच्या नातेवाईक सौ. स्नेहलता कोल्हे यांचा विरोधी पक्ष आमदार आशुतोष काळे यांना निवडून आणून पराभव घडवून आणला.एवढ्यावर न थांबता आमदार आशुतोष काळे यांना सर्व प्रकारचे बल पाच वर्षांत पुरविताना आगामी विधानसभा निवडणुकीत निवडून आणण्याची हमी कायम जाहिररित्या दिली जात आहे.

याचा बदला विवेक कोल्हे माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या सहकार्यातून यांनी विखे गटाच्या ताब्यातून श्रीगणेश सहकारी साखर कारखाना हिसकावुन घेऊन घेतला . विधान परिषद निवडणुकीच्या मैदानात देखील या संघर्षाचे प्रतिबिंब पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.हे घडले तर शिर्डी विधानसभा निवडणुकीत विखे विरोधात कोल्हे गट कंबर कसून आता पासूनच गावोगाव मतदार चाचपणी करीत आहे. तसेच शिर्डी आणि कोपरगाव विधानसभा मतदारसंघातही विखे विरोधात साम दाम दंड पध्दतीने जबर गनिमी काव्यातून धडा शिकवला जाईल . तेव्हा हे चालू ठेवायचे की नाही यांचा विखे परिवाराने निर्णय घ्यायचा आहे. +त्यामुळे नगर जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
आता नाशिक शिक्षक मतदारसंघातून उमेदवारी करण्याची तयारी डॉ. विखे पाटील यांनी सुरू केली. ते प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे संचालक आणि गेल्या पंचवीस वर्षांपासून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सिनेटचे सदस्य तर प्रवरा आरोग्य अभिजीत विद्यापीठाचे कुलपती आहेत.

दहा वर्षांपासून या सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या मॅनेजमेंट कौन्सिलचे सदस्य आहेत. नगर व नाशिक जिल्ह्यांतील विविध शैक्षणिक संस्थांसोबत त्यांना संपर्क आहे. दुसरीकडे कोल्हे यांना नासिक शिक्षक मतदारसंघ निवडणूकीत सहकार्य करण्यासाठी संपूर्ण नासिक जिल्ह्यातील विविध मातब्बर सस्था ताब्यात असलेल्या नातेवाईकांच़ सर्व प्रकारचे व भाजपचे बल आहे धुळे – जळगाव जिल्ह्यातील नातेवाईक आणि पक्षाचे बळ आहे,

अहिल्या नगर जिल्ह्यात विखे कुटुंबियांनी सलग साठ वर्षे जवळचे नातेवाईक,स्व पक्षासह सर्वंच राजकीय पक्ष संघटना कार्यकर्ते यांचेशी विविध पातळ्यांवर कायम पंगा घेतला असल्याने सर्वं विरोधक एकवटल्याचा प्रत्यय लोकसभा निवडणुकीत आला असून अहिल्या नगर व शिर्डी मतदारसंघातून भाजप आणि शिवसेना विजयाची हमी छातीठोकपणे कोणीच राजकारणी व राजकीय अभ्यासक तज्ञ देवू शकत नाही.

कर्मयोगी स्व . शंकरराव कोल्हे हे आशिया खंडातील अग्रेसर रयत संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांचे सहकारी होते गेल्या ७० वर्षातील संस्थेच्या विस्तार आणि व्यवस्थापन कार्यात कोल्हे कुटुंबियांतील तीन पिढ्यांचा आजही सिं हाचा वाटा असुन माजी केंद्रीय मंत्री आणि विद्यमान राज्य सभा जेष्ठ खासदार शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली खाली ही रयत स़ंस्था कार्यरत असल्याने विखे – शरद पवार मधील सर्व पातळ्यांवरील त्रिव संघर्ष अनुभव विचारात घेतल्यास या संस्थेच्या अहिल्या नगर आणि नासिक जिल्ह्यातील जिल्ह्यातील शिक्षक मतदारांच्या मतदानाचा विवेक कोल्हे यांना होईल. विवेक कोल्हेंसाठी मातोश्री माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी अहमदनगर जिल्ह्यातीत शिक्षण संस्था व त्यावर वर्चस्व असलेल्या नेत्यांच्या गाठी भेटी घ्यायला सुरुवात केली आहे.

नासिक मराठा शिक्षण प्रसारक मंडळावर सलग चाळीस वर्षे माजी खासदार स्व. डॉ. वसंतराव पवार आणि श्रीमती निलिमा पवार यांचें संपूर्ण वर्चस्व प्रस्थापित होते. तसेच कोल्हे कुटुंबियांचे जवळच्या नातेवाईक असलेल्या विविध पक्ष, स़ंघटनातील जेष्ठ नेत्यांच्या नासिक , धुळे, जळगांव जिल्ह्यातील शैक्षणिक संस्थांचे बळ विवेक कोल्हे यांच्या पाठीशी आहे.

गत काळात पक्षामार्फत डॉ. राजेंद्र विखे पाटलांचे नाव नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत चर्चेत होते. त्यांच्या यंत्रणेने मोठ्या प्रमाणावर मतदार नोंदणी देखील केली होती. भाजपकडून हिरवा झेंडा दाखवला की प्रचार सुरू, अशी स्थिती होती. त्यावेळचे आमदार डॉ. सुधीर तांबे आणि डॉ. विखे पाटील यांच्यात लढत होईल, असे कयास बांधले जात होते.

मात्र नाट्यमय राजकीय घडामोडींनंतर या दोघांची नावे मागे पडली. विद्यमान आमदार सत्यजित तांबे यांनी अपक्ष म्हणून या मतदारसंघावरील वर्चस्व कायम ठेवले. त्यावेळी डॉ. विखे पाटील यांनी मुक संमती देत शांत राहाणे पसंत केले. आमदार डॉ. तांबे यांना मदत करण्याची भूमिका घेतली. आता जर विखे विरोधात कोल्हे लढत झाली तर सध्या माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व कोल्हे यांच्या दिलजमाईत आ. तांबे आपल्या मामांच्या विरोधात जाण्याची पुर्नावावृत्ती करतील काय याची चर्चा सध्या सुरु आहे.

कारण आ. थोरात व विवेक कोल्हे यांनी एकत्रित येत उत्तरेत ‘गणेश’ सारख्या निवडणुकी लढवल्या. तांबे हे थोरातांचे भाचे असून विखे परिवाराच्या मदतीची उतराई करण्याची भूमिका पार पाडण्याचे धाडस करणे अथवा थोरात मामांच्या सल्ल्याने थोरात कुटुंबियांच्या पारंपरिक विरोधातील विखे कुटुंबियांचे विरोधात कोल्हे यांना मदत करायची की नाही या संभ्रमात आमदार सत्यजित तांबे पडले आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 1 4 1 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे