के.जे.सौमय्या महाविद्द्यालयात मोफत कृत्रिम अवयव रोपण आणि फिजिओथेरपी शिबीर
के.जे.सौमय्या महाविद्द्यालयात मोफत कृत्रिम अवयव रोपण आणि फिजिओथेरपी शिबीर
🔥 आग न्यूज पोर्टल नेटवर्क
कोपरगांव :–
के.जे. सोमैय्या महाविद्यालय कोपरगाव येथे कम्युनिटी फिजिओथेरपी विभाग, मुंबई, साधू वासवानी मिशन पुणे व के.जे. सोमैय्या महाविद्यालय कोपरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने व आमदार मा.श्री. आशुतोष काळे यांच्या सहकार्यातून आयोजित ‘मोफत कृत्रिम अवयव व फिजिओथेरपी शिबिराचे’ आमदार मा.श्री. आशुतोष काळे यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले.
ह्या शिबिराअंतर्गत दिव्यांग बांधवांना मोफत कृत्रिम अवयव दिले जाणार असून त्यांच्यावर मोफत फिजिओथेरपी उपचारही केले जाणार आहेत.
यावेळी कम्युनिटी फिजिओथेरपी विभागाचे डॉ. पोथीराज पिचायी, साधू वासवानी मिशनचे* *श्री. सुशील ढगे, कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोक रोहमारे, सचिव संजीव* कुलकर्णी, विश्वस्त जवाहर शहा, संदीप रोहमारे, के.जे. सोमैय्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.एस. यादव, श्री मिलिंद जाधव, डॉ. रिद्धीताई गोराडिया, डॉ अभिजित नाईकवाडे, डॉ. संजय दवंगे, डॉ. एस.के. बनसोडे, श्री संतोष गंगवाल, श्री योगेश गंगवाल, आदींसह राष्ट्रवादी सोशल मीडिया सेलचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर म्हस्के, विद्यार्थी जिल्हा कार्याध्यक्ष आकाश डागा, नगरसेवक मंदार पहाडे, राजेंद्र वाकचौरे, गौतम सहकारी बँकेचे माजी संचालक सुनील शिलेदार, विद्यार्थी तालुकाध्यक्ष कार्तिक सरदार, डॉ. तुषार गलांडे, बाळासाहेब रुईकर, मुकुंद इंगळे, सुनिल बोरा, शुभम लासुरे, विकास बेंद्रे, रुपेश वाकचौरे, बाळासाहेब बारसे, गणेश लकारे, नारायण लांडगे, संतोष शेजवळ, अमोल आढाव, जय बोरा, रोहन कांबळे, साईश क्षीरसागर आदींसह दिव्यांग बांधव उपस्थित होते.