Breaking
ब्रेकिंग

श्रीसाई संस्थानच्या वतीने नाताळ 2023 च्या सुट्ट्या ,सन2023 ला निरोप व सन 2024 चे स्वागत या पार्श्वभूमीवर विशेष समारोहांचे आयोजन :- प्रभारी कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे 

0 0 1 1 6 1

श्रीसाई संस्थानच्या वतीने नाताळ 2023 च्या सुट्ट्या ,सन2023 ला निरोप व सन 2024 चे स्वागत या पार्श्वभूमीवर विशेष समारोहांचे आयोजन :- प्रभारी कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे 

🔥 आग न्यूज पोर्टल नेटवर्क

कोपरगाव :- श्रीसाई संस्थानच्या वतीने नाताळ सुट्ट्या, मावळत्या वर्षाला निरोप व नविन वर्षाच्या स्वागतासाठी येणाऱ्या लाखो भाविकांचे सेवेसाठी सर्व सुविधा पुरविण्याकरिता सज्ज असल्याची माहिती श्रीसाई संस्थानच्या प्रभारी कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे यांनी दिली.


यानिमित्त रविवार (दि. 31 डिसेंबर) रोजी विविध सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रम होणार असल्याचे संस्थानचे प्र.मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे यांनी सांगितले. हुलवळे म्हणाले, दरवर्षी नाताळ सुट्टी, चालू वर्षाला निरोप व नव वर्षाच्या स्वागतानिमित्त श्रींच्या दर्शनासाठी शिर्डीत भाविकांची गर्दी दाटते. संस्थानकडे शिर्डी महोत्सवाकरीता विविध ठिकाणांहुन येणार्‍या 164 पालख्यांची नोंद झाली आहे. श्रीसाईभक्तांची होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेवून मंदिर परिसरात 12250 चौरस फुटाचे मंडप उभारले आहेत. अतिरिक्त निवास व्यवस्थेसाठी साई धर्मशाळा व भक्त निवासस्थान (500 रुम) येथे 34 हजार चौरस फुटाचे मंडप उभारले आहेत. श्रीसाई आश्रम भक्त निवासस्थान येथे टेंसाईल फॅब्रीक शेडमध्ये 19,500 चौ.फुट अतिरीक्त निवास व्यवस्था केली आहे.

श्रीसाईभक्तांसाठी दररोज सुमारे 15 क्विंटलचे 70 हजार मोफत बुंदी प्रसाद पाकिटे व विक्रीस दररोज 30 क्विंटलचे दीड लाख नग मोतीचूर लाडू प्रसाद बनविण्याचे नियोजन आहे. उत्सव कालावधीत भक्तांना प्रसाद लाडू पॅकेट सहज उपलब्ध व्हावेत, यासाठी श्रीसाईनाथ मंगल कार्यालय, व्दारकामाईसमोर खुले नाट्यगृह, मारुती मंदिराशेजारी साई कॉम्प्लेक्स, गेट नंबर 1, श्रीसाईप्रसादालय, सेवाधाम इमारत, शिर्डी विमानतळ व सर्व निवासस्थानांमध्ये लाडू विक्री केंद्र उभारले आहेत. आवश्यकतेनुसार अतिरिक्त लाडू विक्री केंद्र उभारण्याचे नियोजन केले आहे. उत्सव कालावधीत श्रीसाई प्रसादालयात दररोज सुमारे 60 हजारांहून अधिक श्रीसाईभक्त प्रसाद भोजन घेतील, असे नियोजन केले आहे.

दर्शनरांगेसह परिसरात भक्तांना चहा, कॉफी व दूध सुलभ मिळावे, यासाठी साई कॉम्प्लेक्स, साई आश्रम, धर्मशाळा, भक्त निवास स्थान (500 रुम), व्दारावती भक्त निवासस्थान व साई उद्यान इमारत परिसर, नविन दर्शन रांग इमारत, शांती निवास इमारतीतील दर्शन रांगेत चहा व कॉफीची अतिरिक्त व्यवस्था केली आहे. याकालावधीत श्रीसाई भक्तांच्या सोयीसाठी दर्शनरांग, मंदिर परिसर, साईआश्रम व नविन श्रीसाई प्रसादालय येथे प्रथमोपचार केंद्राची व्यवस्था करण्यात येणार आहे. तातडीचे सेवेसाठी मंदिर परिसरात, नविन भक्त निवासस्थान, धर्मशाळा व श्री साईप्रसादालय येथे रुग्णवाहिका तैनात असणार आहे.

सुरक्षेसाठी पोलिस निरीक्षक, पोलिस उपनिरीक्षक, पोलिस, शिघ्र कृतीदल पथक, बॉम्ब शोधक पथक तैनात आहे. बंदोबस्तासाठी अतिरिक्त पोलिस निरिक्षक, स. पोलिस निरीक्षक, पुरुष व महिला पोलिस कर्मचारी तैनात आहेत. याव्यतिरिक्त संस्थानचे पोलिस निरीक्षक व सुरक्षा कर्मचारी असे एकुण 1000 हून अधिक कर्मचारी कार्यरत राहणार आहेत. मंदिरासह निवासस्थान व श्रीसाईप्रसादालय आदी ठिकाणी येणे-जाणे करीता जादा बसेसची व्यवस्था केली आहे.

31 रोजी दुपारी 2 ते 3.45 यावेळेत श्रीसाई स्वरांजली संगीत संच, नागपूर, दुपारी 4 ते 5.30 लाइफ लाइन सर्विस सोसा., सागर, मध्यप्रदेश, सायं 6.15 ते रात्री 8 यावेळेत अजय बी. मोरे, मिरा रोड, ठाणे व रात्री 8 ते 9.45 यावेळेत जगदिश पाटील, ठाणे आदी कलाकारांचे साईभजने व भक्ती गीत कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रम हनुमान मंदिराशेजारी श्रीसाईबाबा समाधी मंदिर शताब्दी मंडपात स्टेजवर होणार आहेत्त. शिर्डी महोत्सवानिमित्त कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन हुलवळे यांनी केले आहे.

समाधी मंदिर 31 रोजी रात्रभर राहणार उघडे!
रविवार दि. 31 रोजी समाधी मंदिर साईभक्तांसाठी दर्शनास रात्रभर उघडे असल्यामुळे रात्री 10 वा. होणारी शेजारती व दि. 1 जानेवारी रोजी पहाटे 5.15 वाजेची काकड आरती होणार नाही. शिर्डी महोत्सवानिमित्त रविवारी 31 रोजी विविध सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 1 1 6 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे