कर्मयोगी शंकरराव कोल्हे साहेब यांच्या स्वप्नातील संजीवनी ग्रामीण विद्यापीठ संचलित संजीवनी रुरल एज्युकेशन सोसायटीच्या संजीवनी सैनिकी स्कूल ने दिल्लीत राष्ट्रीय शालेय बॅंड स्पर्धेत अव्वल स्थानावरून ७७ व्या भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त घुमवला डंका – भाजप युवानेते विवेकभैय्या कोल्हे

कर्मयोगी शंकरराव कोल्हे साहेब यांच्या स्वप्नातील संजीवनी ग्रामीण विद्यापीठ संचलित संजीवनी रुरल एज्युकेशन सोसायटीच्या संजीवनी सैनिकी स्कूल ने दिल्लीत राष्ट्रीय शालेय बॅंड स्पर्धेत अव्वल स्थानावरून ७७ व्या भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त घुमवला डंका – भाजप युवानेते विवेकभैय्या कोल्हे
कोपरगाव :–
नवी दिल्ली येथे पार पडलेल्या राष्ट्रीय शालेय बँड स्पर्धेत कर्मयोगी शंकरराव कोल्हे साहेब यांच्या स्वप्नातील संजीवनी ग्रामीण विद्यापीठ संचलित संजीवनी रुरल एज्युकेशन सोसायटी च्या संजीवनी सैनिकी स्कूल व ज्युनिअर कॉलेज, कोपरगाव यांनी ब्रास बँड बॉईज गटात देशात प्रथम क्रमांक पटकावून ऐतिहासिक यश संपादन केले आहे.

या दैदीप्यमान कामगिरीबद्दल संजीवनी उद्योग आणि शिक्षण समूहाच्या वतीने युवानेते विवेक कोल्हे यांनी विद्यार्थ्यांचे, शिक्षकांचे आणि संस्थेचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे. उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीन दादा कोल्हे, मा.आ. स्नेहलताताई कोल्हे यांनीही अभिनंदन केले आहे.

७७ व्या प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्रालय व शिक्षण मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या राष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठित स्पर्धेत देशातील चारही झोनमधील सर्वोत्तम संघ सहभागी झाले होते. अत्यंत अटीतटीच्या आणि उच्च दर्जाच्या या स्पर्धेत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध संचलन, तालबद्ध वादन आणि आत्मविश्वासपूर्ण सादरीकरणाच्या जोरावर अव्वल स्थान पटकावले, ही बाब संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद असल्याचे विवेकभैय्या कोल्हे यांनी नमूद केले.

ते पुढे म्हणाले की, हे यश केवळ एक पारितोषिक नसून शिस्त, परिश्रम, सातत्य आणि देशभक्तीच्या मूल्यांची राष्ट्रीय पातळीवर झालेली दखल आहे. योग्य संधी आणि मार्गदर्शन मिळाल्यास ग्रामीण भागातील विद्यार्थी कोणत्याही स्तरावर आपली गुणवत्ता सिद्ध करू शकतात, हे या यशातून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. मी स्वतः अनेकदा या बँड पथकाचे सादरीकरण अनुभवले असून त्यांच्या कौशल्याने अंगावर रोमांच उभे राहतात.

या यशामागे संस्थेचे अध्यक्ष माननीय नितीनदादा कोल्हे, कार्यकारी संचालक अमितदादा कोल्हे, विश्वस्त सुमित कोल्हे, प्राचार्य कैलास दरेकर सर, बँड प्रशिक्षक, संगीत शिक्षक, सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी आणि पालकांचे मोलाचे योगदान असल्याचे त्यांनी अधोरेखित केले..

कर्मयोगी शंकरराव कोल्हे साहेबांनी पाहिलेले शेतकरी-कष्टकरी कुटुंबातील मुलांच्या सर्वांगीण विकासाचे स्वप्न आज प्रत्यक्षात साकार होत असल्याचे सांगत विवेकभैय्या कोल्हे यांनी विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.







