संजीवनी इंटरनॅशनल स्कूल मध्ये विद्यार्थी परीषद समितीचा पदग्रहण माध्यमातून शालेय जीवनातच लोकशाही मुल्यांची रूजवण उपक्रम – संजीवनी ग्रामीण शिक्षण समूहाचे अध्यक्ष नितीन कोल्हे
संपादक - अरुण आहेर
संजीवनी इंटरनॅशनल स्कूल मध्ये विद्यार्थी परीषद समितीचा पदग्रहण माध्यमातून शालेय जीवनातच लोकशाही मुल्यांची रूजवण उपक्रम – संजीवनी ग्रामीण शिक्षण समूहाचे अध्यक्ष नितीन कोल्हे
🔥 आग न्यूज पोर्टल
कोपरगांव :संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स (एसजीआय) संचलित शिर्डी येथिल संजीवनी इंटरनॅशनल स्कुलच्या चालु शैक्षणिक वर्षाच्या विद्यार्थी परीषद समितीची निवड लोकशाही पध्दतीने निवडणुक घेवुन निवडुन आलेल्या विद्यार्थी सदस्यांचा पदग्रहण उपक्रम शालेय जीवनातच लोकशाहीची मुल्ये या स्कूलने रूजविण्याचा प्रयत्न केला असल्याचे गौरवोद्गार संजीवनी ग्रामीण शिक्षण समूहाचे अध्यक्ष श्री नितिन कोल्हे यांनी काढले.
संजीवनी ग्रामीण शिक्षण समूहाचे शिर्डी येथील संजीवनी इंटरनॅशनल स्कूल मध्ये विद्यार्थ्यांना भारतीय लोकशाही मुल्ये तोंड ओळखीतून व प्रत्यक्ष कामकाज प्रात्यक्षिके सादर करून माहिती करून देणारा स्तुत्य उपक्रम माध्यमातून विद्यार्थ्यांच्या मतदानाने निवडणूक पध्दतीने विविध प्रतिनिधींची निवड करण्यात आली. या नव निर्वाचित सदस्यांच्या पदग्रहणा प्रसंगी अध्यक्ष नितीन कोल्हे बोलत होते. वर्षभर याप्रसंगी शिर्डी नगरपरीषदेचे माजी उपनगराध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते श्री सुजित गोंदकर यांची प्रमुख पाहुणे होते.स़ंजीवनी ग्रामीण शिक्षण समूहाचे कार्यकारी विश्वस्त अमित कोल्हे मॅनेजिंग ट्रस्टी श्री अमित कोल्हे व स्कूलच्या संचालिका डॉ. मनाली कोल्हे यांनी सर्व निवड झालेल्या सदस्यांचे अभिंनदन करून वर्षभराच्या कामकाजास शुभेच्छा दिल्या.
मुलांमध्ये स्वरीत भूषण भलगटीया याने सर्वात जास्त मते मिळवुन विद्यार्थी प्रतिनिधी (हेड बॉय) पदाचा मानकरी ठरला तर मुलींमध्ये जुई अजित पाटील ही उपप्रतिनिधी पदाची मानकरी ठरली. शालेय क्रीडा प्रमुख पदावर पार्थ भाऊराव गांगुर्डे, सांस्कृतिक प्रतिनिधी पदावर आरव अतुल नखरा, शालेय शिस्त प्रतिनिधी पदावर शास्वत समरेंद्र कुमार व विद्यार्थी सभापती पदावर आर्या राय हिची निवड झाली.
तसेच वर्षभर विविध कामकाज पाहण्यासाठी विविध हाऊसेसच्या प्रतिनिधिंचीही निवड करण्यात आला. यात तक्षशिला हाऊसच्या कॅप्टन पदावर साची विरेश अग्रवाल व उप कॅप्टन पदावर अर्चित प्रशांत कडू, विक्रमशिला हाऊसच्या कॅप्टन पदावर स्वरा विजय घोडेराव व उपकॅप्टन पदावर सिध्दी महेंद्र तांबे, नालंदा हाऊसच्या कॅप्टन पदावर वल्लभ अनिल कोते व उपकॅप्टन पदावर पृथ्वीराज साईकुमार माळवदे, इंद्रप्रस्थ हाऊसच्या कॅप्टन पदावर विरा राहुल विखे व उपकॅप्टन पदावर भुवी स्नेहल कोठारी यांची निवड झाली आहे.
प्राथमिक विभागामध्ये विश्वसाई प्रितम वडगावे याची विद्यार्थी प्रतिनिधी म्हणुन तर उप्रपतिनिधी म्हणुन तपस्या लांडगेची निवड झाली आहे.प्राथमिक विभाग क्रीडा प्रुमुख म्हणुन विदिशा शिवाजी गोंदकर हिची, सांस्कृतिक प्रतिनिधी म्हणुन सई राहुल गोदकर व शिस्त समिती प्रतिनिधी म्हणुन पियुष पंकज संकलेचा यांची निवड झाली आहे. या सर्वांना प्रिन्सिपल डायरेक्टर सुधा सुब्रमण्यम यांनी पद व गोपनियतेची शपथ दिली. यावेळी प्राचार्या सौ. डॉ. संतोश शर्मा , हेड मिस्ट्रेस रेखा साळुंके, पालक व शिक्षक उपस्थित होते.
सदर प्रसंगी एसआयएस टॉक या कार्यक्रमांतर्गत राजविका अमित कोल्हे हिने भारतातील महिला व बाल विकास मंत्री सौ. अन्नपुर्णा देवी, श्रीजल निखिल बोरावके याने अलेक्स एलिस (इंग्लंड) ब्रिटिश हाय कमिशनर, मेरिष्का सबलोक हीने मलाला युसुफझाय (पाकिस्तन) शांतीराजदुत,मीत कोली यांने एरिक गारसेटी (अमेरिका) राजदुत व नोरगीलोन (इस्त्राईल) टेक्नॉलॉजी राजदुत यांची भुमिका साकारून आरोग्य, तंत्रज्ञान, शिक्षण व शास्वत विकास उद्दिष्टे अशा विविध विषयांवर चर्चा करीत कार्यक्रम सादर केला. राजश्री योगेश आढाव व भक्ती सतिश पानगव्हाणे यांनी सुत्रसंचालन केेले. क्रीडा शिक्षक विरूपक्ष यांनी आभार मानले