Breaking
ब्रेकिंग

कोपरगाव पर्यटन व्यवसायाला हेलिकॉप्टर सफरीची जोड

0 0 1 1 5 2

कोपरगाव पर्यटन व्यवसायाला हेलिकॉप्टर सफरीची जोड

अनेकांनी घेतला सेवेचा आंनद

कोपरगाव प्रतिनिधी – हेलिकॉप्टर मध्ये बसणे तसे सर्व सामान्य माणसाच्या आवाक्यात नसते मात्र पर्यटन व्यवसायातील विजय जेजुरकर यांनी अवघ्या ४९९९रुपयात सफरीची संधी साईभक्त व स्थानिक नागरिकासाठी उपलब्ध करून दिली असून या सेवेस चांगला प्रतिसाद मिळत असल्याची माहिती विजय जेजुरकर यांनी दिली

आत्मा मालिक इंटरनॅशनल स्कूल जवळ असलेल्या हेलीपॅडवर हि सुविधा उपलब्ध आहे सर्व सामान्य माणसाला देखील या सेवेचा लाभ मिळाला पाहिजे हा दूरदृष्टीकोन ठेवत साईबाबा एव्हिएशन या कंपनीने हि सेवा नुकतीच सुरू केली आहे मिळत असलेल्या प्रतिसादा बद्दल जेजुरकर म्हणाले की ज्या वर्गाचे उत्पन्न कमी आहे असे कुटुंब समोर ठेवून आतिशय कमी दर ठेवून हि सेवा नुकतीच सुरू करण्यात आली असून आपल्या भागात हा पहिलाच प्रयोग आहे परंतु त्यास चांगला प्रतिसाद मिळत असून राहता कोपरगाव तालुक्यातील अनेकांनी याचा आनंद घेतला आहे

विजय जेजुरकर हे देखील मध्यमवर्गीय कुटुंबातील असल्याने आतिशय माफक दर ठेवण्यात आले आहे यामुळे कोपरगाव शहराच्या पर्यटन व्यवसायाला एक प्रकारे नवीन ओळख यामुळे मिळणार आहे

एका वेळी सहा प्रवाशी बसु शकतात दहा पंधरा मिनिटाची हि हवाई सफर वेगळा असा आंनद देणारी ठरत आहे तिनशे स्त्री पुरुष महिला तरुण पत्रकार व्यावसायिक उद्योजक यांनी याचा लाभ घेतला आहे शिर्डी येथे आलेल्या साईभक्त भाविकांना पुणे मुंबई हि सेवा सुरू आहे मात्र पाच हजार रुपये खर्च करु शकतील अशा वर्गातील लोकांना सफरीचा आंनद मिळाला पाहिजे हा मुख्य हेतू आहे व त्यास प्रतिसाद देखील चांगला मिळत आहे

गोवा मुंबई पुणे पाठोपाठ आता सेवा सुरू झाल्याने साईभक्त भाविकांन मध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे

आत्मा मालिक इंटरनॅशनल स्कूल जवळ येथे सुरू झालेल्या हेलिकॉप्टर सफरीची संधी कोपरगावात पर्यटन व्यवसायासाठी आकर्षणाचे केन्द्र बिदु ठरेल असा विश्वास ज्यानी सफर केली आहे त्यांनी आपले मत व्यक्त केले आहे

 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 1 1 5 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे