आत्मा मालिक मध्ये भारतीय खेळ प्राधिकरण साई अंतर्गत निवड चाचणीचे आयोजन
भारतीय खेळ प्राधिकरण भारत सरकार ( साई)आयोजित शालेय खेळाडूंसाठी खेलो भारत अंतर्गत रायझिंग टॅलेन्ट आयडेंटिटी फिकेशन प्रशिक्षण वर्ग निवड चाचणी प्रसंगी इच्छुक शालेय मुलां – मुलींनी दिनांक 27 मार्च ते 31 मार्च 2024 या कालावधीत आत्मा मालिक शैक्षणिक व क्रिडा संकुलात सकाळी 8 वाजता उपस्थित रहावे — आत्मा मालिक आंतरराष्ट्रीय ध्यान पीठ, शैक्षणिक व क्रीडा संकुल विश्वस्त मंडळ अध्यक्ष नंदकुमार सुर्यवंशी
🔥 आगन्युज पोर्टल नेटवर्क
कोपरगाव —- भारतीय खेळ प्राधिकरण,भारत सरकार (साई ) अंतर्गत आत्मा मालिक व शैक्षणिक क्रीडा संकुलामध्ये दिनांक 27 मार्च ते 31 मार्च या कालावधीत शालेय ग्रामीण आणि शहरी शालेय विद्यार्थी व विद्यार्थिनी क्रीडा खेळाडूंची खेलो भारत अंतर्गत रायझिंग टॅलेन्ट आयडेंटिटी फिकेशन या उपक्रमातून जागतिक,राष्ट्रीय , राज्य पातळीवर सर्वोत्कृष्ट खेळण्यासाठीच्या अत्याधुनिक प्रशिक्षण वर्गात निवड होण्याकरिता शालेय विद्यार्थी – विद्यार्थ्यिंनी सकाळी 8 वाजता उपस्थित राहावे असे आवाहन आत्मा मालिक आंतरराष्ट्रीय ध्यानपीठ , ओम गुरुदेव आत्मा मलिक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट, आत्मा मालिक हॉस्पिटल, आत्मा मलिक शैक्षणिक , सांस्कृतिक व क्रीडा संकुल अध्यक्ष श्री नंदकुमार सूर्यवंशी यांनी केले आहे
यावेळी बोलताना श्री नंदकुमार सूर्यवंशी पुढे म्हणाले आत्मा मलिक शैक्षणिक व क्रीडा शिक्षण संस्थेच्या आज पर्यंत कुस्ती व व्हॉलिबॉल या क्रीडां उपक्रमास साई स़स्थेची मान्यता असून या वर्षापासून शालेय खेळाडूं प्रशिक्षण वर्ग निवड चाचणी परिक्षा केंद्रासाठी निवड झाली आहे. या निवड चाचणीमध्ये कबड्डी व्हॉलीबॉल, खो-खो फुटबॉल व ॲथलेटिक्स या क्रीडा प्रकारांमध्ये वय वर्षे 9 ते 18 वयोगटातील मुले व मुली सहभाग घेऊ शकतात त्यासाठी खेळाडूंनी समक्ष उपस्थित राहून नाव नोंदणीसह शारीरिक मानसिक आणि कौशल्य क्रीडा चाचणी आपली अत्याधुनिक तंत्रज्ञान व विकसित प्रशिक्षणातून करणे गरजेचे आहे .
याशिवाय शालेय विद्यार्थी व पालकांनी तातडीने आपली नावनोंदणी सोशल मीडिया नेटवर्कवरील माय भारत पोर्टल https : // mybharat gov.in या संकेतस्थळावर करणे गरजेचे आहे. परंतु ज्यांना हे शक्य नसल्यास त्यांनी
आपले नाव नोंदणी, प्रशिक्षणासाठी प्रत्यक्ष निवड चाचणीसाठी उपस्थिती बाबत कृपया आपण आत्मा मलिक स्पोर्ट्स अँड एज्युकेशनल कॉम्प्लेक्स मध्ये
*श्री शषेंद्र त्रिपाठी, समन्वयक ,खेलो भारत अंतर्गत रायझिंग टॅलेन्ट आयडेंटिटी फिकेशन प्रशिक्षण वर्ग यांचेशी प्रत्यक्ष अथवा मोबाईल नंबर 8830855060 / 9325352737 वर संपर्क साधावा असे आवाहन अध्यक्ष नंदकुमार सुर्यवंशी यांनी केले आहे
या भारतीय खेळ प्राधिकरण भारत सरकार ( साई)आयोजित शालेय खेळाडूंसाठी खेलो भारत अंतर्गत रायझिंग टॅलेन्ट आयडेंटिटी फिकेशन प्रशिक्षण निवड चाचणी प्रसंगी 27 मार्च ते 31 मार्च 2024 या कालावधीत आत्मा मालिक शैक्षणिक व क्रिडा संकुलात सकाळी 8 वाजता उपस्थित रहावे — अध्यक्ष नंदकुमार सुर्यवंशी