Breaking
ब्रेकिंग

समता इंटरनॅशनल स्कूल सर्वांगीण शैक्षणिक बाल विकास व अत्याधुनिक करणात अव्वल — लोकमत आवृत्तीचे संपादक सुधीर लंके

0 0 1 1 4 1

समता इंटरनॅशनल स्कूल सर्वांगीण शैक्षणिक बाल विकास व अत्याधुनिक करणात अव्वल — लोकमत आवृत्तीचे संपादक सुधीर लंके


् 🔥 आग न्युज पोर्टल नेटवर्क
कोपरगाव :समता इंटरनॅशनल स्कूलमध्ये भारतीय संस्कृती . मायबोलीच्या मजबूत पायावर जगातील शिक्षण, खेळ,बाल विद्द्यार्थ्यांना ग्रहण शक्तीनुसार विद्यार्थ्यांच्या शिक्षणा बरोबर कला गुणांना वाव देण्यासाठी व त्यांच्यातील सुप्त गुण विकसित करणे यांसारखे अनेक उद्देश समोर ठेवल्याने आंतरराष्ट्रीय पातळीवर समता पतसंस्था , महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन, आशियाई पतसंस्था फेडरेशन , सुध़न सोने तारण कर्ज वितरण संस्था, ६५ वर्षांवरील वयोवृद्ध,अनाथ , मतीमंद आदी ना घरपोच दोन वेळचे ताजेजेवणाची सुविधा , सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्थानिक शहरी युवक, छोटे – मोठे व्यापारी, ग्राहक बचत गट यांना स्थानिक बाजार पेठ उपलब्ध करून देतांना विविध प्रोत्साहन पर यशस्वी उपक्रम राबविले. तसेच तालुक्याचे देशाला सर्वं दिशांनी समान पातळीवर जोडणाऱ्या मध्यवर्ती पठारी प्रदेशात आंतरराष्ट्रीय विमानतळ, समृद्धी महामार्ग, नागपूर – मुंबंई द्रुतगती महामार्ग, सुरत- – हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग , पश्चिम आणि उत्तर भारत जोडणारा राष्ट्रीय महामार्ग, सर्वं दिशांना समान पातळीवर जोडणारा दुहेरी रेल्वे मार्ग, औद्योगिक वसाहत श्रीसाईबाबा आंतरराष्ट्रीय तिर्थक्षेत्र, ऐतिहासिक व पौराणिक तिर्थक्षेत्र अशा विकासात्मक परिस्थितीचा लाभ सर्वं सहमतीने युवा शक्ती बळावर मिळवून देण्यासाठी काका कोयटे घेत असल्याचे गौरवोद्गार लोकमत अहमदनगर आवृत्तीचे निवासी संपादक सुधीर लंके यांनी समता इंटरनॅशनल स्कूलच्या , वार्षिक स्नेहसंमेलनात बोलताना काढले. विया कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आशियाई पतसंस्था फेडरेशन खजीनदार काका कोयटे यांनी भुषविले.

यावेळी बोलतांना सुधीर लंके पुढे म्हणाले, विद्द्यार्थ्यांच्या शिक्षणबरोबर ,सर्व प्रकारचे मानसिक शारीरिक दृष्ट्या विकास ह़ोण्यासाठी आणि त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण आंतर गुणांना वाव देवून विविध प्रकारच्या स्पर्धा,खेळ,कला वि्कास स्तरावर शाळा, महाविद्यालयांमध्ये वार्षिक स्नेहसंमेलने आयोजित केली जातात.

यातूनच स्थानिक पातळीवर जागतिक पातळीवरील कलाकार, खेळाडू तयार घडविले जातात. समता इंटरनॅशनल स्कूलचा हा उपक्रम अतिशय शिस्तप्रिय पद्धतीने मार्गदर्शक असल्याने विद्यार्थ्यांमधील आत्मविश्वास, अपेक्षा उंचाविण्याचा हा उपक्रम समता इंटरनॅशनल स्कूलच्या बआलचमूनए स्थानिक ते जागतिक पातळीवरील विविध प्रकारच्या स्पर्धात सार्थ ठरविला आहे.

समता इंटरनॅशनल स्कूलनेविद्यार्थ्यांना जे समजते ते त्यांच्या मानसिक शारीरिक दृष्ट्या कुवतीनुसार देणारी व त्यांच्या विचारांचा आदर करणारी शाळा म्हणून ओळख निर्माण केलेली आहे. शिक्षणाशिवाय वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थी जीवन परिपक्व बनविणारी शाळा पाहायला मिळाली. त्यामुळे समता इंटरनॅशनल स्कूल ही इतरांच्या तुलनेत एक पाऊल पुढे असणारी शाळा असल्याचं गौरवोद्गार सुधीर लंके यांनी काढले.

काल: संभ्रम: (रामायणातील अपरिचित गोष्टी) या आधारे समता इंटरनॅशनल स्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन २०२३ – २४ व बक्षीस वितरण सोहळा स्कूलचे संस्थापक ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झाला.
ते पुढे म्हणाले की, काका कोयटे यांनी स्थापन केलेल्या समता चॅरिटेबल ट्रस्ट, समता पतसंस्था, समता इंटरनॅशनल स्कूल या संस्थांच्या नावाला शोभेल अशी कामगिरी असून समर्पक असे नाव दिले आहे. समता हा शब्द जात, पंथ, लिंग यात कोणताही भेद न करणारा शब्द असून सर्वांच्या सर्वांगीण विकास संघी देणारा अद्वितीय उपक्रम आहे. लोकशाहीच्या मूलभूत अधिकारांना समान न्याय देणारा महत्त्वपूर्ण असा शब्द आहे. समतातील विद्यार्थ्यांची गुणवत्ता, स्कूलचा शैक्षणिक दर्जा विशेष उल्लेखनीय असा आहे. तसेच पालकांनी विद्यार्थ्यांसोबत मानसिक दृष्ट्या असणे महत्त्वाचे आहे. धनुष्यातील बाण उजव्या हाताच्या अंगठ्यात धरून मारला जातो. पण समताने डाव्या हाताच्या अंगठ्याने बाण मारणारे विद्यार्थी घडविण्याचे महान कार्य पार पाडावे असे सुधीर लंके यांनी कळकळीचे आवाहन केले.


प्रमुख पाहुण्यांचा परिचय समता इंटरनॅशनल स्कूलचे उप प्राचार्य समीर आत्तार यांनी करून दिला. संस्थेचे संस्थापक काका कोयटे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. २०२३ – २४ चा वार्षिक अहवाल वाचन प्राचार्या हर्षलता शर्मा यांनी केले. तालुका, जिल्हा, राज्य व राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये समताचे नाव उंचावणाऱ्या विद्यार्थ्यांचा सन्मान व सा रे ग म प २०२३ ची लिटल चॅम्प गौरी अलका पगारे हिचा ही सन्मान प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला. सुधीर लंके यांनी शिक्षक व विद्यार्थी आणि पालक व पाल्य यामधील नाते विविध चित्रपटातील दाखले देऊन स्पष्ट केले. तसेच समताच्या विद्यार्थ्यानी रामायणातील अपरिचित घटना नाट्य, सांगितिक पद्धतीने परिचित करून दिल्या. समता स्कूलच्या हिरवळीवर, गुलाबी थंडीत रामायणातील या अपरिचित गोष्टींचा आस्वाद घेताना उपस्थित वर्ग मंत्रमुग्ध झाला होता. विद्यार्थी, पालकांसाठी खाऊ गल्लीचेही आयोजन करण्यात आले होते.


प्रास्ताविकात कार्यकारी विश्वस्त स्वाती कोयटे म्हणाल्या की, समता इंटरनॅशनल स्कूल ही मुलभूत विद्यार्थी केंद्रित संस्था असून सर्वांगीण विकासासाठी काका कोयटे यांच्या संकल्पनेतील मार्गदर्शनाखाली सतत प्रयत्नशील असते. या वर्षी विद्यार्थ्यांना इजिप्त, दुबई या देशांचा अभ्यास दौरा करून तेथील संस्कृती, शैक्षणिक वातावरण, अत्याधुनिक तंत्रज्ञान आदींसह विविध गोष्टींची सांगड घातली गेली असून विद्यार्थ्यांच्या प्रगतीच्या दृष्टीने तेथील शिक्षण संस्थांशी विविध सामंजस्य करार देखील करण्यात आले आहेत. विद्यार्थ्याना शिक्षण घेताना बदल हवे असतात. त्यांना हवे असणारे मानसिक, शैक्षणिक, शारीरिक बदल लक्षात घेऊन आम्ही समता पॅटर्नच्या माध्यमातून शैक्षणिक प्रगती करत आहोत. ‘तुमची मुलं, ती आमची मुलं या प्रमाणे विद्यार्थ्यांची सर्वांगीण प्रगती करून समताचे विद्यार्थी हे देशाचे उज्वल भविष्य आहे.
कार्यक्रम व नाटिकांचे सुत्रसंचालन आर्यन कुमार, सिद्धांत मिलानी, दार्शिल अजमेर, सोहम साताळकर, हेतूल पारीख, अन्वी उंबरकर, नूतन लाहोटी, अदिती बाराहाते, श्रेयाश्री पाटील, ईशान कोयटे, इप्सिता राय, रिद्धी भडकवाडे या विद्यार्थ्यांनी केले. काळाची भूमिका अजिंक्य वठोरे, प्रथमेश भट्टड, अद्विता भोसले, जयरूप साखरे, शांभवी देशमुख यांनी पार पाडली. नाटिका शिक्षक किरण लद्दे यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले. समताच्या नाटिका व सांगितिक नृत्यांमध्ये प्राथमिक व माध्यमिक विभागातील १ हजार हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता.
या वेळी समता इंटरनॅशनल स्कूलचे व्यवस्थापन समितीचे सदस्य अरविंद पटेल, कांतीलाल जोशी, जितुभाई शहा, नीरज रावलिया, गुलशन होडे, संदीप कोयटे, सौ. शोभा दरक, सौ. श्वेता अजमेरे, समता स्कूलच्या अन्नपूर्णा सौ.सुहासिनी कोयटे आदींसह विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. वार्षिक स्नेहसंमेलन व बक्षीस वितरण सोहळा यशस्वीतेसाठी शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 1 1 4 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे