आमदार आशुतोष काळे व ओमप्रकाश कोयटे समवेत व्यापारी आणि शासकीय अधिकारी बैठक संपन्न
आमदार आशुतोष काळे व ओमप्रकाश कोयटे समवेत व्यापारी आणि शासकीय अधिकारी बैठक संपन्न
🔥 आग न्यूज पोर्टल नेटवर्क
कोपरगाव —
कोपरगाव तालुक्यातील व्यापारी बांधवांच्या समस्या सोडवण्यासाठी आमदार मा.श्री. आशुतोषदादा काळे आणि ओमप्रकाश कोयटे यांनी व्यापारी महासंघाचे पदाधिकारी व प्रशासकीय अधिकारी यांची संयुक्त बैठक घेतली.
कोपरगाव तालुक्याच्या बाजारपेठेत सुधारणा व्हावी यासाठी आमदार मा.श्री. आशुतोषदादा काळे यांचे सतत प्रयत्न सुरु असून या बैठकीत त्यांनी व्यापाऱ्यांना येणाऱ्या समस्या समजून घेतल्या व सदर समस्या सोडवण्याबाबत प्रशासकीय अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.
यावेळी तहसीलदार संदीपकुमार भोसले, मुख्याधिकारी शांताराम गोसावी, पोलीस उपनिरीक्षक भरत दाते, राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे व व्यापारी महासंघाचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे, तुलसीदास खुबाणी, महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरम बागरेचा, सुधीरजी डागा, अमित लोहाडे,राजेंद्र बंब, चंद्रशेखर कुलथे, प्रदीप साखरे, प्रणव वाणी, हर्षल कृष्णाणी, निलेश चुडीवाल, अनुप पटेल, अमोल डागा, शाम उपाध्ये, प्रीतम बंब, नारायण अग्रवाल, शैलेश ठोळे, देवेश बजाज, नीरज गोधा, निलेश
वाणी, पियुष पापडीवाल, निलेश काले, राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष रमेश गवळी, माजी नगरसेवक मंदार पहाडे, राजेंद्र वाकचौरे, अजीज शेख, गौतम सहकारी बँकेचे माजी संचालक सुनील शिलेदार, वाल्मिक लहिरे, आकाश डागा, राजेंद्र आभाळे, नारायण लांडगे, योगेश वाणी, विकास बेंद्रे, अमोल आढाव, प्रथमेश वाणी आदींसह व्यापारी महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते.