Breaking
देश-विदेशब्रेकिंगमहाराष्ट्र

कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना आगामी गळीत हंगामात प्रती दिवस ६००० टनापेक्षा जादा प्रमाणात १० लाख टनाशिवाय अतिरिक्त ऊस गाळपातून ऊस उत्पादकांना विक्रमी स्वरूपात ऊस खरेदी दर देणार — आमदार आशुतोष काळे

संपादक - अरुण आहेर

0 0 1 6 8 3

कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना आगामी गळीत हंगामात प्रती दिवस ६००० टनापेक्षा जादा प्रमाणात १० लाख टनाशिवाय अतिरिक्त ऊस गाळपातून ऊस उत्पादकांना विक्रमी स्वरूपात ऊस खरेदी दर देणार — आमदार आशुतोष काळे

🔥 आग न्यूज पोर्टल

कोपरगांव : कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या दोन टप्प्यातील यशस्वी नूतन यांत्रिक – व्यवस्थापन, अत्याधुनिक आधुनिकीकरण व विस्तारिकरणांमुळे भावी काळात साखर आणि उपपदार्थांच्या अत्युच्च दर्जेदार उत्पादनातील वाढीने आपल्या कारखान्याच्या साखर विक्रीस आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय खाद्य उद्योगात साखर विक्रीची लाभधारक संधी लाभणार असून आपल्या ब्रॅड खाली साखर विक्री साठी युद्ध पातळीवर कारखाना प्रशासन कंबर कसील याचबरोबर प्रदुषण, विविध प्रकारच्या आर्थिक खर्चात होणाऱ्या बचतीचा लाभ आगामी गळीत हंगामात ऊस उत्पादकांना देणे शक्य होणार आहे.

यावर्षी प्रती दिवस ६००० टनापेक्षा जादा ऊस गळीत करून संपूर्ण गळीत हंगामात १० लाखांशिवाय अतिरिक्त ऊस गाळप करण्यात येईल.
सध्या कारखान्यास विविध प्रकारातील कारखाना आणि केंद्र व राज्य शासनाची बदलती धोरणे -नियोजित, आकस्मिक सामाजिक खर्च योगदान,कर्ज -व्याज फेड , भावी काळातील अत्यावश्यक अत्याधुनिक तंत्रज्ञान विकसित प्रकल्पांच्या खर्चाच्या तरतूदी, मजुर टंचाईतून येणाऱ्या आर्थिक समस्या तसेच आपल्या कारखान्यास कार्यक्षेत्रा बाहेरील दुर वरुन मोठ्या प्रमाणावर ऊस आणण्यासाठी लागणाऱ्या वाढीव खर्चामुळे ऊस उत्पादकांना राज्यातील प्रगत कारखान्याप्रमाणे भाव यावेळी आपण देवू शकत नसलो तरीही. यासाठी शेतकऱ्यांनी अत्याधुनिक विकसित तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्या कार्यक्षेत्रात आजच्या पेक्षा जादा ऊस उत्पादन वाढविण्यास सहकार्य केले तर आपणास राज्यात विक्रमी भाव देण्यास आम्ही बांधील असल्याची ठाम ग्वाही आमदार आशुतोष काळे यांनी दिली.
कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याची ७१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज माजी आमदार मा.श्री. अशोकदादा काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत व कारखान्याचे चेअरमन, आमदार मा.श्री. आशुतोषदादा काळे यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.

यावेळी बोलताना आमदार आशुतोष काळे पुढे म्हणाले, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना सभासद व शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करत असून कारखान्याची ऊस उत्पादक शेतकरी, तोडणी कामगार, वाहतूकदार, कर्मचारी, अशी कोणतीच देणी बाकी नाहीत. २०२३-२४ या आर्थिक वर्षात कारखान्यास निव्वळ नफा रुपये ३ कोटी १३ लाख ८४ हजार इतका झालेला असून ऑडिट वर्ग ‘अ’ मिळाला आहे. तसेच शेतकऱ्यांना ह्यावर्षी सर्वाधिक 3050 रुपये दर दिला असून दिवाळी सणाकरिता प्रती टनी १२५ रुपये देणार असल्याची माहिती आमदार आशुतोष काळे यांनी बोलताना दिली.

सद्य परिस्थितीतील तालुक्यातील विक्रमी विकास कामाविषयी बोलताना गत ४० वर्षाच्या कालखंडात विविध विकास कामे मागणी साठी कायम बंद, आंदोलनाने जनता त्रासली होती परंतु ग आपल्या पाच वर्षांच्या कारकिर्दीत आपण प्रत्येक गावातील नागरिकांच्या प्रत्यक्ष भेटीतून सतत राज्य व केंद्र शासनाकडे जिद्दीने सतत पाठपुरावा केल्यामुळे सर्वप्रकारचे प्रकल्प राबविण्यात यशस्वी ठरल्याने आपल्या काळात एकही विकास आंदोलन घडले नाही.कारण आमदारकी केवळ मिरवण्यासाठी नसल्याने मी सतत जनतेत मिसळलो . याचमुळे प्रथमच हजारो कोटी रुपयांचा विक्रमी निधी आणू शकलो.या दरम्यान मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे,अर्थ मंत्री नामदार अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सह सर्व मंत्र्यांचे उत्तम सहकार्य लाभले माझ्या पाठीशी कोपरगांव विधानसभा मतदारसंघातील जनतेचा एकमुखी पाठिंबा असल्थाची खात्री शासन कर्त्यांना पटली.ह्याबद्दल मी केंद्र व राज्य शासन आणि जनता यांचा आभारी आहे.

यावेळी कारखान्याचे व्हा. चेअरमन शंकरराव चव्हाण, माजी संचालक बाळासाहेब कदम, ज्ञानदेव मांजरे, विश्वासराव आहेर, पद्माकांत कुदळे, चंद्रशेखर कुलकर्णी, कारभारी आगवण, काकासाहेब जावळे, वसंतराव दंडवते, बाबासाहेब कोते, नारायण मांजरे, आनंदराव चव्हाण, एम.टी. रोहमारे, राजेंद्र गिरमे, मुरलीधर थोरात, अॅड. शंतनूधोर्डे, अॅड. विद्यासागर शिंदे, कारखान्याचे सर्व संचालक मंडळ, तसेच सर्व संलग्न संस्थांचे चेअरमन, व्हा. चेअरमन,संचालक, पदाधिकारी, जिल्हा परिषद – पंचायत समिती सदस्य, माजी नगरसेवक, कारखान्याचे प्रभारी कार्यकारी संचालक सुनील कोल्हे, आसवनीचे जनरल मॅनेजर ज्ञानेश्वर आभाळे, सेक्रेटरी बी.बी. सय्यद, असि. सेक्रेटरी संदीप शिरसाठ आदींसह कारखान्याचे सर्व विभाग प्रमुख पदाधिकारी व सभासद शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 1 6 8 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे