Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

नासिक शिक्षक विधान परिषद मतदारसंघ निवडणुकांतील २१ उमेदवारापैकी उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे ॲड.संदीप गुळवे, एकनाथ शिंदे शिवसेना पक्षाचे मावळते आमदार किशोर दराडे, अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांच्या चुरशीच्या तिरंगी लढतीत विवेक कोल्हे यांचा स्वकियाकडून राजकीय अभिमन्यू बनविण्याचा घाट ? ; महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे बंधू राजेंद्र विखे यांची अखेर माघार.

संपादक : अरुण आहेर

0 0 1 9 4 7

नासिक शिक्षक विधान परिषद मतदारसंघ निवडणुकांतील २१ उमेदवारापैकी उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे ॲड.संदीप गुळवे, एकनाथ शिंदे शिवसेना पक्षाचे मावळते आमदार किशोर दराडे, अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांच्या चुरशीच्या तिरंगी लढतीत विवेक कोल्हे यांचा स्वकियाकडून राजकीय अभिमन्यू बनविण्याचा घाट ? ; महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे बंधू राजेंद्र विखे यांची अखेर माघार.

 🔥 आग न्यूज पोर्टल

कोपरगांव : महसूलमंत्री नामदार राधाकृष्ण विखे व संबंधित पक्ष श्रेष्ठींच्या शिष्टाईने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ सिनेटर आणि प्रवरा अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ राजेंद्र विखे , कॉंग्रेसचे दिलीप पाटील, भाजप नेते धनराज विसपुते, यांनी माघार घेतली . परंतु भाजप माजी आमदार सौ. स्नेहलता कोल्हे यांचे सुपुत्र विवेक कोल्हे यांनी काही पक्षश्रेष्ठींच्या दबावाला झुगारून आपली उमेदवारी कायम ठेवली आहे.

याच पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य शासनाच्या विविध खात्यांचे अधिकाऱ्यांकडून याच काळात विवेक कोल्हे यांच्या संबंधातील अनेक संस्थावर चौकशी स्वरूपाच्या कारवाया करण्यात आल्याने केवळ शिक्षक मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज विवेक कोल्हे यांनी माघार न घेतल्याने लोकसभा निवडणुकीत पक्षफोडीच्या अनुभवातून जनतेत या. चौकशी कारवायात दबाव तंत्राचा संशय व्यक्त केला असतांना विवेक कोल्हे यांच्या बाबतीत सहानुभूती लाट पसरली आहे. करण्यात आल्याने
या मतदारसंघात विवेक कोल्हे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी कायम ठेवल्याचे दिसत आहे.

या मतदारसंघातील तीरंगतदार लढतीत ॲड. संदीप गुळवे यांच्या पाठीशी माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांचेसह महाविकास आघाडीचे खंबीर पाठबळ उभे आहे तर किशोर दराडे यांच्या पाठीशी मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे, छगन भुजबळ आणि महायुती यांनी आपली सर्व ताकदीनिशी प्रचारात आघाडी घेतली आहे. याशिवाय विवेक कोल्हे हे आपल्या नातेवाईक व पाच जिल्ह्यांतील सर्व सामान्य सहकाऱ्यांचे बळावर न डगमगता एकाकी झुंज देत असून त्यांचा अभिमन्यू बनवून राजकीय बळी घेण्याचा घाट महायुती – महाविकास आघाडीच्या राज्य व जिल्ह्यातील मातब्बर नेत्यांनी घातला आहे. यामुळे विवेक कोल्हे यांच्या बाबतीत सहानुभूती लाट पसरली आहे.

नगर जिल्ह्यातील उत्तरेच्या राजकारणात विखे -काळे विरुद्ध कोल्हे ह्या संघर्षाने अंतिम टोक गाठले असतांनाच हे कट्टर प्रतिस्पर्धी या निवडणुकीत गणेश सहकारी साखर कारखाना आणि लोकसभा पराभवाचा वचपा काढण्यासाठी पुन्हा एकत्र येत असतांना आमने सामने येणार होते. तसेच माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचे सुपुत्र विवेक कोल्हे यांनी नाशिक शिक्षक मतदारसंघातून आपला अपक्ष उमेदवारी कायम ठेवला असल्याने. त्यांना शह देण्यासाठी मंत्री राधाकृष्ण विखे यांचे बंधू , सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ सिनेटर आणि प्रवरा अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ डॉ. राजेंद्र विखे हे पदवीधर विधान परिषद मतदारसंघ निवडणुकीप्रमाणे सर्वं तयारी निशी या शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत उतरले होते परंतु मागील नासिक पदवीधर मतदार संघाचे निवडणुकीत डॉ. राजेंद्र विखे यांनी उमेदवारी करण्यासाठी सर्वं तयारी केली होती पण त्यांनी माघार घेतली याच वाटचालीची पुनरावृत्ती करून यावेळी डॉ. राजेंद्र विखे यांनी माघार घेतली असल्याने कोल्हे विरोधक विखे – काळे गट किशोर दराडे यांच्या पाठीशी उभे रहातील .

नाशिक विभागातील शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत २६ जूनला मतदान होणार आहे. माआमदार किशोर दराडेंकडून नाम सादृश्य अपक्ष उमेदवार किशोर दराडेंना निवडणुकीत अर्ज दाखल करु नये म्हणून त्यांना धक्काबुक्की करण्यात आली यावेळी ज्यांना धक्काबुक्की झाली ते कोपरगांव तालुक्यातील शिक्षक असल्याने विवेक कोल्हे यांनी मध्यस्थी करून त्यांना पोलीसांच्या ताब्यात दिले. या घटनेनंतर गायब झालेले किशोर दराडे यांनी अर्ज माघारीच्या दिवशी निवडणूक अधिकाऱ्यांपुढे हजर होऊन आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला.

दुसऱ्या घटनेत याच पद्धतीने ॲड. संदीप गुळवे यांनी नाम सादृश्य संदीप गुळवे यांच्या उमेदवारीबाबतीत हीच खेळी खेळल्याने दिंडोरी लोकसभा निवडणुकीतील भास्कर भगुरे पॅटर्न राबविण्याचा विरोधकांचा कुटील डाव अखेर फसला.

डॉ.विखेंच्या माघारीनंतर आता या मतदारसंघात महाविकास आघाडीचे संदीप गुळवे, महायुतीचे किशोर दराडे आणि अपक्ष विवेक कोल्हे यांच्यात तिरंगी लढत होणार आहे. आज अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी राजेंद्र विखे यांच्यासह एकूण पंधरा उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्याऩंतर २१ उमेदवार अजूनही रिंगणात आहेत. यापैकी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ॲड. महेंद्र भावसार राज्यातील मान्यताप्राप्त मातब्बर शिक्षक संघटनेचे अहिल्या नगर जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब कचरे, आदीसह उर्वरित १८ उमेदवारापैकी तीन उमेदवारांतच खरी लढत होणार आहे. या निवडणुकीत ३८ उमेदवारांनी ५३ अर्ज दाखल केल्यानंतर अर्ज छाननीत २ उमेदवार कमी वयाचे असल्याने त्यांचें अर्ज फेटाळले आहे. .

1/5 - (1 vote)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 1 9 4 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे