भारतीय स्वातंत्र्याच्या उगवत्या प्रतिकूल पार्श्वभूमीवर माजी आमदार स्व. कारभारी भिकाजी रोहमारे हे आपल्या अतुलनीय कामगिरीने राज्यातील ग्रामीण राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक , ग्रामीण साहित्य, सहकार , कृषी , ग्रामीण विकास आणि रोजगार , आर्थिक, शैक्षणिक क्षेत्रांच्या बळकटीकरणात अग्रदूत:– लोककवी प्रशांत मोरे
भारतीय स्वातंत्र्याच्या उगवत्या प्रतिकूल पार्श्वभूमीवर माजी आमदार स्व. कारभारी भिकाजी रोहमारे हे आपल्या अतुलनीय कामगिरीने राज्यातील ग्रामीण राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक , ग्रामीण साहित्य, सहकार , कृषी , ग्रामीण विकास आणि रोजगार , आर्थिक, शैक्षणिक क्षेत्रांच्या बळकटीकरणात अग्रदूत:– लोककवी प्रशांत मोरे
🔥 आग न्यूज पोर्टल नेटवर्क
*कोपरगाव :—*
भारतीय स्वातंत्र्याच्या१९४७ ते १९७२ या प्रतिकूल परिस्थितीतील रौप्यमहोत्सात ज्या महान तपस्वींनी आपल्या जीवनाची पूर्णाहुती देवून सहकार , शैक्षणिक, सामाजिक , आर्थिक, राजकीय ,सांस्कृतिक, कृषी , ग्रामीण विकास आणि रोजगार या क्षेत्रात जी क्रांती घडवून बळकटी आणली यात स्वातंत्र्य सेनानी माजी आमदार स्वर्गीय कारभारी भिकाजी रोहमारे हे अग्रदूत असल्याचे गौरवोद्गार राज्यातील प्रसिद्ध लोककवी प्रशांत मोरे यांनी के. जे. सोमय्या महाविद्यालयातील स्वर्गीय साखरबेन सोमय्या सभागृहात माजी आमदार स्वर्गीय के , बी. रोहमारे पुण्यस्मरण व भि. ग . रोहमारे ग्रामीण साहित्य पुरस्कार सोहळ्यात बोलताना काढले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटी अध्यक्ष अशोक रोहमारे होते
भि.ग.रोहमारे ग्रामीण साहित्य पुरस्कारांचे ३५ व्या सोहळ्यात सन २०२२ या वर्षातील संपूर्ण महाराष्ट्रातील ग्रामीण प्रकाशित साहित्यामधून उत्कृष्ट ग्रामीण साहित्यापैकी
नागू विरकरांची हेडाम (कादंबरी) गणपत जाधव यांचा हावळा (कथासंग्रह ), आप्पासाहेब खोत यांचा काळीज विकल्याची गोष्ट ( कथासंग्रह ) मनीषा पाटील यांचा नाति वांझ होतांना (ग्रामीण कविता संग्रह ) प्रवीण पवार यांचा भुई आणि बाई ( कविता संग्रह ), डॉक्टर रवींद्र कानडजे यांच्या शेतकरी जीवन संघर्ष ऐतिहासिक समर्पण परामर्श ( समीक्षा ) आणि डॉक्टर मारुती घुगे यांच्या १८८० पूर्वीची ग्रामीण कविता प्रयत्न आणि ग्रामीण प्रवृत्ती (समीक्षा ) या ग्रंथांच्या लेखक,कवी, साहित्यिकांना राज्य पातळीवरील भि. ग रोहमारे पुरस्काराने उपस्थित मान्यवरांचे शुभ हस्ते गौरविण्यात आले .
यावेळी बोलताना लोक कवी प्रशांत मोरे यांनी आपल्या भाषणातून आमदार स्वर्गीय के. बी.रोहमारे यांनी भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत १९४७ ते१९७२ या रौप्यमहोत्सवी वर्षात कोपरगावच नव्हे तर राज्यातील ग्रामीण जनतेसाठी राज्य पातळीवरील दुसऱ्या क्रमांकाचा गोदावरी खोरे सहकारी खरेदी विक्री संघ , अहमदनगर जिल्हा सहकारी बँक, प्रवरा, कोपरगाव, गणेश, संजीवनी सहकारी साखर कारखाने उभारण्यात सिंहांचा वाटा उचलता़ना सौमय्या उद्योग समूहाचे तीन साखर कारखान्यांना पाठबळ दिले. यामुळे कोपरगाव आणि श्रीरामपूर तालुके भारतातील कॅलिफोर्निया असल्याचे गौरवोद्गार भारताचे पहिले पंतप्रधान नाम. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी ५०वर्षापूर्वी जाहिररित्या काढले. संपूर्ण महाराष्ट्रात कृषी क्षेत्रात कोल्हापूर नंतर दुसरे स्थान मिळवले या काळात कृषी विकास, ग्रामीण विकास याकरता त्यांनी सर्वस्व पणाला लावताना कोपरगांव तालुक्यात पहिले के.जे. सोमय्या महाविद्यालय, शारदा इंग्लिश मिडियम स्कूल यांची उभारणी केली. आज ह्या संस्था महाराष्ट्रातील नामवंत शिक्षण संस्थात गणल्या जातात . हे भूषणावह आहे.
याचबरोबर ते एवढ्यावरच थांबले नाहीत . आपल्या राजकीय कारकीर्दीत आमदारकीच्या माध्यमातून अनेक प्रकल्पांची निर्मिती केली स्वर्गीय के, बी . रोहमारे ह्यांचे नेतृत्व,दातृत्व ,कर्तृत्व महानत्व महान युगपुरुषां समान होते त्यांच्या अतुलनीय महान कार्याचा वारसा अशोक व रमेश आणि रोहमारे कुटुंबिय ,के. जे. सोमय्या महाविद्यालयातील पदाधिकारी , हितचिंतक,प्राचार्य, प्राध्यापक शिक्षकेतर अधिकारी व कर्मचारी,विद्यार्थी यशस्वीपणे राबवित आहेत याबद्दल या सर्वांचे मी अभिनंदन करतो
स्वर्गीय के.बी. रोहमारे यांनी वंचित ग्रामीण साहित्याचे प्रसार , प्रोत्साहन आणि बळकटीकरणासाठी आपले पिताश्रींच्या स्मरणार्थ भि. ग. रोहमारे टस्ट्र माध्यमातून ग्रामीण साहित्य पुरस्कार देणारी अख़ंडीत कार्याबद्दल महाराष्ट्रातील साहित्यिकांसाठी एक ईश्वरी देण आहे
स्वर्गीय के.बी . रोहमारे नगर जिल्ह्यासह महाराष्ट्रातील विकासासाठी चंदनासारखे झिजले व त्यांनी आपल्या विविध कार्यातून प्रत्येक क्षेत्रात मार्गदर्शक दीपस्तंभ उभे केले दादांचे व्यक्तिमत्व हे आदरणीय वंदनीय असल्याने त्यांचे कार्याचे वारसा आपण सर्वांनी जोपासावा असे त्यांनी शेवटी कळकळीचे आवाहन केले
यावेळी अध्यक्षपदावरून बोलताना कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटी अध्यक्ष अशोक रोहमारे यांनी
संपूर्ण जगाचा पोशिंदा असलेल्या शेतमजूर,बारा बलुतेदार,शेतकऱ्यांच्या ग्रामीण जीवनातील वास्तवता जगाच्या वेशीवर टांगणाऱ्या ग्रामीण साहित्याला नव संजीवनी व शाबासकीची पाठीवरील थाप देणारे पुरस्कार भि.ग .रोहमारे ग्रामीण साहित्य पुरस्कार हे नवनवीन साहित्यिकांना सबल बनविणारे दीपस्तंभ ठरले असून ग्रामीण शेतकरी शेतमजूर शेती नांगरणी पेरणी खुरपणी पशुपक्षी आदी निसर्ग सौंदर्यातील गाव गाड्यांच्या करामती, अन्याय, अत्याचाराने ग्रासलेल्या अर्धवट आणि अशिक्षित ग्रामस्थाचे वास्तवता कृषी संस्कृतीचे वास्तव चित्रण साहित्य रूपात साकरणाऱ्या कथाकार कवी समीक्षाकांना ग्रामीण महाराष्ट्रातील एकमेव पुरस्काराचे मोल फार मोठे आहे याचे भान व गरज ओळखून रोहमारे कुटुंबियांनी हे पुरस्कार कायमस्वरूपी देण्याचा ठाम निर्णय घेतला आहे .
या कार्यात प्रथम पासूनच आजही के. जे. सोमय्या महाविद्यालयातील पदाधिकारी, हितचिंतक,प्राचार्य,प्राध्यापक, शिक्षकेतर अधिकारी कर्मचारी , राज्यातील ग्रामीण साहित्य परीक्षकांच्या उत्तम सहकार्याने आम्हास यश लाभत असल्याने भावी काळातही आपणा सर्वांच्या सहकार्याने कायमस्वरूपी दरवर्षी राबवूअशी ठाम ग्वाही कार्यक्रम समारोप प्रसंगी दिली.
या कार्यक्रमात या कार्यक्रमात कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे सचिवॲड.संजीव कुलकर्णी , संजीव कोद्रे , ॲड संजीव भोकरे , संदिप रोहमारे, भि.ग., रोहमारे ट्रस्टचे सचिव रमेश रोहमारे, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना संचालक ॲड. राहुल रोहमारे , चंद्रशेखर कुलकर्णी, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत आमरे , लक्ष्मण महाडिक माधवराव खिलारी, रोहिदास होन, डॉ. मारुती घुगे आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रारंभी आपल्या प्रास्ताविकात प्राचार्य डॉ.बी.एस. यादव यांनी के.जे. सोमय्या महाविद्यालयातील स्थापनेपासून आजपर्यंतच्या विविध क्षेत्रातील यशस्वी प्रगतीचा आढावा घेतला.
या कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी भि.ग.रोहमारे ग्रामीण साहित्य पुरस्कार ट्रस्ट कार्यवाह डॉक्टर गणेश देशमुख ,सहकार्यवाह डॉ. संजय दवंगे ,महाविद्यालय रजिस्टर डॉक्टर अभिजीत नाईकवाडे ,आबासाहेब कोकाटे , सर्व प्राध्यापक व प्राध्यापकतेर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर शैलेंद्र बनसोडे व आभार प्रदर्शन प्राध्यापिका वर्षा आहेर यांनी केले