Breaking
देश-विदेशब्रेकिंगमहाराष्ट्र

गौतम पॉलीटेक्निक इन्स्टिट्यूटमधील प्रथम वर्ष प्रवेश सुविधा केंद्राचा लाभ घ्यावा – प्राचार्य सुभाष भारती

संपादक - अरुण आहेर

0 0 4 0 3 7

गौतम पॉलीटेक्निक इन्स्टिट्यूटमधील प्रथम वर्ष प्रवेश सुविधा केंद्राचा लाभ घ्यावा – प्राचार्य सुभाष भारती

 🔥 आग आणि दैनिक गणेश श्रध्दा न्यूज पोर्टल

कोपरगाव – अभियांत्रिकी शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीच्या गौतम पॉलीटेक्निक इन्स्टिटय़ूटमध्ये शासनाच्या वतीने प्रथम वर्ष प्रवेश घेण्यासाठी २० मे २०२५ पासून सहाय्य केंद्र सुरू करण्यात आले असल्याची माहिती प्राचार्य सुभाष भारती यांनी दिली आहे.

गौतम पॉटेक्निक इन्स्टिटय़ूटमध्ये स्वाधीनतेने प्रवेश घेण्याची सुविधा प्रदान केली आहे . सर्व गोष्टींचा विचार करून महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षणालयाच्या ठिकाणी प्रवेश घेवू, इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आमदार आशुतोष काळे यांनी राज्य शासनाकडे सतत पाठपुरावा केल्यानंतर या केंद्रास मान्यता मिळाली आहे.पॉलिटेक्निक मधील आपले प्रथम वर्ष प्रवेशासाठी आवश्यक असणा-या आपल्या कागदपत्रांसह माहिती देवून आपला वैधानिक स्वरूपात प्रवेश निश्चित करावा.

या केंद्रातून सादिक शेख, जुबेर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली संस्था व शाखा निवडीचे पर्याय निवडीच्या फे-या व प्रवेश घेवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्याला हवे असलेले शैक्षणिक संकुल व विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा असलेल्या शाखा निवडी साठी नवीन नियमावलीनुसार विविध पर्याय ,पर्यायी पसंती आदि बाबींची व्यापक माहिती या केंद्रात देण्यात येणार असल्याचे सुपरिटेंडेंट आण्णासाहेब बढे यांनी सांगितले आहे.

या सुविधा केंद्राचा जास्तीत जास्त लाभ घेवून विद्यार्थ्यांचे उज्वल भविष्य घडवून आणावे असे आवाहन संस्था निरीक्षक प्रा.नारायण बारे यांनी केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 4 0 3 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे