आत्मा मालिक रुग्णालयात भव्य सर्व रोग निदान व रक्तदान शिबीर ; १८ ते २१ जुलैला आयोजित – नंदकुमार सुर्यवंशी, अध्यक्ष
संपादक - अरुण आहेर
आत्मा मालिक रुग्णालयात भव्य सर्व रोग निदान
व रक्तदान शिबीर ; १८ ते २१ जुलै ला आयोजित — नंदकुमार सुर्यवंशी, अध्यक्ष
🔥 आग न्यूज पोर्टल
कोपरगांव : अहिल्या नगर ते मनमाड राष्ट्रीय महामार्गावरील कोपरगांव तालुक्यातील परमपूज्य आत्मा मालिक माऊलींच्या कृपाशीर्वादासह विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट आयोजित अहिल्या नगर ते मनमाड राष्ट्रीय महामार्गावरील कोपरगांव तालुक्यातील आत्मा मालिक रूग्णालयात गुरु पौर्णिमा पावन मुहूर्तावर भव्य रक्तदान शिबिर व भव्य सर्व रोगनिदान शिबिर आयोजित केले आहे.
शिबीर १८ ते २१ जुलै ह्या दरम्यान घेण्यात येणार आहे. सदर सर्व रोग निदान शिबिर १८,१९,२०,२१ जुलै व रक्तदान शिबिर १९, २०, २१ जुलै या दरम्यान घेण्यात येणार आहे. सदर सर्व रोग निदान शिबिरा अंतर्गत आपण विविध प्रकारच्या आजारांची चाचणी करू शकतात या शिबिरामध्ये उपलब्ध विशेष तज्ञांच्या मदतीने आपल्या आरोग्याची चाचणी केली जाईल. या शिबिरात भाग घेण्यासाठी कृपया आपले वैद्यकीय रेकॉर्ड तपशील अशा माहितीची एक प्रत घेऊन येणे या शिबिरांतर्गत ओपीडी तपासणी व बीपी – शुगर तपासणी मोफत करण्यात येणार असून उर्वरित सगळ्या वैद्यकीय तपासण्यांवर ५० % सवलत देण्यात येणार आहे.
तरी गुरुपौर्णिमा निमित्त आलेल्या भाविकांनी मोठ्यात मोठ्या संख्येने व परिसरातील नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन आत्मा मालिक संस्थान अध्यक्ष नंदकुमार सुर्यवंशी यांनी केले आहे. तसेच याचवेळी हॉस्पिटल व्यवस्थापनाकडून आयोजित केलेल्या रक्तदान शिबीरामध्ये मोठ्यात मोठ्या संख्येने परिसरातील नागरिकांनी भाविकांनी कर्मचाऱ्यांनी रक्तदान शिबिरा मध्ये सहभाग नोंदवावा असे आवाहन देखील केले आहे.