संजीवनी ग्रामीण विद्यापीठाच्या संजीवनी सैनिकी स्कूल अँड ज्यु.कॉलेजने पाव शतकात अत्याधुनिक तंत्र ज्ञान अवलंबन करुन *राज्यातील विश्वासार्ह सैनिकी शिक्षण देणारे अग्रेसर केंद्राचे स्थान पटकावले- श्री बिपीनदादा कोल्हे

संजीवनी ग्रामीण विद्यापीठाच्या संजीवनी सैनिकी स्कूल अँड ज्यु.कॉलेजने पाव शतकात अत्याधुनिक तंत्र ज्ञान अवलंबन करुन *राज्यातील विश्वासार्ह सैनिकी शिक्षण देणारे अग्रेसर केंद्राचे स्थान पटकावले- श्री बिपीनदादा कोल्हे
कोपरगाव —
अविरतपणे कर्मयोगी शंकरराव कोल्हे यांनी स्थापन केलेल्या संजीवनी ज्युनिअर सैनिक कॉलेजने अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि विकसित सैनिक शिक्षण प्रणालीच्या बळावर अशासकीय क्षैत्रात राज्यात अव्वल स्थान पटकावतांना देश-परदेशात विविध क्षेत्रात सर्वगुणसंपन्न सक्षम अधिकारी बनवून राज्यात जनसामान्य जनतेत विश्वासहर्ता मिळविली असून एवढ्या शांततेत माजी विद्यार्थी मेळावा पार पडणे म्हणजे सैनिकी शाळेत रूजविलेली शिस्त आजही जिवंत आहे, याचा मला मनस्वी आनंद होत आहे. सैनिकी शिक्षण म्हणजे केवळ शिस्त नव्हे तर आयुष्याला दिशा देणारी प्रेरणा आहे. माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी ग्रामीण भागातील युवकांना सैनिकी शिक्षण मिळण्याच्या हेतुने २००० सालात ही शाळा सुरू केली. आज येथे आलेल्या माजी विद्यार्थ्यांच्या कार्याचा आढावा घेतला तर अनेक जण उच्च पदस्थ आहे. यावरून संजीवनी सैनिकी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज हे राज्यातील सैनिकी शिक्षण देणारे एक अग्रेसर केंद्र असल्याचे अधोरेखित होत असल्याचे गौरवोद्गार संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष श्री बिपीनदादा कोल्हे यांनी केले.

संजीवनी सैनिकी स्कूल अँड ज्यु.कॉलेज आयोजीत नुकत्याच संपन्न झालेल्या माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्यात श्री बिपीनदादा कोल्हे हे अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे विश्वस्त श्री सुमित कोल्हे, नॉन अकॅडमिक डायरेक्टर श्री डी. एन. सांगळे, प्राचार्य कैलास दरेकर व श्री असिफ सय्यद, उपस्थित होते. या मेळाव्यास पंतप्रधान निवासाचे सुरक्षा अधिकारी, उपजिल्हाधिकारी, भारतीय वायुसेनेचे विंग कमांडर, पोलीस अधिकारी, चार्टर्ड अकौंटंट, वैद्यकिय अधिकारी, प्रगतषिल शेतकरी, अशा सुमारे २५० माजी विद्यार्थ्यांनी हजेरी लावुन आपल्या पुर्व स्मृतिंना उजाळा दिला.

मेळावा सुरू होण्याच्या अगोदर संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे अध्यक्ष श्री नितिनदादा कोल्हे यांनी माजी विद्यार्थ्यांच्या भेटी घेवुन त्यांची विचारपुस केली व त्यांना भावी आयुष्यास शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते अमर जवान स्मारकास मानवंदना देण्यात आली, त्यांनंतर संस्थेचे संस्थापक स्व. शंकरराव कोल्हे यांच्या प्रतिमेचे पुजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी प्राचार्य दरेकर यांनी सर्वांचे स्वागत करून संस्थेने विविध क्षेत्रात वेगवेगळे स्थापित केलल्या कीर्तिमानांची माहिती देवुन उपस्थितांची दादा मिळविली. तसेच श्री नितिनदादा कोल्हे, श्री बिपिनदादा कोल्हे व मॅनेजिंग ट्रस्टी श्री अमित कोल्हे, विश्वस्त श्री सुमित कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली या संस्थेची प्रगती अधिक गतिमान होईल, असे सांगीतले.

श्री बिपीनदादा कोल्हे पुढे म्हणाले की सध्या पालकही मुलांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी सैनिकी शाळांची निवड करीत आहेत. संरक्षण क्षेत्रात करिअर घडण्यासाठी तसेच जबाबदार नागरीक घडविण्यासाठी अशी शिक्षण संस्था आवश्यक आहे. माजी विद्यार्थ्यांनी आपले अनुभव व ज्ञान शाळेसाठी द्यावे, जेणेकरून नविन विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळेल. आयुष्यात ईर्षा नको तर निकोप स्पर्धा हवी, अडचणींवर मात करून ध्येय गाठा.शालेय जीवन हे सुवर्णमय असते . या मैत्रिचा व स्नेहाचा धागा कायम ठेवावा. तुम्हाला जे आवडते ते करा, अन्यथा जे मिळेल ते आवडण्यास भाग पाडले जाईल, असा संदेश श्री बिपीनदादा कोल्हे यांनी शेवटी दिला.
श्री सुमित कोल्हे या प्रसंगी बोलताना म्हणाले की माजी विद्यार्थ्यांच्या उत्स्फुर्त प्रतिसादामुळे स्व. शंकरराव कोल्हे यांच्या दुरदृष्टीचा प्रत्यय येतो. या सर्व माजी विद्यार्थ्यांच्या सहकार्याने ही संस्था लष्करी शिक्षणाचे प्रथम क्रमांकाचे केंद्र बनेल आणि देश सेवेत उच्च अधिकारी बनतील.

यावेळी माजी विद्यार्थी व बजाज ऑटो लि चे विभागीय व्यवस्थापक श्री समिर नरवडे म्हणाले की आमच्या आयुष्याला दिशा देण्याचे काम शाळेने केले. श्री रोशन दराडे म्हणाले की शाळेने रूजविलेली मुल्ये आजही आम्ही जपत आहे. उपशिक्षणाधिकारी श्री सुरज वागस्कर म्हणाले की आम्ही सर्व वेगवेगळ्या क्षेत्रात नेतृत्व करीत आहोत. शारीरिक तंदुरूस्ती, कष्टाची सवय, आदर्श जीवनशैली आणि निर्व्यसनीपनाची प्रेरणा येथुनच मिळाली. शाळेतील रनगाडा, तोफा, अमर जवान स्मारक पाहुन मन भारतीय शौर्याने भरून गेले आहे







