Breaking
आरोग्य व शिक्षणदेश-विदेशब्रेकिंगमहाराष्ट्र

गत ६० वर्षात करमसी जेठाभाई सोमैय्या (वरिष्ठ) आणि कारभारी भिमाजी रोहमारे (कनिष्ठ) महाविद्यालयाने महिला सन्मान, समान संधी, महिला सुरक्षितत़ेला डोळ्यात तेल घालून जपल्यानेच दरवर्षी विद्यार्थिनींचा प्रवेश विक्रमी स्वरूपात — अध्यक्ष अशोक रोहमारे

संपादक - अरुण आहेर

0 0 1 7 0 4

गत ६० वर्षात करमसी जेठाभाई सोमैय्या (वरिष्ठ) आणि कारभारी भिमाजी रोहमारे (कनिष्ठ) महाविद्यालयाने महिला सन्मान, समान संधी, महिला सुरक्षितत़ेला डोळ्यात तेल घालून जपल्यानेच दरवर्षी विद्यार्थिनींचा प्रवेश विक्रमी स्वरूपात — अध्यक्ष अशोक रोहमारे

कोपरगांव – गत साठ वर्षांपासून महाविद्यालयात अंतर्गत शैक्षणिक गुणवत्ता, विद्यार्थी -विद्द्यार्थ्यीनी कौशल्य सुप्त गुण पारखून या गुणांना परिपूर्णत्व प्राप्त करून देण्याचे बहुमुल्य कार्य गत साठ वर्षांपासून गोदातरंग वार्षिक विशेषांकाने केले आहे.
याशिवाय आमच्या महाविद्यालयांनी गत साठ वर्षांपासून महिला सन्मान, समान संधी आणि महिला सुरक्षितता कायम डोळ्यात तेल घालून जपल्यानेच या महाविद्यालयात दरवर्षी मुलींच्या प्रवेशात विक्रम घडवित असल्याचे गौरवोद्गार कोपरगांव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोक रोहमारे यांनी महाविद्यालयाने वाढत्या महिला अत्याचारांच्या पार्श्वभूमीवर गोदातरंग भारतीय महिला सुरक्षा विशेषांकाचे प्रकाशन शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांच्या शुभहस्ते कार्यक्रम प्रसंगी अध्यक्ष पदावरून बोलतांना काढले .

यावेळी प्रमुख पाहुणे आणि उदघाटक शिर्डी उपविभागीय पोलिस अधिकारी शिरीष वमने यांनी महिला सुरक्षा कायदा, पोलीस ,व समाज जबाबदारी यासंदर्भात मार्गदर्शन करतांना, “२१ वे शतक हे माहिती तंत्रज्ञानाचे आणि जागतिकीकरणाचे युग आहे. सोशल मीडियाच्या क्षेत्रातील अचंभित करणारी प्रगती ही कधी कधी चिंता करायला लावणारी आहे. व्हाट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम, ब्लॉग, अशा ॲपसमुळे युवकांमध्ये वाढलेली कनेक्टिव्हिटी आज पदोपदी दिसून येते. त्याचे फायदे जरी असले तरी काही तोटे देखील आहेत. सायबर क्राईम हा त्याचाच एक दुष्परिणाम होय.

महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर करमसी जेठाभाई सोमैय्या जे.सोमैया महाविद्यालयाने प्रकाशित केलेला ‘गोदातरंग’ वार्षिकांकाचा ‘भारतीय महिला सुरक्षा विशेषांक’ आज माझ्या हस्ते प्रकाशित होतो आहे, ही माझ्यासाठी मी सुवर्णसंधी समजतो असे प्रतिपादन शिर्डी विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांनी येथे केले. स्थानिक के. जे. सोमैया वरिष्ठ व के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या वतीने आयोजित ‘गोदातरंग’ प्रकाशन सोहळ्याचे प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते.

मा. वमने पुढे म्हणाले की, “गोदातरंगचा भारतीय महिला सुरक्षा विशेषांक मी संपूर्ण चाळला. मुखपृष्ठापासून ते मलपृष्ठापर्यंत अंकाची मांडणी समर्पक , यातील संपूर्ण लेख प्रबोधन नव्हे तर मानसिकता परिवर्तन करणारे असल्याने निश्चित विद्यार्थी – विद्यार्थीनी, पालक यांना सामाजिक जिवनात दिपस्तंभ ठरणारा असल्याने सर्वांनी या अंकातील विचार आपल्या रक्तमांसात भिनविण्याचे कळकळीचे आवाहन केले.

या कार्यक्रमातील मान्यवरांचे स्वागत करताना महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रो. (डॉ.) व्ही. सी. ठाणगे म्हणाले की, “‘गोदातरंग’ वार्षिकांकाला गेल्या साठ वर्षांची सोनेरी परंपरा लाभलेली आहे. या अंकाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमधून अनेक लेखक, कवी आणि पत्रकार देखील घडलेले आहेत. अंकाच्या संपादकांची परंपरा देखील मोठी आहे. ना. स. फरांदे, प्रा.अनिल सोनार, डॉ. वासुदेव मुलाटे, न. र. गुळगुळे आदी अनेक मान्यवर प्राध्यापकांनी या अंकाचे संपादन करून नावलौकिक प्राप्त करून दिलेला आहे. आजही ही परंपरा अखंडपणे सुरू आहे असे अभिमानाने सांगावे असे वाटते.” याप्रसंगी मान्यवरांच्या शुभ हस्ते ‘गोदातरंग’ च्या ‘भारतीय महिला सुरक्षा विशेषांकाचे’ दिमाखात प्रकाशन करण्यात आले. तसेच मान्यवरांच्या शुभहस्ते संपादक मंडळाचा आणि शैक्षणिक क्षेत्रात विशेष कामगिरी करणाऱ्या डॉ. बापूसाहेब भोसले, डॉ. शैलेंद्र बनसोडे, श्री.एम. व्ही. कांबळे आणि यशस्वी क्रीडापटू विद्यार्थ्यांचाही यथोचित सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना प्रमुख संपादक प्रो. (डॉ.) जिभाऊ मोरे म्हणाले की, “विद्यार्थ्यांच्या सुप्त प्रतिभांना वाव देण्यासाठी महाविद्यालयाच्या वतीने सातत्याने ‘गोदातरंग’ वार्षिकांक प्रकाशित केला जातो. या माध्यमातून आजपर्यंत ‘स्त्रीभ्रूण-हत्या’, ‘संत साहित्य’, ‘समाज माध्यमे’, ‘कोरोना महामारी’, ‘के. बी. रोहमारे जन्मशताब्दी’, ‘जागतिक तापमानवाढ’, ‘हवामान बदल’ आदी अनेक विशेषांक प्रकाशित करण्यात आले आहेत. त्यातील अनेक अंकांना आकर्षक पारितोषिके देखील प्राप्त झालेली आहेत.”

अंकाचे विभागीय संपादक प्रो. (डॉ.) संजय अरगडे यांनी उपस्थितांचे आभार मानले, तर इंग्रजी विभागाच्या संपादक प्रा. वर्षा आहेर यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. संपत आहेर, डॉ. रवींद्र जाधव, प्रा. रावसाहेब गायकवाड, रजिस्टर डॉ. अभिजीत नाईकवाडे आदींनी विशेष परिश्रम घेतले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 1 7 0 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे