Breaking
ब्रेकिंग

के. जे. सोमैया महाविद्यालयातील 64 विद्यार्थ्यांची निवड

0 0 1 6 7 8

के. जे. सोमैया महाविद्यालयातील 64 विद्यार्थ्यांची निवड

🔥 आग न्यूज पोर्टल नेटवर्क

कोपरगाव :- स्थानिक के.जे. सोमैया वरिष्ठ महाविद्यालयाच्या प्लेसमेंट विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या कॅम्पस इंटरव्यू मध्ये महाविद्यालयातील 64 विद्यार्थ्यांची पुण्यातील एपिक सर्व्हिसेस या नामांकित कंपनीमध्ये निवड करण्यात आली आहे अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एस. यादव व प्लेसमेंट सेलचे प्रमुख प्रो.(डॉ.) एस.आर.पगारे यांनी दिली. ऑनलाईन मुलाखतीत एपिक सर्व्हिसेस पुणे येथील मानव संसाधन विभागाचे प्रमुख यास्मिन शेख ह्या उपस्थित होत्या. या निवडीचे वैशिष्ट्य म्हणजे या सर्व विद्यार्थ्यांना पदवी परीक्षेपूर्वीच आपली नियुक्ती पत्रेही कंपनीच्या वतीने महाविद्यालयाकडे सुपूर्द करण्यात आली आहे.

सदर विद्यार्थ्यांनी वार्षिक परीक्षेच्या समाप्तीनंतर नियुक्त झालेल्या पदावर रुजू व्हायचे आहे. निवड झालेले विद्यार्थी तृतीय वर्षातील आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना एवढ्या मोठ्या प्रमाणावर रोजगाराची संधी उपलब्ध करून देणारे हे एकमेव महाविद्यालय आहे.

महाविद्यालयातील प्लेसमेंट विभागाच्या वतीने आजपर्यंत विविध कंपन्यांचे कॅम्पस इंटरव्यू झालेले असुन त्यामध्ये अनेक विद्यार्थ्याना रोजगाराची संधी उपलब्ध झालेली आहे. महाविद्यालयातील ट्रेनिंग व प्लेसमेंट सेलअंतर्गत विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे कौशल्य-प्रशिक्षण दिले जाते. त्यांच्याकडून मुलाखतीची तयारी करून घेतली जाते आणि त्यानंतरच विविध कंपन्यांचे मानव संसाधन अधिकारी यांना महाविद्यालयात आमंत्रित करून अशा प्रकारचे प्लेसमेंट ड्राईव्ह चे आयोजन केले जाते.

प्लेसमेंट विभागातून निवड झालेल्या या सर्व विद्यार्थ्यांचे कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा.अशोकराव रोहमारे, सचिव मा. ॲड. संजीवदादा कुलकर्णी, विश्वस्त मा. संदीपराव रोहमारे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.एस.यादव यांनी अभिनंदन केले. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास डोळ्यासमोर ठेवून रोजगार प्राप्त करून देण्यामध्ये महाविद्यालयाचा प्लेसमेंट विभाग सतत अग्रेसर असतो.

या कॅम्पस इंटरव्यू च्या सफल आयोजनामध्ये या सेलचे प्रमुख प्रो. (डॉ.) एस.आर.पगारे, प्रो.(डॉ) व्ही.सी. ठाणगे, डॉ.जी.के. चव्हाण, डॉ. एन.टी. ढोकळे, डॉ. सुरेखा भिंगारदिवे इत्यादी प्राध्यापकांनी विशेष परिश्रम घेतले. निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांवर पंचक्रोशीतून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 1 6 7 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे