Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

महाराष्ट्रात २६ जूनला ४ विधान परिषद जागांसाठी मतदान तर १ जुलैला मतमोजणी होणार ; नासिक विधान परिषद मतदारसंघ निवडणुकीत विखे – कोल्हे – आमदार दराडे – टीडीएफचे कचरे यांचे भवितव्य टांगणीला!!

संपादक - अरुण आहेर

0 0 1 9 4 7

महाराष्ट्रात २६ जूनला ४ विधान परिषद जागांसाठी मतदान तर १ जुलैला मतमोजणी होणार ; नासिक विधान परिषद मतदारसंघ निवडणुकीत विखे – कोल्हे – आमदार दराडे – टीडीएफचे कचरे यांचे भवितव्य टांगणीला!!

🔥 आगन्यूज पोर्टल.9096664533 arun aher 4321@gmail.com

कोपरगांव : लोकसभा निवडणुकीपाठोपाठ महाराष्ट्रात 26 जूनला 4 जागांसाठी मतदान होणार आहे तर 1 जुलैला मतमोजणी होणार आहे. मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर, कोकण शिक्षक आणि नाशिक पदवीधर या चार जागांसाठी मतदान घेण्यात येणार असल्याचे भारतीय निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे.

आधी या ठिकाणी 10 जून रोजी मतदान तारीख जाहीर करण्यात आली दरम्यान काही दिवसांपुर्वीच शाळांच्या उन्हाळी सुट्ट्या संपल्यानंतर ह्या निवडणूका घेण्यात याव्यात, अशा मागण्या आयोगाकडे करण्यात आल्यावर निवडणूक आयोगाकडून अपडेट वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे .

पदवीधर, शिक्षक निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. भारतीय निवडणूक आयोगाने यासंदर्भात माहिती दिली आहे. महाराष्ट्र विधानपरिषद पदवीधर, शिक्षक कार्यकाळ 7 जुलै रोजी संपत आहे. मुंबई पदवीधर सदस्य विलास पोतनीस, कोकण पदवीधर निरंजन डावखरे, नाशिक विभाग किशोर दराडे आणि मुंबई शिक्षक मतदार संघातून कपिल पाटील यांचा कार्यकाळ 7 जुलै रोजी संपुष्टात येत आहे.

नासिक विभागीय विधानपरिषद मतदारसंघ निवडणुकीत भाजप जेष्ठ नेत्यांनी विवेक कोल्हे यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतल्यावर भाजप पक्षादेश धुडकावून महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे यांचे बंधूं व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ सिनेटर प्रवरा अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ राजेंद्र विखे यांनी सोशल मीडिया मार्फत नासिक शिक्षक मतदारसंघ निवडणुकीतील उमेदवारी जाहीर केली. या निर्णयामुळे विखे – कोल्हे संघर्ष जोमाने पेटला आहे
मागील सन २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत अहिल्या नगर जिल्ह्यात विखेंनी पाच भाजप आमदारांचे पराभव घडवून आणले. यामध्ये कोपरगाव मधील विखेंच्या जवळच्या नातेवाईक व विजयाच्या उंबरठ्यावर असलेल्या आणि सन २०१४ च्या विधानसभा निवडणुकीतील विरोधीपक्ष उमेदवार आशुतोष काळे यांचा २९हजारापेक्षा मतांनी पराभव करणाऱ्या सौ.स्नेहलता कोल्हे यांचा सन २०१९ घ्या विधानसभा निवडणुकीत अवघ्या आठशेच्या मतांनी पराभूत करण्यासाठी हातभार लावला. व आमदार आशुतोष काळे यांना आमदार बनविले. संपूर्ण पाच वर्षे काळेंच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहात २०२४ घ्या विधानसभा निवडणुकीत विजयी करण्यासाठी कंबर कसली आहे. वास्तविक पाहता विखे कुटुंबियांची ही पहिलीच खेळी नाही. यापूर्वी पद्मश्री डॉ. बाळासाहेब विखे यांनी स्व कॉंग्रेस पक्षाचे खासदार कर्मवीर शंकरराव काळे यांच्या पाठीशी सर्व आमदार ,सहकारी संस्था असतांनाच विरोधातील कोपरगांव नगर परिषद निवडणुकीत अनामत रक्कम गमविणाऱ्या ॲड .भिमराव बडदे यांना खासदार विखेंनी निवडून आणले.

तसेच विधानसभा निवडणुकीत शिवसेना आमदार म्हणून स्वत:चे व्याही व स्व पक्ष शिवसेना उमेदवार नामदेवराव परजणे यांच्या प्रचारात शेवटी हात आखडता घेत शिवसेना खासदार पद्मश्री डॉ बाळासाहेब विखे पाटील यांनी नात्याने जावई असलेले कॉंग्रेस पक्षाचे उमेदवार शंकरराव कोल्हे यांच्या निवडीस हातभार लावला. यावेळी नामदेवराव परजणे अल्पशा मतांनी पराभूत झाले विधानसभा व लोकसभा निवडणुक मतदान एकाच दिवशी झाले तरीही खासदार बाळासाहेब विखे व नामदेवराव परजणे यांना मिळालेल्या मतांमध्ये प्रचंड तफावत कोपरगाव विधानसभा मतदारसंघ निवडणुकीतील मतदानात होती.

सन २००९ साली आर. पी. आय. राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांचा पराभव करणाऱ्या शिवसेना उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांना सन २०१४ साली कॉंग्रेस पक्षाचे तत्कालीन मंत्री राधाकृष्ण विखे यांनी भाऊसाहेब वाकचौरे यांना कॉंग्रेस पक्षाची उमेदवारी मिळवून दिली. परंतु यावेळी शिवसेना आमदार अशोक काळे यांनी मतदारसंघात बाहेरच्या नवख्या सदाशिव लोखंडे यांना निवडून आणले. सन २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत शेवटी भाऊसाहेब वाकचौरे यांनी उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेत प्रवेश करून आपल्या विजयाचा खंबीर पाया रचला आहे.

या पुर्नानुभवानुसार नासिक शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत भाजप उमेदवाराला अडचणीत आणण्यासाठी विखे कुटुंबियांचे डावपेचाने पक्षात नाराजीचे सूर उमटत आहेत. व भाजप ही जागा जिंकेल की नाही अशा संभ्रमात मतदार आहेत.
या विधानपरिषद मतदारसंघ निवडणुकीत विवेक कोल्हे, डॉ. राजेंद्र विखे, विधानपरिषद शिक्षक मतदारसंघ आमदार किशोर दराडे, राज्यातील मान्यताप्राप्त मातब्बर शिक्षक लोकशाही आघाडी (टी.डी.एफ ) चे अहमदनगर येथील भाऊसाहेब कचरे यांची उमेदवारी जाहीर केल्याने भाजप माजी जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड,विखे – कोल्हे -दराडे आणि कोपरगांव विधानसभा मतदारसंघात आशुतोष काळे यांच्या विजय वाटचालीत जटिल समस्या निर्माण झाली आहे

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 1 9 4 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे