Breaking
ब्रेकिंग

अध्यात्म व विज्ञानाचा संगम म्हणजेच भागवत — महंत रामगिरीजी महाराज.

0 0 1 1 6 3

अध्यात्म व विज्ञानाचा संगम म्हणजेच भागवत — महंत रामगिरीजी महाराज.

🔥 आग न्यूज पोर्टल नेटवर्क

श्री कृष्ण जन्मोत्सव नाट्यरूपाने साजरा होणार भाविकांना मिळणार अनोखी अनुभूती

कोपरगांव. — प्रतिकूल परिस्थीतीत समाधान मानायला शिका, मनांवर ताबा ठेवा, साधना कधी सोडू नका, अध्यात्म व विज्ञानाचा संगम म्हणजेच भागवत होय असे प्रतिपादन श्री गोदावरी धाम (सराला बेट) चे गुरुवर्य महंत रामगिरीजी महाराज यांनी केले.


सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे यांचे द्वितीय पुण्यस्मरण व ९५ व्या जयंती निमीत्त येथील तहसील कचेरी ज्ञानेश्वरमाऊली नगर मैदानावर सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे विचारधारा ट्रस्टच्या वतीने संगीतमय भागवत कथेचे आयोजन करण्यांत आले असुन त्याचे तिसरे पुष्प गुंफतांना ते बोलत होते.


ते पुढे म्हणाले की, साधुजवळ करूणा पाहिजे, वाईट विचार मनुष्याला नेहमीच हानीकारक असतात. आसन आणि श्वासावर विजय मिळवला की, मन स्थिर होते. हल्ली व्यसनाधिनता वाढत आहे त्यामुळे घरा-घरात कलह तयार होत आहे.

संगतीचे दुष्परिणाम नेहमीच अनेकांना त्रासदायक ठरतात. चांगल्या विचाराने चांगलेच होते, वाईट नेहमी घातकच असते., त्यातून मनुष्य दुराचाराकडे ओढला जातो.


भगवंत हा परमात्मा भक्तीप्रिय आहे. मनुष्याला संयमाने जग जिंकता येते तेंव्हा प्रत्येकाने जीवनांत संयमाला महत्व द्यावे, तो नसेल तर सगळं व्यर्थ आहे असे सांगत त्यांनी भागवत स्कंद पुराणातील अनेक गोष्टींचे सौदाहरण स्पष्टीकरण देत शिवस्तुतीने अनेकांना मंत्रमुग्ध करत भक्ताच्या भक्तीत भगवंताला खेचुन आणण्याची ताकद असल्याचे सांगितले.


सोमवारी आठवडे बाजार असल्याने भागवत कथा श्रावणासाठी कोपरगांव शहर, ग्रामीण भाग तसेच पुणतांबा, नाशिक, वैजापुर परिसरातील भाविकांची लक्षणीय उपस्थीती होती. गुरुवर्य महंत रामगिरी महाराज उर्वरीत चार दिवसात श्रीकृष्ण जन्म, गोवर्धन लिला, रुक्मीणी स्वयंवर, सुदाम चरित्र आदिबाबत विवेचन करणार आहेत. शेवटी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेकभैय्या कोल्हे यांनी आभार मानले.

उपस्थीत भाविकांनी संगिताच्या तलावर भगवंत भक्तीत तल्लीन होत नाचण्याचा मनमुराद आनंद लुटला. याप्रसंगी नयन मनोहर फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.

  १९ मार्चला कथेच्या चतुर्थ पुष्पात श्री कृष्ण जन्मोत्सव साजरा होणार असून या कथेचे नाट्यमय थेट सादरीकरण होणार असून वृंदावन येथील कलाकार यासाठी आलेले आहेत.भाविकांना अनोखी भक्ती पर्वणी या निमित्ताने मिळणार आहे.

 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 1 1 6 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे