Breaking
ब्रेकिंग

प्रत्येक यशस्वी प्रोजेक्टचे रूपांतर प्रॉडक्टमध्ये व्हावे- श्री नितिन कोल्हे

0 0 1 3 2 4

प्रत्येक यशस्वी प्रोजेक्टचे रूपांतर प्रॉडक्टमध्ये व्हावे- श्री नितिन कोल्हे

🔥 आग न्युज पोर्टल नेटवर्क
कोपरगांव : इंजिनिअरींगच्या विध्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा अभ्यास करून समाज उपयोगी नवनवीन प्रोजक्टस् तयार करून त्यांची उपयुक्तता सिध्द करावी, व असे प्रोजेक्टस्चे प्रॉडक्टमध्ये रूपांतर करावे, असे प्रतिपादन संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे अध्यक्ष श्री नितिन कोल्हे यांनी केले.


संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजच्या इलेक्ट्रॉनिक्स अँड कॉम्प्युटर इंजिनिअरींग विभागाने (इसीई) टेक्निकल प्रोजेक्टस्चे प्रदर्शन भरविले होते. या प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी श्री नितिन कोल्हे अध्यक्ष स्थानावरून बोलत होते.

या वेळी अश्वष्वमेध अॅग्रो प्रा. लि.चे अध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर वाकचौरे, युनिक पॅकचे संचालक श्री मनोज जोर्वेकर, व्हिक्टर प्रा. लि. चे अध्यक्ष श्री राजेंद्र धनगे, किरण मेटल फौंड्रीचे अध्यक्ष श्री कपिल गुंजाळ, इंजिनिअरींग कॉलेजचे संचालक डॉ. ए. जी. ठाकुर, इसीई विभागाचे प्रमुख डॉ. बी. एस. आगरकर व प्रदर्शनाचे समन्वयक प्रा. एन.डी. कपाले उपस्थित होते.

श्री नितिन कोल्हे पुढे म्हणाले की इसीई विभागातील विध्यार्थ्यांनी वेगवेगळ्याा क्षेत्रातील प्रोजेक्टस् बनविले. त्याचा समाजाच्या विकासाठी निश्चित फायदा होईल. तसेच उद्योग क्षेत्रातही संधी मिळेल.

कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी डॉ. ज्ञानेश्वर वाकचौरे यांच्या सहित इतर कारखानदारांनी चार प्रयोगशाळांमधिल प्रोजेेक्टस् पाहुन विध्यार्थ्यांचे कौतुक केले. विध्यार्थ्यांची प्रोजेक्टस् मधिल कार्यशिलता व कल्पकता पाहुन भविष्यात हे विध्यार्थी संषोधक व उद्योजक बनु शकतात. यावर विध्यार्थ्यांनी अधिक काम करून प्रोजक्टस्चे रूपांतर उत्पादनात करावे, असे सांगीतले.
इसीई विभागातील पंडीत भारूड यांनी ‘श्री छत्रपती शिवाजी महाराज ऑन प्रिंटेड सर्किट बोर्ड अँड हिज आरती’ या प्रोजेक्टचे सादरीकरण केले. श्री नितिन कोल्हे यांचे हस्ते या प्रोजक्टचे उद्घाटन झाले. या प्रदर्शनात एकुण ९४ प्रोजेक्टस्चे सादरीकरण करण्यात आले. त्यामध्ये सोलर, सॉफ्टवेअर, हार्डवेअर, एम्बेडेड सिस्टिम, इमेज प्रोसेसिंग, आदी प्रकार होते. सदर प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी व इसीई विध्यार्थी संघटनेने प्रयत्न केले. संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे मॅनेजिंग ट्रस्टी श्री अमित कोल्हे यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.

 

संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजच्या इसीई विभागाने प्रोजेक्ट प्रदर्शन भरविले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्री नितिन कोल्हे यांनी ‘श्री छत्रपती शिवाजी महाराज ऑन प्रिंटेड सर्किट बोर्ड अँड हिज आरती’ या प्रोजेक्टचे उद्घाटन करून प्रदर्शनाचे उद्घाटन केले. यावेळी इतर मान्यवर उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 1 3 2 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे