Breaking
ब्रेकिंग

अध्यक्ष विवेक कोल्हे शुभहस्ते सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांत अल्ट्रा फिल्ट्रेशन प्लॅन्टचे उदघाटन

0 0 1 9 4 7

अध्यक्ष विवेक कोल्हे शुभहस्ते सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांत अल्ट्रा फिल्ट्रेशन प्लॅन्टचे उदघाटन

🔥 आग न्युज पोर्टल नेटवर्क

कोपरगांव : –
सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांत संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांच्या मार्गदर्शनांखाली नव्यांने बसविण्यांत आलेल्या अल्ट्रा फिल्ट्रेशन प्लॅन्टचे. (यु. एफ.) उदघाटन कारखान्याचे युवा अध्यक्ष विवेक कोल्हे यांच्या हस्ते नुकतेच करण्यांत आले.

संचालक सतिष सुभाषराव आव्हाड व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. वैशाली सतिष आव्हाड यांच्या हस्ते सदर प्रकल्पाचे विधीवत पुजन झाले.


प्रारंभी कार्यकारी संचालक बाजीराव सुतार यांनी सर्वांचे स्वागत करून प्रकल्पाबाबत संपुर्ण माहिती दिली.

सदरचे प्लॅन्टमुळे कारखान्याच्या बॉयलरला ४० हजार लिटर्स डी एम वॉटरवर प्रकिया करून पुरवठा होणार आहे त्यामुळे बॉयलरची इफिसिएन्सी तसेच १२ मे. वॅट सहवीज निर्माती प्रकल्पाचे टर्बाईनचे वर्कीगही उत्तमप्रकारे चालविण्यांस सोईचे होणार आहे व त्याचे रिझल्ट संपुर्ण हंगामात चांगल्या प्रकारे मिळणार आहेत.

सदर प्रकल्पामुळे बॉयलरला शुध्द पाणीपुरवठा होवुन टर्बीडीटी व सिलीकाचे प्रमाण ९९.९ टक्के निघुन जाणार आहे. सदरचा प्रकल्प संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पुर्णत्वास झाल्याची माहिती देण्यांत आली.


या कार्यकमांस संचालक सर्वश्री. बाळासाहेब वक्ते, रमेश घोडेराव, निवृत्ती बनकर, ज्ञानदेव औताडे, कामगार नेते मनोहर शिंदे, सर्व खाते प्रमुख, उपखातेप्रमुख आदि उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 1 9 4 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे