Breaking
ब्रेकिंग

स्व. शंकरराव कोल्हे यांच्या पुतळ्याचे अनावरण

0 0 1 1 6 9

स्व. शंकरराव कोल्हे यांच्या पुतळ्याचे अनावरण

🔥 आग न्यूज पोर्टल नेटवर्क

कोपरगांव: सहकार महर्षी,संजीवनी उद्योग समूह व संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे संस्थापक, माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे श्रीमती सिंधुताई कोल्हे (माई) यांचे हस्ते संजीवनी आयुर्वेदा कॉलेज मध्ये अनावरण झाले. यावेळी उपस्थित सर्वांनीच स्व. कोल्हे यांच्या पुतळ्याचे पुजन करून मानवंदना दिली.


पुतळा अनावरण प्रसंगी संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे अध्यक्ष श्री नितीन कोल्हे, संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष श्री बिपीन कोल्हे, माजी आमदार सौ.स्नेहलता कोल्हे, सौ. कलावती कोल्हे, श्री मिलींद कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी श्री अमित कोल्हे, विश्वस्त श्री, सुमित कोल्हे, श्री ईशान कोल्हे तसेच संजीवनी अंतर्गत विविध संस्थांचे डायरेक्टर्स, प्राचार्य उपस्थित होते.


यावेळी श्री नितीन कोल्हे, श्री बिपीन कोल्हे व कोपरगाव पहिल्या महिला आमदार सौ. स्नेहलता कोल्हे यांनी स्व. कोल्हे यांच्या स्मृतिस उजाळा देत स्व. कोल्हे यांचे कार्य सर्वांनाच प्रेरणा देत राहील, असे सांगून . बी. एससी. अॅग्री झाल्यावर भारत सरकारच्या फोर्ड फाऊंडेशनची शिष्यवृत्ती घेवुन ते परदेशात उच्च शिक्षणासाठी गेले.

ते तेथेच रमले नाही, परंतु तेथुन प्रेरणा घेवुन परत मायदेशी आले, आणि समाजकारण व राजकारण करीत अनेक महत्वाकांक्षी प्रकल्प उभारून कोट्यावधीचे पोशिंदे बनले.

 

 

 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 1 1 6 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे