Breaking
ब्रेकिंग

सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्यास वसंतदादा शुगर इन्स्टीटयुटचा सर्वोत्कृष्ट उद्योजकता पुरस्कार जाहिर

0 0 1 2 3 5

 

सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्यास वसंतदादा शुगर इन्स्टीटयुटचा सर्वोत्कृष्ट उद्योजकता पुरस्कार जाहिर

🔥 आग न्यूज पोर्टल नेटवर्क
कोपरगांव—

वसंतदादा शुगर इन्स्टीटयुटच्यावतीने दिला जाणारा माजी मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख सर्वोत्कृष्ट उद्योजकता पुरस्कार सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांस जाहिर झाला आहे. त्याचे वितरण माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार, राज्याचे सहकारमंत्री दिलीपराव वळसे पाटील, महासंचालक संभाजीराव कडु पाटील, माजी महासंचालक शिवाजीराव देशमुख आदिंच्या हस्ते ११ जानेवारी रोजी सकाळी १०.३० वाजता पुणे (मांजरी बुद्रुक) येथे प्रदान करण्यांत येणार आहे.


एक लाख रूपये रोख, मानचिन्ह, प्रशस्तीपत्रक असे पुरस्काराचे स्वरूप असुन रेणा सहकारी साखर कारखान्याने सदरचा पुरस्कार पुरस्कृत केला आहे.
वसंतदादा शुगर इन्स्टीटयुटने सदर पुरस्कारासाठी जे निकष ठरविले होते त्यात सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांची प्रेरणा घेत संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली आजी माजी सर्व संचालक, ऊस उत्पादक सभासदांच्या सहकार्याने कारखान्याची घौडदौड यशस्वीरित्या सांभाळत आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी कार्यक्षम वापर केलेला आहे.


सदर पुरस्कारासाठी गाळप क्षमता ६ हजार मे. टन प्रतिदिन, १२ मे वॅट सहवीज निर्माती, दाणेदार सह रॉ व डॅमररेरा साखरेचे उत्पादन, ७५ केएलपीडी आसवनी, १२० केएलपीडी इथेनॉल, अॅसिटीक अॅसिड, असेटिक अनहैड्राइड, इथाइल ऑसिटेट उपपदार्थ निर्मीती, कंट्रीलिकर प्रकल्प, फयूएल ऑईल व बायोगॅस प्रकल्प, पॅरासिटामोल औषधी पथदर्शक प्रकल्प, थेट उसाच्या रसापासून इथेनॉल निर्माती, जमीनीचा पोत सुधारण्यासाठी जैविक खते वापरण्यावर भर, संजीवनी सेंद्रीय खत निर्मीती व अनुदानावर सभासदांना वितरण, त्रिस्तरीय बेणे निवड, ठिबक सिंचनचा प्रभावी वापर पाण्यांत बचत, उसतोडणीत थर्ड पार्टी लॅब अनेंलेसिस व महिंद्रा ई कृषीसह मेकॅनिकल हार्वेस्टर वापर, मोबाईल थ्री डब्लू डी सॉफटवेअर वापर, उसावर औषध फवारणीसाठी ड्रोन, गाळप क्षमतेचा ९२.५७ टक्के वापर, साखर प्रक्रिया प्रकल्पात फॉलिंग फिल्म इव्हापरेटर व उर्जा बचतीच्या उपाययोजना, बायोगॅस २ मे. वॅट सहवीज निर्माती, साखरेचा रंग ८५ आय यु पेक्षा कमी करण्यांत यश, उसाच्या रसापासून घेट इथेनॉल निर्माती, दैनदिन गाळप क्षमता प्रकल्पात प्रभावी तंत्रज्ञानाचा वापर, सुरक्षीतता नियम व अग्नीप्रतिबंधक उपकरणांचा वापर, कारखान्यास ९००१-२०१५ आयएसओ मानांकन, खेळत्या भांडवलावरील व्याजाचा खर्च कमी, नक्त मुल्यांक निर्देशांक चांगला अशी कार्यक्षमता वैशिष्टये ठेवण्यांत आली होती त्याची तंतोतंत अंमलबजावणी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांत पहावयास मिळाल्याने या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. त्याबद्दल अनेकांनी अभिनंदन केले.

 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 1 2 3 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे