Breaking
ब्रेकिंग

संजीवनी अभियांत्रिकीच्या महाविद्यालयाच्या पाच विद्यार्थ्यांची रू ३० लाख स्कॉलरशिपसह इंटर्नशिपसाठी कॅनडात निवड – श्री अमित कोल्हे

0 0 1 9 4 9

संजीवनी अभियांत्रिकीच्या महाविद्यालयाच्या पाच विद्यार्थ्यांची रू ३० लाख स्कॉलरशिपसह इंटर्नशिपसाठी कॅनडात निवड – श्री अमित कोल्हे


🔥 आग न्यूज पोर्टल नेटवर्क  कोपरगांव :— संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या संजीवनी इंटरनॅशनल रिलेशन्स विभागाच्या प्रयत्नाने संजीवनीच्या पाच विध्यार्थ्यांची रिसर्च इंटर्नशिपसाठी (संशोधनात्मक आंतरवासिता) कॅनडाच्या नामांकित विद्यापीठांमध्ये प्रत्येकी रू ६ लाख असे रू ३० लाख स्कॉलरशिपसह निवड झाली असुन या निवडीमुळे संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाने आपले स्थान आंतरराष्ट्रीय पातळीवर पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतुन मिटॅक्स, कॅनडा आणि एआयसीटीई, नवी दिल्ली यांच्यात कॅनडामधिल विद्यापीठांमध्ये रिसर्च इंटर्नशिपसाठी सामंजस्य करार झाला.

यामुळे ग्रामिण भागातील विध्यार्थ्यांनाही लाभ मिळत आहे, हे संजीवनीने दाखवुन दिले आहे. अशी माहिती संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे मॅनेजिंग ट्रस्टी श्री अमित कोल्हे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.


श्री कोल्हे यांनी पत्रकात पुढे म्हटले आहे की मॅथेमॅटीक्स ऑफ इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी अँड कॉम्प्लेेक्स सिस्टिम (मिटॅक्स) ही कॅनडा मधिल संस्था असुन मिटॅक्स ग्लोबलिंक रिसर्च इंटर्नशिप हा ऑस्ट्रेलिया, चीन, कोलंबिया, फ्रान्स, जर्मनी, हॉंन्गकॉन्ग, भारत, मेक्सिको, पाकिस्तान, तैवान, ट्युनिसिया, युक्रेन, आणि युनायटेड स्टेटस् या देशांमधील पदवीचे शिक्षण घेणाऱ्यांसाठी स्पर्धात्मक उपक्रम आहे. प्रत्येक वर्षी मे ते सप्टेम्बर या कालावधीत उच्च श्रेणीच्या कॅनेडियन विद्यापीठातील प्राध्यापकांच्या देखरेखीखाली विज्ञान, अभियांत्रिकी, गणित अशा विविध विषयांमध्ये १२ आठवड्यांच्या संशोधन इंटर्नशिपमध्ये निवड झालेल्या विध्यार्थ्यांना प्रत्यक्ष सहभाग नोंदविणे आवश्यक असतो. मिटॅक्स ग्लोबलिंक रिसर्च इंटर्नशिप सध्या कॅनडातील ७० हुन अधिक विद्यापीठांमध्ये उपलब्ध आहेत.


मिटॅक्स आणि आखिल भारतीय तंत्र शिक्षण परीषद (एआयसीटीई), नवी दिल्ली यांच्यामधिल सामंजस्य करारामुळे भारतातील एआयसीटीईच्या अखत्यारीतील संस्थांमधिल ३०० विध्यार्थ्यांना या इंटर्नशिपचा फायदा होतो. भारतातील आयआयटी, एनआयटी, अशा संस्थांमधिल विद्यार्थ्यांची निवड मोठ्या संख्येने होते. मात्र संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी संजीवनी मधुन मिळालेल्या ज्ञानाच्या जोरावर मिटॅक्सच्या सर्व कसोट्या पुर्ण करून बाजी मारली.

२०२१ साली १, २०२२ साली ३, २०२३ साली ४ विध्यार्थ्यांची निवड झाली होती व आता २०२४ सालीच्या इंटर्नशिपसाठी ५ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. या सर्व विद्यार्थ्यांचा विमान प्रवास खर्च, राहणे व जेवणाची व्यवस्था मिटॅक्स व एआयसीटीई करीत असते. प्रत्येक विध्यार्थ्यासाठी तीन महिन्यांच्या कालावधीसाठी सुमारे रू ६ लाख खर्च येतो. तृतियवर्षाच्या दिप्ती शिवाजी खोंड व वैष्णवी चंद्रकांत चांदर यांची अथाबस्का युनिव्हर्सिटी, अनुष्का बाबासाहेब देवकर हिची युनिव्हर्सिटी ऑफ कॅलगरी, कृष्णा दिलीप गुंड याची माऊंट रॉयल युनिव्हर्सिटी व रोहित काकासाहेब इंगळे याची युनिव्हर्सिटी ऑफ मनिटोबा या कॅनडाच्या विद्यापीठांमध्ये तीन महिन्यांच्या इंटर्नशिपसाठी निवड झाली आहे.

या सर्व विध्यार्थ्यांचा व त्यांच्या भाग्यवान पालकांचा संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे अध्यक्ष श्री नितिनदादा कोल्हे यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी मॅनेजिंग ट्रस्टी श्री अमित कोल्हे, चिफ टेक्निकल ऑफिसर श्री विजय नायडू, डॉ. शांतम शुक्ला, डायरेक्टर डॉ. ए.जी. ठाकुर, विभाग प्रमुख डॉ. डी. बी. क्षिरसागर, डॉ. माधुरी जावळे व संजीवनी इंटरनॅशनल रिलेशन्स विभागाचे डीन डॉ. महेंद्र गवळी उपस्थित होते.या विध्यार्थ्यांना डॉ. गवळी यांचे मार्गदर्शन लाभले .

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 1 9 4 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे