शेवटी साहेब साहेबच होते….!
शब्दांकन — नारायण अग्रवाल कोपरगाव महाराष्ट्र राज्य ही देव, संत , महात्मे , महर्षी, कर्मवीरांची पुण्यनगरी असल्यानेच जगात महाराष्ट्र हे कायमस्वरूपी एकमेव *महाराष्ट्र* म्हणून जग मान्यता पावले आहे.
अशा प्रभु रामचंद्र, श्री साई, आदीं महान महात्म्यांच्या पावन पदस्पर्श आणि कर्मभूमी म्हणून कोपरगांव
तालुका,संपूर्ण देशाला सर्वं दिशांनी समान पातळीवर मध्यवर्ती पठारी प्रदेशात वसले आहे.
या उलट पर्जन्य छायेतील ,पावसाच्या पाण्याशिवाय कोणताही जिवंत स्वतंत्र पाणी स्रोत नसलेल्या खुरट्या जंगली कायमस्वरूपी भीषण दुष्काळ पाचवीला पुजलेल्या कोपरगांव तालुक्यातील शंकरराव कोल्हे यांनी प्रगत राष्ट्रतील गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून कोपरगावकरांच्या सेवेला वाहून घेतले. गुळाची बाजारपेठ म्हणून जगाच्या नकाशावर झळकणाऱ्या बाजारपेठेत त्याचबरोबर खाजगी साखर कारखाने,कृषी माल खरेदी व्यापारी यांच्याजीवघेण्या सावकारी व लुटीच्या कचाट्यातून वाचविण्याचा विडा सह सहकार महर्षी कोल्हे साहेब यांनी आपल्या तारुण्याचे विशीत उचलला.
मुहूर्तमेढीच्या पहिल्या पावलाने खाजगी साखर कारखाने ऊसभाव देवून लूट व दिरंगाई करीत असल्याचे निषेधार्थ ऊस गाळप सुरू असलेल्या ऊस पुरविणाऱ्या गव्हाणीत प्राणाची तमा न बाळगता स्वतः:ला झोकून दिले. या यशस्वी लढयाने अनपेक्षित रित्या कोपरगांव तालुका विकास मंडळाचे नेतृत्व करण्याची पहिली संधी लाभली. या सुवर्ण संधीचा लाभ उठवत त्यांनी सहकारी साखर कारखाना स्थापन करण्याचा विडा उचलला . कोपरगाव , श्रीरामपूर तालुक्यातील ऊस उत्पादकांना स़ंघटीत करुन प्रवरा, गणेश, कोपरगाव संजीवनी सहकारी साखर कारखाना , अहमदनगर सहकारी साखर कारखाना अहमदनगर जिल्हा सहकारी बँक, प्रत्येक गावात सहकारी कृषी विकास सहकारी सोसायट्या यशस्वी उभारणीत सर्वस्व पणाला लावले.याचमुळे शेतकरी व ग्रामीण जनतेच्या हाती पैसा खेळू लागला. अल्पावधीत, येथील निसर्ग कृषी औद्योगिक प्रगतीने मोहित होऊन तत्कालीन पंतप्रधान नामदार पंडीत जवाहरलाल नेहरू यांनी या परिसराला हिंदूस्थानचा कॅलिफोर्निया म्हणून गौरविले.
परंतु अल्पावधीतच संभाजी नगर, नासिक जिल्ह्यातील वाढत्या कृषी, औद्योगिक, लोकसंख्या विकासासाठी केंद्र शासनाच्या मदतीने कोपरगांव तालुक्यातील हक्काचे पाणी इतरत्र वळविण्यात आले. पंधरा दिवसांचे कालव्यांचे आवर्तन सहा महिन्यांचे अंतराने मिळू लागले. याचा फटका तीन साखर कारखान्यांना बसून ते कायमचे बंद पडले. उर्वरित तीन साखर कारखान्यांना पर जिल्हा व राज्यातून शेकडो किलोमीटर अंतरावरील ऊस आणूनही आवश्यक ऊस उपलब्धेअभावी या साखर कारखान्यांचा ऊस गळीत आणि गळीत हंगाम कालावधीत निम्म्याने घट झाली आहे. पिण्याचे पाणी मिळण्याच्या ८ ते २१ दिवसांनंतर मिळू लागले याचा फटका बसून बाजारपेठ उध्वस्त झाली. बेरोजगारीतील वाढीने स्थलांतरित प्रमाणांत दिवसेंदिवस विक्रमी वाढ झाल्याने कोपरगांव तालुका ओसाड बनला.
या भिषण परिस्थितीत सहकार महर्षी शंकरराव कोल्हे साहेब डगमगले नाही. त्यांनी प्रखरपणे मानवी आणि नैसर्गिक संकटापुढे न झुकता वेळ प्रसंगी स्वशासना विरोधात संघर्षाची भूमिका घेवून संजीवनी सहकारी उद्योग समूहाचे आर्थिक मदतीने राज्य व देशभरातील बांधकाम,जलतज्ञ, राजकीय विरोधास न जुमानता कोपरगांव तालुक्यातील नदीपात्रात कोल्हापूर पॅटर्नातून ३ यशस्वी बंधारे बांधले. तर नासिक जिल्ह्यातील गोदावरी खोऱ्यातील पाणलोट क्षेत्रात १७ लहान – मोठी धरणे, हजारांवर छोटे बंधारे केंद्र व राज्य शासनाच्या मदतीने बांधून पाणी टंचाईवर मात केली .
आपल्या ३५वर्षांच्या आमदार कारकीर्दीत आमदार ते व़िवीध मंत्री पदे हंगामी सभापती स्थानाला गौरवास्पद कामगिरी चा ठसा उमटवला.
परंतु सहकार महर्षी शंकरराव कोल्हे साहेब सत्तेवर नसताना सन २००५ साली केवळ मराठवाड्यातील जनतेला खुश करण्यासाठी सर्वंच राजकीय पक्ष आणि संघटना ह्यांनी संघटीतपणे नासिक – अहमदनगर जिल्ह्यातील जनतेला हक्काचे आणि नैसर्गिक पाण्यापासून कायमस्वरूपी वंचित करण्यासाठी समन्यायी पाणी वाटप कायदा मध्य रात्री बोटावर मोजता येतील यापेक्षा कमी फक्तं स्वपक्षीय आमदारांच्या मदतीने पास करून घेतला यावेळी सत्तेवर नसताना कोल्हे साहेब यांनी ऊस उत्पादक व सहकारी संस्थांच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली परंतु तत्कालीन केंद्र व राज्य शासनाच्या प्रखर विरोधात सहकार महर्षी शंकरराव कोल्हे साहेबांनी रस्त्यावर उतरून आंदोल ने केली. यावेळी बिपिन दादा हे कोल्हे साहेब यांच्या मदतीला उतरले . यादरम्यान बिपिन दादा यांना नगर – रस्ता रोको आंदोलनात अत्यावस्थ अवस्थेत रुग्णालयात दाखल व्हावे लागले या पाणी प्रश्न समस्येचा दुर्देवी फटका सहकार महर्षी शंकरराव कोल्हे साहेब व बिपीन दादा ह्यांना कायमचा बसला . परंतु दोघेही डगमगले नाही. स्वशासना विरोधात लढत असल्याने त्यांना व सर्वं स्तरावर अतिरेकी विरोधातील कारवाया मुळे संपुर्ण कोल्हे कुटुंबियांना नाईलाजाने पक्ष सोडावा लागला जनतेला यांची जाणीव असल्याने कोपरगावकरांनी त्याची परतफेड सौ. स्नेहलता कोल्हे वहिनी साहेब याना प्रथमच विक्रमी बहुमताने कोपरगांव तालुका प्रथम महिला आमदार म्हणून निवडून दिले.
सहकार महर्षी शंकरराव कोल्हे साहेब यांनी कोपरगांवकरांना दोन वेळचे आरोग्यदायी कायमस्वरूपी पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी केवळ आंदोलन न करता संजीवनी उद्द्योग समूहाचे मदतीने गेली ५० वर्षे पिण्याचे पाणी गोदावरी डाव्या कालव्यातून पाणी देण्याची मंजुरी मिळविल्यानंतर या पाणी पुरवठा योजनेसाठी आजपर्यंतच्या ५ ही पाणी साठवण तलाव, स्वच्छ व आरोग्यदायी पाणी वितरण सहा टाक्या , पाणी पुरवठा पाईप लाईनसाठी आवश्यक निधी बरोबरच स्वस्तात जमिनी मिळवून दिल्या या आपद् ग्रस्तांना संजीवनी उद्द्योग समूहात रोजगार दिला. याशिवाय वेळोवेळी आवश्यक यंत्रसामग्री, तंत्रज्ञ , मनुष्यबळ सतत उपलब्ध करून दिले.कूपनावर पाणी व २१दिवसांच्या अंतराने पाणी पुरवठा आणि नेहमी भासणाऱ्या पाणी संकटातून सतत संजीवनी उद्द्योग समूहाचे मदतीने जनतेला. सहिसलामत बाहेर काढले.
गोदावरी उजव्या व डाव्या कालवा लाभ क्षेत्रातील जनता दरवर्षी आजपर्यंत हजारो कोटी रुपये पाणीपट्टी देत असतां ना गोदावरी कालव्यांचे दुरुस्ती व नूतनीकरणासाठी केंद्र व राज्य शासनाने कधीच पुरेसा निधी दिला नाही अशावेळी संजीवनी उद्द्योग समूहाने मनुष्यबळ, यंत्रसामग्री, आर्थिक बळ नित्यनेमाने पुरविले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे कोपरगांव शहरासाठी थेट निळवंडे धरणातून बंद जलवाहिनीतून विना खर्चाच्या पाणी पुरवठा योजनेसाठी सहकार महर्षी शंकरराव कोल्हे साहेब, बिपिन दादा व तत्कालीन आमदार सौ. स्नेहलता कोल्हे वहिनी साहेब यांनी विधानसभेत सर्व आर्थिक तरतुदी सह मंजुरी मिळवली यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठातून सर्वं विरोध मोडीत काढला.
याशिवाय संजीवनी उद्द्योग समूहाचे यंत्रसामुग्री, मनुष्यबळ, शहरातील जनता व स़ंजीवनी समूहाचे आर्थिक सहभागातून संयुक्त श्रमदानातून कोपरगाव शहर चौथ्या पाणी साठवण तलाव मजबूतीकरण, खोली करणाचे उत्साहात काम सुरू झाल्यावर विघ्नसंतोषी लोकानी पुन्हा कोल्हे कुटुंबिय सत्ताधारी बनू नये या असूये पोटी मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजी नगर खंडपीठातून चौथ्या पाणी साठवण तलाव व निळवंडे धरणातून पाणी पुरवठा योजनेस आडकाठी घातली असून आजही दोन्ही कामे प्रलंबित आहेत.
या कामाशिवाय स्थानिक जनतेला कायमस्वरूपी विविध रोजगार मिळावे यासाठी संजीवनी शिक्षण संस्थेचे १९८३ साली आयटीआयच्या सुरू केले आज सहकार महर्षी शंकरराव कोल्हे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली नितीन दादा, बिपिन दादा, अमित दादा , सुमित दादा, विवेक भैय्या, कोपरगाव प्रथम महिला आमदार सौ स्नेहलता कोल्हे वहिनी साहेब, डॉ. सौ. मनाली ताई व कोल्हे परिवार परीश्रमातून प्रगत राष्ट्रतील सर्वोच्च अत्याधुनिक तंत्रज्ञान विकसित अभियांत्रिकी, फार्मसी,बी. एड पदविका आदी विविध क्षेत्रातील अभ्यासक्रम, सैनिकी विद्द्यालय कनिष्ठ महाविद्यालय, आदिवासी आश्रमशाळा, संजीवनी इंटरनॅशनल स्कूल, पूर्व प्राथमिक इंग्रजी माध्यमाच्या शाळाव महाविद्यालय, मराठी माध्यम महाविद्यालय, आदी विविध संस्थांचे माध्यमातून आजपर्यंत दहा हजारांना रोजगार पुरविला तर आंतरराष्ट्रीय,राष्ट्रीय पातळीवरील हजार वरील विविध कंपन्यांकडून लाखांपर्यंत विद्यार्थ्यांना कायमस्वरूपी गलेलठ्ठ पगाराच्या नोकरीच्या स़ंधी मिळवून दिल्या . याचमुळे संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालय आज देशातील विनाअनुदानित सर्वोच्च अत्याधुनिक तंत्रज्ञान विकसित खाजगी संस्था म्हणून पहिल्या पाच संस्थात अग्रेसर आहे. तर पाश्चात्य देशातील अग्रगण्य विद्यापीठांशी सल्लग्न आहे. सहकार महर्षी शंकरराव कोल्हे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली गोदावरी दुध संघ, हिरकणी दुध संघाच्या माध्यमातून कोपरगाव तालुक्यात
शहरव ग्रामीण भागात शेतकरी शेतमजूर, आदींना बचत गटाच्या माध्यमातून दुग्धजन्य पदार्थ,मासे प्राणी ,पक्षी संगोपन , विविध घरगुती व इतर उद्योगामार्फत कोपरगाव प्रथम महिला आमदार सौ स्नेहलता कोल्हे वहिनी साहेब व सौ. रेणुकाताई कोल्हे यांच्या अविस्मरणीय प्रयत्नांमुळे आजपर्यंत किमान १५ हजार कुटुंबांना अब्जावधी रुपयांची उलाढाल करणे सहजशक्य झाले.
संजीवनी सहकारी पतसंस्था,साई संजीवनी सहकारी बँक आदी आर्थिक संस्था मार्फत सहजपणे कोणत्याही परिस्थितीत कर्ज उपलब्ध होत असल्याने व सर्व कर्जांना विमा,व सुरक्षित जामीनकीचे संरक्षण असल्याने कर्जदारासह बॅंक व पतसंस्था प्रगती पथावर असून बिपिन दादा व विवेक भैय्या नेतृत्वाखाली साई संजीवनी सहकारी बँक दरवर्षी जिल्हा व राज्य पातळीवर विविध सर्वोच्च कामगिरी पुरस्कार मिळविण्यात आघाडी मिळवत आहे.
शेवटी सर्वात महत्त्वाचे म्हणजे आमच्या कुटुंबाला सहकार महर्षी शंकरराव कोल्हे साहेब श्रीमती माई यांचा कौटुंबिक सहवास लाभला यामुळे नितीन दादा, बिपीन दादा कोपरगाव प्रथम महिला आमदार सौ स्नेहलता कोल्हे वहिनी साहेब, अमित दादा सुमितदादा, विवेक भैय्या, यांच्या बहुमुल्य सहकार्याने सहकार महर्षी शंकरराव कोल्हे साहेब यांच्या गौरवशाली वाटचालीचा वारसा ठरण्यात मी व माझे कुटुंब यशस्वी ठरलो यांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.
अशा महान गौरवशाली कर्तृत्ववान महान सहकार महर्षी शंकरराव कोल्हे साहेब यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त परमेश्वराकडून या चिरंजीवी आत्म्यांस चिरशांती व सद्गती लाभो तसेच कोल्हे कुटुंबियांचे शुभ हस्ते जास्तीत जास्त विक्रमी देशसेवा घडो याकरिता सर्व प्रकारचे बल, उत्तम आरोग्य, दिर्घायुष्य कायमस्वरूपी सुखसमृद्धी सर्व कोल्हे कुटुंबियांना व सहकार महर्षी शंकरराव कोल्हे साहेब यांच्या गौरवशाली वाटचालीचा वारसा लाभलेल्या सर्व कार्यकर्त्यांना देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना !!! *आमच्या साहेबांच्या* *दुसऱ्या पुण्यस्मरण दिवशी अश्रू पूर्ण श्रध्दांजली अर्पण करतांना जनता जनार्दन एकच वाक्य बोलते … साहेब शेवटी* *साहेबच होते !*
*— नारायण अग्रवाल कोपरगांव*
.