सत्तेचा तमाशा जोरात,कोपरगावचे भविष्य काळे-कुट्ट अंधारात – भाजप शहर कोषाध्यक्ष संदीप देवकर
सत्तेचा तमाशा जोरात,कोपरगावचे भविष्य काळे-कुट्ट अंधारात – भाजप शहर कोषाध्यक्ष संदीप देवकर
🔥 आगन्युज पोर्टल नेटवर्क
कोपरगाव = अध्यात्मिक,सांस्कृतीक,राजकीय दृष्टीने प्रगत असणारा कोपरगाव तालुका.अनेक देवदेवतांची ,साधू संत महतांची भूमी आहे.मातब्बर राजकीय नेत्यांची मांदियाळी असणारा भाग म्हणून नावलौकिक प्राप्त तालुका अशी ओळख राज्यभर आहे.गेले चार वर्षात मात्र कोपरगावच्या संस्कारित भवितव्याला जणू दृष्ट लागावी अशी परिस्थिती रुळली आहे.कधी अश्लील नाचगाणे तर कधी थिल्लर कार्यक्रम घेऊन होणारा संस्कारांचा तमाशा ही पद्धत रूढ झाली.यामुळे तरुणाईचे भवितव्य चार वर्षात जणू अंधारात जाऊन काळे-कुट्ट झाले अशी प्रतिक्रिया भाजपा कोषाध्यक्ष संदीप देवकर यांनी व्यक्त केली आहे.
सहकार महर्षी स्व.शंकरराव कोल्हे, कर्मवीर स्व.शंकरराव काळे, स्व.सूर्यभान वहाडणे,स्व.ना.स.फरांदे यांच्या सारख्या नैतिकता जपणाऱ्या राजकीय मान्यवरांचा तालुका म्हणून कोपरगावची ओळख पुसण्याचा प्रकार अलीकडे सुरू आहे का ? अशी भावना नागरिकांची झाली आहे.कधी जेसीबी मधुन गुलाल,कधी फ्लेक्सबाजी करून न होणाऱ्या विकासाच्या दिखाऊ वल्गना,धार्मिक ठिकाणी तमाशा,कधी कुस्तीचा आखाडा असल्यासारखे सत्तेची गुर्मी येऊन राजकीय भाषाशैली सुरू आहे.
गैर प्रकाराला प्रोत्साहन देऊन नवीन पिढीला आपण काय दिशा देतोय याचा विचार गत चार वर्षात लुप्त होत गेला आहे.
कुठे भांडावे आणि कुठे थांबावे हे राजकीय आखाड्यात जणू आता सत्ताधारी वर्गाला विस्मरण झाले आहे.वावड्या आणि खोटा प्रचार यामुळे नागरिक मेटाकुटिला येत आम्हाला दिखाऊ विकास नको पण आमच्या अपेक्षा आणि स्वप्न यावर हे चाललेले मानसिक अत्याचार थांबवा अशी संतप्त भावना व्यक्त करू लागले आहे.
कुठलाही ठोस विकास कोपरगावला दिसत नाही मात्र खोट्या बातम्या पाहून लोकांना मोबाईल आणि रोजचे वृत्तपत्र उघडावे की नाही अशी परिस्थिती झाली आहे.एकीकडे संस्कारशिल पिढी घडवणे हे त्या भागाच्या राजकीय नेत्यांचे काम असते.त्यासाठी अध्यात्मिक धार्मिक आणि प्रबोधन होणारे उपक्रम घेणे व समाज दिशादर्शक मार्गाने विकसित करणे यात प्रयत्न होणे गरजेचे असते.दुर्दैवाने . कुठला अध्यात्मिक सांस्कृतिक कार्यक्रम राजकीय सत्ता भोगणारे विद्यमान लोकप्रतिनिधी गत चार वर्षापासून घेत नाहीत.सत्तेचा तमाशा जोरात त्यामुळे भविष्य आमचे काळेकुट्ट अंधारात अशी भावना तरुण व्यक्त करू लागले आहे.
ही राजकीय दृष्टीकोन ठेऊन केलेली टीका नसून समाजात असलेली वस्तुस्थिती मांडणे मला संयुक्तिक वाटते आहे असे मत देवकर यांनी व्यक्त केले आहे.
दोन दिवसांपूर्वी विद्यमान आमदारांच्या ताब्यात असणाऱ्या श्री साईबाबा तपोभूमी ट्रस्ट परिसरात गौतमी पाटील नाचवली गेली पण त्यावर झाल्या गोष्टीची साधी दिलगिरी देखील कुणी व्यक्त केली नाही याची खंत वाटते आहे.