संजीवनी इंजिनिअरिंग काॅलेजच्या आठ अभियंत्यांची प्रिकास्ट इंडियामध्ये नोकऱ्यांसाठी निवड
संजीवनी इंजिनिअरिंग काॅलेजच्या आठ अभियंत्यांची प्रिकास्ट इंडियामध्ये नोकऱ्यांसाठी निवड
ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाची दमदार कामगिरी
कोपरगांव:संजीवनी इंजिनिअरींग काॅलेजच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट व सिव्हिल इंजिनिअरींग विभागाच्या प्रयत्नाने सिव्हिल इंजिनीअरिंगच्या अंतिम वर्षाच्या विध्यार्थ्यांना प्रिकास्ट इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. या बांधकाम क्षेत्रातील आघाडीच्या कंपनीच्या गरजेनुसार प्रशिक्षण दिले. त्यानुसार कंपनीने कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन करून आठ नवोदित अभियंत्यांची नोकऱ्यांसाठी निवड केली आहे. अशा प्रकारे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाची दमदार कामगिरी सुरू असल्याचे महाविद्यालयाने दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.
संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे अध्यक्ष श्री नितिनदादा कोल्हे यांनी आठही अभियंते व त्यांच्या भाग्यवान पालकांचे अभिनंदन करून त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच मॅनेजिंग ट्रस्टी श्री अमित कोल्हे यांनी सर्व निवड झालेल्या अभियंत्यांचा छोटेखानी कार्यक्रमात सत्कार केला.
यावेळी डायरेक्टर डाॅ. ए. जी. ठाकुर, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभाग डीन डाॅ. विशाल तिडके, सिव्हिल इंजिनिअरिंग विभागाचे प्रमुख डाॅ.चंद्रकांत जेजुरकर, समन्वयक प्रा. अभिजीत पाबळे उपस्थित होते.
पत्रकात पुढे म्हटले आहे की संजीवनी इंजिनिअरींग काॅलेजने २०१९ पासुन ऑटोनॉमस दर्जा प्राप्त केला असल्यामुळे अभ्यासक्रमात उद्योगांच्या गरजेनुसार अभ्यासक्रमाची रचना करण्याचे स्वातंत्र्य प्राप्त झाले आहे.
यामुळे मोठ्या प्रमाणावर संजीवनी मधुन शिक्षण घेत असलेल्या ग्रामीण भागातील नवोदित अभियंत्यांना अगदी रू २० लाखांपर्यंतच्या वार्षिक पॅकेजच्या नोकऱ्या मिळत आहेत.
अलिकडेच प्रिकास्ट इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. कंपनीने निवड केलेल्या अभियंत्यांमध्ये अनुष्का संतोष आहेर, अश्विनी अनिल जाधव, संजना संतोष जोगदंड, संकेत संतोष मतसागर, विशाल योगेश सांगळे, विश्वजीत चांगदेव राजगुरू, वझिर हजाम सरवार व भरत रामनाथ साळवे यांचा समावेश आहे.