राष्ट्रीय आयुर्वेद महागुरू आयुर्वेदाचार्य रामदास आव्हाड , वैद्य पी.व्ही दमानिया, वैद्य व्ही . महादेवन सरमा हे आयुष ( आरोग्य ) मंत्रालयाच्या वतीने केंद्रीय आयुष मंत्री नाम. सर्वानंद सोनोवाल शुभहस्ते राष्ट्रीय धन्वंतरी आयुर्वेद ॲवॉर्डने सन्मानित
-
राष्ट्रीय आयुर्वेद महागुरू आयुर्वेदाचार्य रामदास आव्हाड , वैद्य पी.व्ही दमानिया, वैद्य व्ही . महादेवन सरमा हे आयुष ( आरोग्य ) मंत्रालयाच्या वतीने केंद्रीय आयुष मंत्री नाम. सर्वानंद सोनोवाल शुभहस्ते राष्ट्रीय धन्वंतरी आयुर्वेद ॲवॉर्डने सन्मानित
- आग न्युज पोर्टल नेटवर्क कोपरगाव :– राष्ट्रीय पातळीवरील अत्याधुनिक तंत्रज्ञान विकसित आयुर्वेद उपचार पद्धती प्रसार, निसर्ग संवर्धन, घातक प्रदुषणमुक्तीसाठी कोरोनासारख्या विविध प्राणघातक आजारांवर उपचार पद्धती वापरून यशस्वीपणे मात करतांना वैशिष्ट्यपूर्ण सर्वोत्तम सेवा करीत असल्याबद्दल राष्ट्रीय आयुर्वेद महागुरू आयुर्वेदाचार्य रामदास आव्हाड, वैद्य पी. व्ही.दमानिया, वैद्य एल. महादेवन सरमा ह्यांना केंद्रीय आयुष मंत्री नामदार सर्वानंद सोनोवाल
- यांच्या शुभहस्ते राष्ट्रीय धन्वंतरीआयुर्वेद जयंती समारोहात केंद्रीय आयुष मंत्रालयाच्या वतीने गौरविण्यात आले
- याप्रसंगी बोलताना नाम.सोनोवाल यांनी पंतप्रधान नामदार नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण देशात अणूऊर्जा, कीटक नाशक, प्राणघातक केमिकलमिश्रीत पाणी, प्रदुषण युक्त जीवघेणे हवामानाच्या कायम मुक्तीसाठी निरंतर प्रयत्नांतून आयुष मंत्रालयाने देशभरात आठ हजारांहून अधिक निरामय केंद्र स्थापन केली आहेत.आयुष क्षेत्राची सेवा अधिक बळकट करण्यासाठी आयुष ग्रीड प्रकल्प सुरू करण्यात आले आणि ते बळकट करण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे,
दरवर्षी धन्वंतरी जयंतीला आयुर्वेद दिन साजरा केला जातो. दरवर्षी या कार्यक्रमाचे आयोजन केल्याने आयुर्वेद दिनाची ख्याती जगभर वाढली आहे. आयुर्वेदाच्या जागतिक विस्तारामुळे औषधी वनस्पतींच्या लागवडीची गरज जगभरात झपाट्याने वाढत आहे याचा लाभ देशातील शेतकऱ्यांना देण्याचा आटोकाट प्रयत्न केंद्र सरकार करीत आहे.
यावेळी पंतप्रधान नामदार नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली आठव्या आयुर्वेद दिनानिमित्त आयुर्वेद दिनाचे सूक्ष्म संकेतस्थळ तयार करण्यात आले असून याला जगभरातून सुमारे वीस कोटी लोकांचा प्रतिसाद मिळाला आहे . आयुर्वेद दिनाच्या जागतिक मोहिमेचा संदेश ‘एक आरोग्यासाठी आयुर्वेद’ आणि जी -20 बैठकीची जागतिक संकल्पना ‘वसुधैव कुटुंबंम’ ने अशी अमिट छाप सोडली असून संपूर्ण जग ते पाहत आहे, असे आपल्या अध्यक्षीय भाषणात सोनोवाल यांनी सांगितले.
यावेळी केंद्रीय आयुष्य मंत्रालयाचे राज्यमंत्री मुंजपारा महेंद्र भाई यांनीआयुर्वेदिक औषधांचे सूक्ष्म गुणधर्म समजून घेण्यासाठी आयआयटी, एम्स आणि सीएसआयआर सारख्या जागतिक पातळीवरील नामवंत संस्था आयुष मंत्रालयाचे सोबत काम करीत असून इस्रोच्या (भारतीय अंतराळ संशोधन संस्था) मदतीने देशभरातील औषधी वनस्पतींचे मॅपिंग केले जात असल्याची माहिती दिली
हार्दिक अभिनंदन!!!
राष्ट्रीय आयुर्वेद महागुरू आयुर्वेदाचार्य रामदास आव्हाड यांचे कोपरगावकरांच्या शिरपेचात खोवले जाणारे नवी दिल्ली येथील केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाचा आयुर्वेद क्षेत्रातील राष्ट्रीय धन्वंतरीआयुर्वेद अवॉर्ड व शिवप्रतिष्ठान ,तंजावर (कर्नाटक ) येथील शिव प्रतिष्ठानचा सह्याद्री भूषण हे सर्वोच्च सन्मान पुरस्कार मिळविल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!!!
शुभेच्छूक — अशोक, अरुण, प्रकाश, सुधाकर , संजय आहेर आणि सौ. सीमा ज्ञानेश्वर जगताप, श्रीमती जयश्री प्रदिप जाधव व परिवार