आमदार आशुतोष काळे यांच्या कर्तृत्वाच्या पाठीशी ठामपणे उभे रहाणार :– नामदार राधाकृष्ण विखे
आमदार आशुतोष काळे यांच्या कर्तृत्वाच्या पाठीशी ठामपणे उभे रहाणार :– नामदार राधाकृष्ण विखे
🔥 आग न्यूज पोर्टल नेटवर्क
कोपरगाव :– अल्पावधीतच आमदार आशुतोष काळे यांनी या तालुक्यात भुतो न भविष्यती कामगिरी केल्याने आपण त्यांच्या पाठीशी खंबीर व ठामपणे उभे रहाणार असल्याची ठाम ग्वाही महसूलमंत्री नाम . राधाकृष्ण विखे यांनी एका कार्यक्रमात बोलताना दिली.
माहेगाव देशमुख येथे आमदार मा.श्री. आशुतोषदादा काळे यांच्या प्रयत्नांतून ४ कोटी रुपये निधीतून बांधण्यात आलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्र इमारतीचे लोकार्पण तसेच कोपरगाव तालुक्यातील शासकीय वाळू विक्री केंद्राचे उदघाटन आणि
महसूल मंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे यांच्या शुभहस्ते (ऑनलाईन पद्धतीने) व आमदार मा.श्री. आशुतोषदादा काळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले.यावेळी बोलतांना ते पुढे म्हणाले,
आशुतोषदादांच्या रूपाने कोपरगाव मतदारसंघाला गतिमान आणि कर्तृत्ववान नेतृत्व लाभले आहे व विकासकामांसाठी आशुतोषदादांच्या पाठीमागे मी खंबीरपणे उभा असुन राज्य शासनाकडून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल अशी ग्वाही यावेळी मा.ना.श्री. राधाकृष्णजी विखे पा. साहेब यांनी यावेळी दिली.
अद्ययावत प्राथमिक आरोग्य केंद्रामुळे स्थानिक नागरिकांना सरकारी आरोग्य सुविधा मिळणे सुलभ होणार आहे. फक्त माहेगाव देशमुखच नाही तर परिसरातील नागरिकांनाही यांचा फायदा होईल असा विश्वास यावेळी आमदार मा.श्री. आशुतोषदादा काळे यांनी व्यक्त केला.
याप्रसंगी महानंदाचे चेअरमन मा.श्री. राजेश परजणे, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, अप्पर जिल्हाधिकारी सुहास मापारी (अहमदनगर), अप्पर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर (शिर्डी), जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे, प्रांताधिकारी किरण सावंत, प्रांताधिकारी माणिकराव आहेर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय घोगरे, तहसीलदार संदिपकुमार भोसले, गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विकास घोलप, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष डॉ. मच्छिन्द्र बर्डे, छबुराव आव्हाड, कारभारीनाना आगवण, राजेंद्र जाधव, चंद्रशेखर कुलकर्णी, माधवरावज खिलारी, काकासाहेब जावळे, बाबासाहेब कोते, संभाजीराव काळे, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व संलग्न संस्थांचे आजी माजी चेअरमन, व्हा. चेअरमन, संचालक, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी – कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.