संजीवनी ग्रामीण शिक्षण संस्था अध्यक्ष नितीनदादा कोल्हे यांना बाळासाहेब देवराम वाघ मेमो रियल लाईफ टाईम अचीवमेंट अवार्डने गौरवण्यात आले. याबद्दल हार्दिक अभिनंदन..!!!
- संजीवनी ग्रामीण शिक्षण संस्था अध्यक्ष नितीनदादा कोल्हे यांना बाळासाहेब देवराम वाघ मेमो रियल लाईफ टाईम अचीवमेंट अवार्डने गौरवण्यात आले. याबद्दल हार्दिक अभिनंदन..!!!
अभियांत्रिकी शिक्षण क्षेत्रातील भरीव योगदानाची दखल घेत हा पुरस्कार देण्यात आला.
स्वर्गीय सहकार महर्षी श्री.शंकरावजी कोल्हे साहेब यांच्या कुशल व जनहिताचे मार्गदर्शनाखाली संजीवनी इंजिनिअरिंग कॉलेज , पॉलिटेक्निकल कॉलेज, फार्मसी महाविद्यालय, संजीवनी विज्ञान, वाणिज्य कला इंग्रजी व मराठी माध्यम महाविद्यालये, सैनिकी स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, आदिवासी आश्रमशाळा, संजीवनी इंटरनॅशनल स्कूल, महाविद्यालय, आयुर्वेद रुग्णालय, आदी शैक्षणिक व सामाजिक संस्थामध्ये बदलत्या काळानुरुप सर्वोच्च पातळीवरील अत्याधुनिक लवचिक तंत्रज्ञान व विकसित सुविधा व शिक्षण अभ्यासक्रमांचे वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम यशस्वी राबविण्यात संजीवनी शिक्षण संस्था अग्रस्थानी आहे .
*गेल्या चाळीस वर्षापासून अखंडीत व अविरत जिद्दीने स्वबळावर अनेक दैदिप्यमान निर्णय व उपक्रम सहकार महर्षी* *शंकरराव कोल्हे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली संजीवनी उद्द्योग समूहाचे अध्यक्ष बिपीनदादा, कोपरगावच्या पहिल्या महिला आमदार सौ स्नेहलता ताई कोल्हे अमित दादा , सुमितदादा ,विवेक भैय्या, सौ. मनाली कोल्हे यांच्या सहभाग व सहकार्याने श्री.नितीनदादा यांनी केवळ हाती घेतले नाही तर ते दैदिप्यमान यशस्वी करून दाखवले.
याचमुळे संजीवनी शिक्षण समूहाचा ध्वज जागतिक पातळीवर डौलदार पणे ताठ मानेने फडकत आहे. आज राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील विविध नामवंत, विद्यापीठे,शिक्षण संस्थाशी संजिवनीच्या शिक्षण समूहाची संलग्नता दिवसेंदिवस विक्रमी वाढीबरोबर सर्वं पातळीवर सफल,सबल होते आहे.
आज देशातील विनाअनुदानित ग्रामीण व खाजगी संस्थांमध्ये पहिल्या पाच संस्थात समावेश झाला आहे.
याच बरोबर सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक कौटुंबिक बांधिलकी स्विकारण्याची दानत कोल्हे परिवारात असल्याने गेल्या चाळीस वर्षात अशी एकही नैसर्गिक, मानवी आपत्ती, आरोग्य समस्या नाही की संजीवनी उद्योग व शिक्षण समूहाची ताकद पणाला लागली नाही आमचे नितीनदादा म्हणजे आमच्या मित्र परिवाराचे गॉडफादर… या पुरस्काराचा आम्हां मित्र मंडळीला सार्थ अभिमान आहे. सर्वांच्या सुखदुःखात धावणारे सर्वसामान्य नव्हे… सर्व मान्य व्यक्तिमत्व म्हणजेच नितिनदादा !
या पुरस्काराने दादांचेच नव्हे तर पुरस्काराचे महत्त्व वाढले आहे. अशा आमच्या दादांनाव संपूर्ण कोल्हे परिवारास परमेश्वर उत्तम दीर्घायुष्य सर्वोत्तम आरोग्य अखंड सुखसमृद्धीचे जावो व सर्वांच्या शुभहस्ते अतुल्य देशसेवा घडविण्यासाठी सर्वं प्रकारचें बळ व जनसाथ लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना…!!!
आपले नम्र- प्रल्हादराव दंडवते, दिलीपराव कोल्हे, नारायणशेठ अग्रवाल, पोपटराव नरोडे, अशोकराव आढाव, शरदराव घाटे कोपरगाव
अरुण आहेर 🔥 आगन्यूज पोर्टल नेटवर्क ९०९६६६४५३३