कोपरगाव तालुक्यातील विकास कामात अडथळा निर्माण करणाऱ्यांची जिरवायची कशी याची जबाबदारी संपूर्णपणे माझे वर सोपवा :— नाम.राधाकृष्ण विखे
कोपरगाव तालुक्यातील विकास कामात अडथळा निर्माण करणाऱ्यांची जिरवायची कशी याची जबाबदारी संपूर्णपणे माझे वर सोपवा :— नाम.राधाकृष्ण विखे
🔥 आग न्युज पोर्टल नेटवर्क
कोपरगाव :—कोपरगाव तालुक्यात मी आमदार आशुतोष काळे यांच्या बरोबर असून कोपरगाव तालुक्यातील विकास कामाला विरोध करणाऱ्यांची कशी जिरवायची हे काम माझ्यावर सोपवा असे आवाहन नामदार राधाकृष्ण विखे यांनी एका कार्यक्रमात बोलताना केले
संवत्सर येथे उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री राधाकृष्ण एकनाथराव विखे,आमदार मा.श्री. आशुतोष काळे यांच्या पाठपुराव्यातून २२.७८ कोटी रुपये निधीतून बांधण्यात येणाऱ्या ३० खाटांच्या ग्रामीण रुग्णालय व कर्मचारी निवासस्थान इमारतीचे व ८ कोटी रुपये निधीतून करण्यात येणाऱ्या वारी – कान्हेगाव – संवत्सर रस्ता दर्जोन्नतीकरण करणे कामाचे भूमिपूजन आज महसूलमंत्री तथा पालकमंत्री नाम. राधाकृष्ण विखे यांच्या शुभहस्ते व आमदार मा.श्री. आशुतोष काळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले.
यावेळी बोलताना महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांनी आमच्या विरोधकांकडे महसूल मंत्री पद असताना कोपरगाव तालुक्यात औद्योगिक वसाहत का निर्माण केली नाही अशी खंत व्यक्त करून विखे यांनी औद्योगिक वसाहतीची घोषणा राज्य शासनाने केल्यानंतर एकाच मोठ्या आंतरराष्ट्रीय उद्योगामार्फत पाचशे एकर जमिनीची या औद्योगिक वसाहतीत मागणी केली असता आपण यातून किती लोकांना रोजगार निर्माण होईल असा प्रतिसवाल करीत ही मागणी टाळली असल्याचे सांगितले.
महाराष्ट्र शासनाने महिंद्रा आदी विविध कंपन्या मार्फत राहाता आणि कोपरगाव तालुक्यातील युवकांसाठी रोजगार निर्मिती मिळवून देण्यासाठी बांधील असल्याची ठाम ग्वाही दिली.
कोपरगाव व राहाता तालुक्यातून हैदराबाद -सुरत मुंबई -नागपूर समृद्धी व द्रुती महामार्ग लगेच मुंबई आग्रा रोड मुंबई औरंगाबाद आधी राष्ट्रीय महामार्ग दुहेरी रेल्वे मार्ग, आंतरराष्ट्रीय श्रीसाईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळ, देशातील सर्वात मध्यवर्ती पठारी परिसर आदीमुळे हा परिसर देशाला संपूर्णतः मध्यवर्ती असल्याने उद्योग विकासासाठी महत्त्वाचा ठरत असून अल्पावधीत या परिसरात मोठ्या प्रमाणावर विकासात्मक कामे पूर्ण होऊन रोजगार निर्मिती झाल्याशिवाय राहणार नाहीत असा दृढ आत्मविश्वास व्यक्त केला.
यावेळी राष्ट्रीय दुग्ध विकास महामंडळाचे संचालक व महानंदाचे चेअरमन मा.श्री. राजेश परजणे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय घोगरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे श्री वर्पे, वर्षराज शिंदे, गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विकास घोलप, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष डॉ. मच्छिन्द्र बर्डे, माजी नगराध्यक्ष विजयराव वहाडणे, कारभारी आगवण, रविकाका बोरावके, राजेंद्र जाधव, कृष्णा परजणे, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व संलग्न संस्थांचे आजी माजी चेअरमन, व्हा. चेअरमन, संचालक, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ आदी उपस्थित होते.