Breaking
ब्रेकिंग

कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना सभासद गोदावरी खोऱ्यातील अन्यायी पाणी वाटपाविऱोधात उच्च व सर्वोच्च न्यायालयात शेवट पर्यंत लढणार

0 0 1 4 1 6

कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना सभासद गोदावरी खोऱ्यातील अन्यायी पाणी वाटपाविऱोधात उच्च व सर्वोच्च  न्यायालयात शेवट पर्यंत लढणार

कोपरगाव:-     कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना सभासद गोदावरी खोऱ्यातील अन्यायी पाणी वाटपाविऱोधात उच्च व सर्वोच्च  न्यायालयात शेवट पर्यंत लढणार असून**राज्य शासनाने नेमलेल्या अभ्यास समिती अहवालानुसार जोपर्यंत दोन्ही न्यायालये यासंदर्भात अंतिम निकाल* *देत नाही तोपर्यंत मेंढेगिरीअहवालानुसार सध्या दिली जाणारी पाणी वाटप व्यवस्था* *स्थगित करावी*
*गतवर्षा प्रमाणे या वर्षाचा गळीत हंगाम धोक्यात तर* *पुढील वर्षी पुरेशा उसाअभावी गळीत हंगाम बंद रहाण्याची दाट शक्यता*
*केंद्र सरकारने २०२३-२४  या* *हंगामातील गळीत हंगामात ऊसाचे खरेदी भावात गतवर्षापेक्षा प्रतीटनी १०० रूपये जादा* *भाव दिला हे गौरवास्पद असून* *याच बरोबर साखर व उपपदार्थ विक्री भाववाढीत तातडीने योग्य दिलासा द्यावा*
*यावर्षी साखर कारखाना   कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना अत्याधुनिक* *तंत्रज्ञान नुतनीकरणामुळे प्रतिदिनी ६००० टन ऊस गाळपासाठी सज्ज

शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना अध्यक्ष व आमदार आशुतोषकाळे

🔥 *आग न्यूज पोर्टल नेटवर्क*
*कोपरगाव* :-  नगर – नासिक जिल्ह्यातील जनतेसाठी उद्योग , कृषी, सर्वांगीण विकास , पिण्याचे पाण्यासाठी गोदावरी खोऱ्यातील सध्या  होणारे पाणी वाटप या परिसराला कायमस्वरूपी उध्वस्त करणारे असल्याने  आम्ही सतत केलेल्या पाठपुराव्यामुळे विद्यमान राज्य शासनाने ऑगस्ट २०२३ मध्ये सध्याचे गोदावरी खोऱ्यातील जायकवाडी धरणात सोडाव्या लागणाऱ्या अन्यायी पाणी वाटपा संदर्भात  नवीन पाणी वाटप अभ्यास समिती नेमली. या समितीने सध्याच्या पाणी वाटप पध्दतीचे पूर्नावलोकन केल्यावरच विविध शंका उपस्थित करीत मेंढेगिरीअहवालानुसार होत असलेल्या पाणी वाटपाचा सखोल अभ्यास करावा लागेल. असे मत व्यक्त केले आहे.
यापूर्वी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांनी उच्च आणि सुप्रीम न्यायालयात दाखल करण्यात आलेले दावे प्रलंबित आहे . या दोन्ही न्यायालयात कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना सभासद शेवटपर्यंत अन्यायी मेंढेगिरीअहवालानुसारच्या पाणी वाटपा विरोधात लढणार  असल्याची ठाम ग्वाही कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना अध्यक्ष व आमदार आशुतोष काळे यांनी दिली
या दोन्ही दाव्यात आमच्या पाठपुराव्यामुळे राज्य शासनाने गोदावरी खोऱ्यातील पाणी वाटप अभ्यास समिती नेमली या समितीने पाणी वाटप पध्दतीचे अवलोकन करताना ह्या पाणी वाटप पध्दतीचे नियोजनाबाबत विविध प्रकारच्या शंका उपस्थित करून अभ्यास समिती सखोल अभ्यासातून आपला अंतिम अहवाल सादर करण्याचे संकेत दिले आहेत  याअभ्यास समितीच्या अहवालावर आधारित दोन्ही न्यायालयातील सुनावणी पूर्ण झाल्यानंतर जोपर्यंत उच्च व सर्वोच्च न्यायालये आपले अंतिम निकाल देत नाही तोपर्यंत नगर नासिक जिल्ह्यावर अन्याय करणाऱ्या मेंढेगिरीअहवालानुसार जायकवाडी धरणात सोडाव्या लागणाऱ्या सध्याचे पाणी वाटप पध्दतीस स्थगिती देण्यात यावी याविरोधी मागणीसाठी सभासद तातडीने न्यायालयात जाणार असल्याची माहिती कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना अध्यक्ष व आमदार आशुतोष काळे यांनी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे ७० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्षपदावरून बोलताना दिली.
याप्रसंगी  बोलताना आम. काळे पुढे म्हणाले,
माजी राज्यमंत्री , माजी खासदार आणि माजी अध्यक्ष स्व. शंकरराव काळे व माजी आमदार व माजी अध्यक्ष अशोक काळे यांचे अत्याधुनिक तंत्रज्ञान व विकसित साखर कारखाना उभारण्याची स्वप्न पूर्ती सभासदांच्या त्यागामुळे आपण दोन वर्षात करण्या्त  यशस्वी झालो असल्याने यावर्षी प्रतिदिनी ६००० टन ऊस गाळपासाठी कारखाना सज्ज झाला आहे. याकरिता ऊस उत्पादकांनी स्वत:सह व इतरांचा ऊस गाळपासाठी आणुन सहकार्य करण्याचे आवाहन केले
पंतप्रधान नाम.नरेंद्र मोदी व केंद्रीय सहकार मंत्री नाम. अमित शहा यांनी साखर कारखाना आयकर संदर्भात  कायमस्वरूपी योग्य निर्णय घेऊन ७५०० कोटी रुपये माफ केल्याबद्दल आपण विरोधी पक्षात असतांनाही कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या जाहीर कार्यक्रमात  त्यांचे विषयी मनात कोणताही आकस न बाळगता ऊस उत्पादक व साखर कारखान्याचे वतीने  दोघांचे  जाहीर आभार मानले परंतू राज्यभर विरोधकांनी गदारोळ उठवला. पण मी योग्य ते केले असल्याने मी ठाम राहिलो.
केंद्र सरकारने सन२०२३-२४ मधील  गळीतास आलेल्या ऊस खरेदी भावात  गतवर्षापेक्षा प्रतीटनी १००रूपये दिलेली वाढ गौरवास्पद आहे याचं बरोबर केंद्र सरकारने सलग तीन वर्षे अडचणीत असलेल्या साखर कारखाना साखर व उपपदार्थ विक्रीत योग्य वाढ करावी अशी कळकळीची विनंती कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना अध्यक्ष व आमदार आशुतोष काळे यांनी  केली
याशिवाय गतवर्षी अती पावसाने महाराष्ट्रात शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. तर यावर्षी तीन महिने पाऊस नसल्याने खरिप हंगामातील हातचे पीक वाया गेले. अशीच परिस्थिती साखर कारखान्यांची झाली .अती पावसाने ऊस तोडणी अशक्य झाली. मनुष्य बळ घटले, वहातूक  समस्या वाढल्याने ऊसतोड  लाबंली. गळीताची संपूर्ण  तयारी असूनही साखर कारखान्यांचा गळीत हंगाम लांबला. याकाळात वेळेवर ऊस तोडणी न झाल्याने ऊस वजन वाढ झाली तर दुसरीकडे साखर उतारा मोठ्या प्रमाणात घटला,  तर गळीत हंगाम नियोजित मुदती अगोदर थांबला. या कारणांमुळे साखर कारखाने अत्यंत आर्थिक तोट्यात गेले.
अशा भयानक परिस्थितीत कर्मवीर शंकरराव काळे सहकारी  साखर कारखान्याने ऊस  उत्पादकांना सन २०२२-२३ मधील ऊस खरेदी दरइतरांपेक्षा जादा स्वरूपात वेळेच्या आत दिला.  ऊसाला प्रतीटनी २५००/-  रुपये जादा भाव दिला तसेच दुष्काळी परिस्थितीत सभासदांना खरीप लागवड व मुलांना शैक्षणिक खर्चासाठी २२५रूपये दिले सन२०११-१२मध्ये ऊस गळीतात पूर्वगळीत हंगाम पोटी कपात केलेल्या ५०रूपये ठेवीची रक्कम तातडीने दिवाळी पूर्वी दिली जाणार आहे
गत वर्षी प्रचंड ऊस उत्पादन झाले. परंतु ऊस तोडणी पुरेशी वेळेवर न झाल्याने ऊस वजन वाढले आणि साखर उतारा घटला यामुळे साखर कारखाने तोट्यात गेल्यावर साखर कारखाने नियोजित मुदतीपूर्वी  सर्वं संमतीने ऊस  गाळप थांबवण्यात आले.
या वर्षी दुष्काळी परिस्थितीत ऊस उपलब्धता व लागवड कमी होणार असल्याने याही वर्षी साखर कारखाने कमी मुदतीत चालविली जातील या सर्व परिस्थितीत २०२४- २५च्या गळीत हंगाम साखर कारखान्यांना आवश्यक ऊस उत्पादन  होणारं नसल्याने बंद रहाणार  असल्याची भिती आमदार आशुतोष काळे यांनी बोलताना व्यक्त केली
.यावेळी माजी आमदार व कारखान्याचे माजी अध्यक्ष अशोक काळे,विद्द्यामान उपाध्यक्ष डॉ. मच्छिन्द्र बर्डे, माजी संचालक बाळासाहेब कदम, विश्वासराव आहेर, पद्माकांत कुदळे, डॉ.  चंद्रशेखर कुलकर्णी, कारभारीनाना आगवण, काकासाहेब जावळे, बाबासाहेब कोते, नारायणराव मांजरे, अॅड.आर.टी. भवर, संभाजीराव काळे, कचरू घुमरे, संचालक सूर्यभान कोळपे, सुधाकर रोहोम, राजेंद्र घुमरे, सचिन चांदगुडे, अनिल कदम, दिलीपराव बोरनारे, श्रीराम राजेभोसले, अॅड. राहुल रोहमारे, प्रवीण शिंदे, शंकरराव चव्हाण, अशोक मवाळ, सुनील मांजरे, मनोज जगझाप, वसंतराव आभाळे, दिनार कुदळे, शिवाजीराव घुले, गंगाधर औताडे, श्रावण आसने, सौ. वत्सलाबाई सुरेश जाधव, सौ. इंदूबाई विष्णू शिंदे, आदींसह सर्व संलग्न संस्थांचे चेअरमन, व्हा. चेअरमन, संचालक, पदाधिकारी, माजी जिल्हा परिषद सदस्य, माजी पंचायत समिती सदस्य, माजी नगरसेवक, कारखान्याचे प्रभारी कार्यकारी संचालक सुनील कोल्हे, आसवनीचे विभागाचे जनरल मॅनेजर ज्ञानेश्वर आभाळे, सेक्रेटरी बी.बी. सय्यद, असि. सेक्रेटरी संदीप शिरसाठ, कारखान्याचे सर्व विभागप्रमुख, अधिकारी, पत्रकार व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 1 4 1 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे