एस. जी. एम. कॉलेजमधील रयत सेवकांचा सेवापूर्ती सत्कार समारंभ संपन्न…..
संपादक : अरुण आहेर
एस. जी. एम. कॉलेजमधील रयत सेवकांचा सेवापूर्ती सत्कार समारंभ संपन्न…..
🔥 आग न्यूज पोर्टल
कोपरगाव : येथील रयत शिक्षण संस्थेच्या, एस. एस. जी. एम. कॉलेजमधील प्र. प्राचार्य डॉ.रमेश सानप तसेच व्यवसाय अभ्यासक्रम विभागातील प्रा. वसंत कातोरे, द्विलक्षी अभ्यासक्रम विभागातील प्रा. राजेंद्र साळुंखे हे प्राध्यापकसेवक नियत वयोमानाप्रमाणे व शासकीय नियमाने ३१ मे २०२४ रोजी सेवानिवृत्त होत आहेत. प्राध्यापकांच्या उन्हाळी सुट्ट्या आणि निवडणूक २०२४ ची कामे यामुळे या सेवकांचा सेवापूर्ती सत्कार समारंभ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालय विकास समितीचे भूतपूर्व सदस्य मा.छबुराव आव्हाड हे होते.
प्रमुख अतिथी म्हणून महाविद्यालय विकास समितीचे सदस्य मा.महेंद्रकुमार काले हे उपस्थित होते. तसेच मा. हिरालाल महानुभाव यांची विशेष उपस्थिती लाभली होती. या मान्यवरांच्या शुभहस्ते तीनही सत्कारमूर्तींचा सपत्नीक स्नेहवस्त्र,मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन महाविद्यालय सेवक कल्याण समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला. सदर कार्यक्रमाच्या सत्कारमूर्तींना रयत शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष व महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन मा.अॅड. भगीरथ शिंदे आणि महाविद्यालय विकास समितीच्या सर्व सदस्यांनी शुभेच्छा पाठविल्या.
या प्रसंगी मनोगत व्यक्त करताना प्रमुख अतिथी महेंद्र कुमार काले यांनी, उत्तम सेवापूर्ती सत्कार समारंभ उत्तमप्रकारे आयोजित केल्याबद्दल सेवक कल्याण समितीला धन्यवाद दिले. तसेच प्र. प्राचार्य डॉ. आर. आर. सानप यांनी अहोरात्र आपला वेळ देऊन, दीर्घ काळाचा विचार करून महाविद्यालयीन कामाला न्याय दिला, याचा उल्लेख करून त्यांच्या नेतृत्वाने महाविद्यालयाला मिळालेल्या A++ या मानांकनाचे श्रेयही त्यांना दिले. महाविद्यालयाला उच्चतम असा सन्मान प्राप्त करून दिल्याबद्दल त्यांचे तसेच सर्व सहकाऱ्यांचे त्यांनी विशेष अभिनंदन केले.