आंतरराष्ट्रीय पातळीवरील इफको सहकारी खत आणि बिज निर्मिती प्रकल्पाने देशातील ग्रामीण आणि कृषी क्षेत्रातील स्वावलंबनात 50 वर्षें सलग दिलेले योगदान निश्चित अव्वल दर्जाचे – केंद्रीय गृहमंत्री व सहकार मंत्री नामदार अमित शहा
संपादक - अरुण आहेर

आंतरराष्ट्रीय पातळीवरील इफको सहकारी खत आणि बिज निर्मिती प्रकल्पाने देशातील ग्रामीण आणि कृषी क्षेत्रातील स्वावलंबनात 50 वर्षें सलग दिलेले योगदान निश्चित अव्वल दर्जाचे – केंद्रीय गृहमंत्री व सहकार मंत्री नामदार अमित शहा
🔥 आग आणि दैनिक गणेश श्रध्दा न्यूज पोर्टल
कोपरगांव – देशातील आंतरराष्ट्रीय पातळीवरील इफको सहकारी कृषी उद्योग समूहाने गत 50 वर्षात कृषी प्रधान भारत देशातील ग्रामीण कृषी आणि सहकारी क्षेत्रात दिलेले योगदान निश्चित अव्वल दर्जाचे असल्याचे गौरवोद्गार केंद्रीय गृहमंत्री व सहकार मंत्री नामदार अमित शहा यांनी इफ्कोच्या (IFFCO) मुख्य युनिट व पहिले यूरिया प्रकल्प असलेल्या कलोल, गुजरात येथील सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित केलेल्या एका भव्य व ऐतिहासिक कार्यक्रमात बोलताना काढले.
याप्रसंगी नामदार अमित शहा यांच्या शुभहस्ते संस्थेच्या बीज संशोधन केंद्राचे विस्तारीत इमारतीची पायाभरणी शुभारंभ व संस्थेचा सुवर्ण महोत्सवी कर्तव्य पूर्ती सोहळा केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री नामदार अमित शहा यांच्या शुभहस्ते पार पडला.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने पुढे बोलताना केंद्रीय गृहमंत्री व सहकार मंत्री नामदार अमित शहा यांनी इफकोचे हे संशोधन केंद्र कृषी क्षेत्रातील नाविन्यपूर्ण संशोधनास चालना देणारे असून शाश्वत व समृद्ध शेतीसाठी आधुनिक, गुणवत्तापूर्ण बियाण्यांच्या उत्पादनात क्रांतिकारक ठरणार असून इफ्कोच्या सहकारी धोरणाचे कौतुक करताना, सहकाराच्या माध्यमातून देशाच्या कृषी स्वावलंबनात इफ्कोचे योगदान महत्त्वाचे असल्याचे गौरवोद्गार काढले .
गुजरात राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. भूपेन्द्रभाई पटेल विशेष अतिथी म्हणून सहभागी झाले.
इफ्कोचे अध्यक्ष मा. श्री. दिलीपभाई संघाणी यांनी इफ्कोच्या पन्नास वर्षांच्या कार्याचा आढावा घेतांना सहकार चळवळीतील यशस्वी वाटचाल, आणि भविष्यातील संशोधनात्मक दिशांचे सखोल वर्णन केले.
तसेच कलोल प्रकल्प हा इफ्कोच्या इतिहासातील केवळ एक प्रकल्प नसून, सहकार तत्त्वज्ञानावर आधारित आत्मनिर्भर भारताच्या स्वप्नातले एक प्रभावी पाऊल आहे.म्हणूनच सुवर्ण महोत्सव व नव्या संशोधन केंद्राची सुरुवात ही नव्या उंचीच्या दिशेने सुरू झालेली वाटचाल,असल्याची ठाम ग्वाही दिली