Breaking
ब्रेकिंग

समता पतसंस्थेने ठेवीदारांची विश्वासार्हता जपली -सिने अभिनेता मकरंद अनासपुरे

0 0 1 1 6 3

समता पतसंस्थेने ठेवीदारांची विश्वासार्हता जपली -सिने अभिनेता मकरंद अनासपुरे

🔥 आगन्युज पोर्टल नेटवर्क

कोपरगाव : —
समता लिक्विडिटी बेस्ड स्कीम अंतर्गत ठेवीदारांच्या १०० टक्के ठेवी सुरक्षित असून संस्थेचे संस्थापक काका कोयटे यांनी संस्थेचे सभासद, ठेवीदारांशी जपलेली विश्वासार्हता आणि संस्थेच्या आर्थिक प्रगतीमध्ये असलेल्या त्यांच्या योगदानामुळे मी समता पतसंस्था आणि सुधन गोल्ड लोनच नाही तर समता परिवारासोबत जोडला गेलो असल्याचे मराठी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध सिने अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी सांगितले.


समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या राहाता शाखेने १०० कोटी रुपये ठेवी व २५ कोटी रुपये सोनेतारण कर्ज उद्दिष्टपूर्तीबद्दल सिने अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्या प्रमुख उपस्थितीत राहता व शिर्डी शाखेच्या ग्राहकांचा सन्मान सोहळा उत्साहात संपन्न झाला. त्या वेळी राहाता व शिर्डी शाखेच्या सभासद व ग्राहकांसोबत संवाद साधताना ते बोलत होते.


कार्यक्रमाची सुरुवात प्रल्हाद दंडवते, सतीश वैजापूरकर, लता डांगे, मुकुंद नाना सदाफळ, भाऊसाहेब जेजुरकर, दिलीप गाडेकर, रघुनाथ बोठे, अनिलशेठ पिपाडा, देविदास मते, संजय घाडगे, सोपान सदाफळ या राहाता व शिर्डी शाखेच्या ग्राहकांच्या हस्ते व संस्थेचे चेअरमन ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांच्या अध्यक्षतेखाली दिप प्रज्वलन करून करण्यात आली.


समता पतसंस्थेचे संचालक मंडळाच्या हस्ते मकरंद अनासपुरे यांचा सत्कार करून सन्मान करण्यात आला. तसेच राहाता व शिर्डी शाखेने केलेल्या ठेवी व छत्रपती संभाजीनगर व येवला शाखेने केलेल्या सोनेतारण कर्ज उद्दिष्टपूर्तीबद्दल प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या सोहळ्यात उपस्थित प्रत्येक ग्राहकाचे समता महिला बचत गटाने तयार केलेला अगरबत्ती व कापूर एकत्र करून तयार केलेला गुच्छ देऊन स्वागत करत सत्कार करण्यात आला. ग्राहक सन्मानाबरोबरच सुधन गोल्ड लोनने प्रसिध्द गायक प्रमोद सरकटे व प्रख्यात गायिका डॉ.गौरी कवी यांच्या स्वरराज म्युझिकल ऑर्केस्ट्राद्वारा सुमधुर मराठी व हिंदी गीतांची मेजवानी दिली.


संस्थेचे संचालक संदीप कोयटे यांनी चित्रफितीच्या माध्यमातून ‘समता लिक्विडिटी बेस्ड प्रोटेक्शन स्कीम’ विषयी सविस्तर माहिती देऊन समताने ठेवीदारांचा विश्वास संपादन केला असल्याचे सांगत संस्था १ हजार कोटी रुपयांच्या ठेवींचा टप्पा पार करणार आहे. समताने सुधन गोल्ड लोन द्वारा सोनेतारण कर्ज वाटप करून नवनवीन विक्रम प्रस्थापित केले असून अधिकाधिक सोनेतारण कर्ज वितरित करणार आहे. तसेच सुधन गोल्ड लोनने ही महाराष्ट्रासह बाहेरील राज्यातही विविध पतसंस्थांच्या माध्यमातून सोनेतारण कर्ज वाटप केले असून प्रामाणिकपणे सेवा देऊन इतर कर्ज देणाऱ्या कंपन्यांपेक्षा सोनेतारण कर्जदारांची १३० कोटी रुपयांची बचत केली आहे.


अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना काका कोयटे म्हणाले की, समतात सभासद, ग्राहकांनी ठेवलेले पैसे आमचे नसून ठेवीदारांचे, सभासदांचे आहे. त्या पैशांना पूर्णपणे संरक्षण दिले पाहिजे. ही आमची जबाबदारी असून ती आम्ही पूर्णपणे सांभाळत आहोत. पतसंस्थांच्या ठेवीदारांच्या ठेवींना १०० टक्के संरक्षण देता येते. हे समताने सिद्ध केले असून एक आदर्श महाराष्ट्र राज्यातील पतसंस्था चळवळी समोर ठेवला आहे.


कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संस्थेचे संचालक संदीप कोयटे यांनी केले. ग्राहक सन्मान सोहळा यशस्वीतेसाठी राहाता शाखा शाखाधिकारी मिलिंद बनकर व शिर्डी शाखा शाखाधिकारी सतीश जेजुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली राहाता व शिर्डी शाखेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांसह संस्थेच्या इतर शाखेतील शाखाधिकारी, अधिकारी कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.


या वेळी भाजप नेते राजेंद्र पिपाडा व नगराध्यक्षा ममता पिपाडा, मल्टीस्टेट फेडरेशन संचालक शिवाजी आप्पा कपाळे, साई आदर्श पतसंस्था चेअरमन संगीता कपाळे, राहाता फेडरेशनचे अध्यक्ष राजेंद्र वाबळे, उपाध्यक्ष साहेबराव निदाने, राहाता पीपल्स अध्यक्ष भाऊसाहेब चौधरी, साई अरिहंत पतसंस्था चेअरमन सतीश गंगवाल, साई नागरी पतसंस्था चेअरमन अशोक कोते, साई संस्थान को-ऑप क्रेडिट सोसायटी चेअरमन विठ्ठलराव पवार, माजी जिल्हा परिषद सदस्य नितीन कापसे, श्री गुरुदेव दत्त पतसंस्था चेअरमन पुखराज पिपाडा, नवनाथ पतसंस्था चेअरमन धनंजय गाडेकर, डॉ.के.वाय.गाडेकर धन्वंतरी पतसंस्था चेअरमन स्वाधीन गाडेकर, यशवंत पतसंस्था चेअरमन भास्कर फणसे, श्री स्वामी समर्थ महिला पतसंस्था अध्यक्षा अंजली सदाफळ, कोपरगाव नगरपालिका माजी नगराध्यक्षा सुहासिनी कोयटे, समता इंटरनॅशनल स्कूल कार्यकारी विश्वस्त स्वाती कोयटे आदी प्रमुख मान्यवरांसह संस्थेचे संचालक अरविंद पटेल, चांगदेव शिरोडे, राज कुमारजी बंब, गुलशन होडे, जनरल मॅनेजर सचिन भट्टड, मुख्य कार्यालयाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. उपस्थितांचे आभार शाखाधिकारी मिलिंद बनकर यांनी मानले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 1 1 6 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे