*महसूलमंत्री व जिल्हा पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे व आमदार आशुतोष काळे शुभहस्ते समाज आमरण उपोषण सोडले.*
🔥 *आग न्यूज पोर्टल नेटवर्क*
*कोपरगाव*:- :-मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मागील ५ दिवसांपासून कोपरगाव येथे आमरण उपोषण करणाऱ्या उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावल्यामुळे आज आमदार मा.श्री. आशुतोषदादा काळे यांनी मराठा समाजाच्या शिष्टमंडळासह जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महसूलमंत्री मा.ना.श्री. राधाकृष्ण विखे यांची भेट घेऊन या उपोषणाची तातडीने दखल घेण्याची विनंती केली.
सदर विनंतीची दखल घेऊन मा. मंत्री महोदयांनी लगेच उपोषणस्थळी भेट दिली. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सरकार सकारात्मक असून त्यासाठी सर्व प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिल्यानंतर उपोषणकर्त्यांनी परमपूज्य श्री. रमेशगिरी महाराज व मा.ना.श्री. राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या हस्ते पाणी पिऊन उपोषण सोडले.
यावेळी उपोषणकर्ते ॲड. योगेश खालकर, अनिल गायकवाड, विनय भगत, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, महानंदाचे अध्यक्ष राजेश परजणे, माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे, पोलीस अधीक्षक राकेश ओला, प्रांताधिकारी माणिक आहेर, पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके, तहसीलदार संदीप भोसले, पोलीस निरीक्षक वासुदेव देसले, प्रदीप देशमुख आदींसह कोपरगाव तालुका सकल मराठा समाज समितीचे सदस्य, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.