माजी आमदार सौ स्नेहलता कोल्हे यांनी मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस व उद्योग मंत्री नामदार उदय सामंत यांच्याकडे केलेल्या विशेष प्रयत्नातून कोपरगांव -शिर्डी औद्द्योगिक* *वसाहतीत टाटा टेक्नॉलॉजी संचलित अत्याधुनिक प्रशिक्षण केंद्रास मंजुरी

माजी आमदार सौ स्नेहलता कोल्हे यांनी मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस व उद्योग मंत्री नामदार उदय सामंत यांच्याकडे केलेल्या विशेष प्रयत्नातून कोपरगांव -शिर्डी औद्द्योगिक वसाहतीत टाटा टेक्नॉलॉजी संचलित अत्याधुनिक प्रशिक्षण केंद्रास मंजुरी
अरुण आहेर 🔥 आग आणि दैनिक गणेश श्रध्दा न्यूज पोर्टल/ ९०९६६६४५३३/ arun aher4321@gmail.com/arun aher0312@gmail.com
कोपरगाव :- माजी आमदार सौ स्नेहलता कोल्हे यांनी मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस व उद्योग मंत्री नामदार उदय सामंत यांच्याकडे केलेल्या विशेष प्रयत्नातून
कोपरगाव-शिर्डी औद्योगिक वसाहतीत सेंटर फॉर इनोव्हेशन, इन्क्युबेशन ॲन्ड ट्रेनिंग या धर्तीवर टाटा टेक्नॉलॉजी संचलित अत्याधुनिक औद्योगिक तंत्रज्ञान विकसित आर्टिफिशियल इन्टेलिजन्स (A.I) , आणि स्टार्ट अप संस्कृती बाबत प्रगत शिक्षण सुविधा निर्माण करणारे प्रशिक्षण केंद्र उभारणीस निधी सह मंजुरी देण्यात आली आहे.

यामुळे युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांनी मांडलेली भूमिका सार्थ ठरत आहे

कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी-शिर्डी परिसरात औद्योगिक विकासाच्या दिशेने ऐतिहासिक पाऊल टाकण्यात आले आहे . हा उपक्रम कोपरगाव-शिर्डी परिसरातील युवकांसाठी रोजगार आणि कौशल्यवृद्धीचे नवे दालन ठरणार आहे.अशा प्रकाराचे प्रशिक्षण केंद्र व्हावे यासाठी विवेकभैय्या कोल्हे यांनी अनेकदा भूमिका मांडली होती तसा पाठपुरावा विवेकभैय्या कोल्हे आणि स्नेहलताताई कोल्हे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडे केला होता

. स्थानिक युवकांना उद्योगक्षेत्राशी थेट जोडून आत्मनिर्भरतेचा नवा आदर्श या केंद्रातून उभा राहील, असा विश्वास सौ. स्नेहलताताई कोल्हे यांनी व्यक्त केला होता.स्थानिक युवकांना रोजगार मिळावा यासाठी विवेकभैय्या कोल्हे यांनी संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या वतीने दहा हजार स्वाक्षरी मोहीम राबवत सोनेवाडी शिर्डी एमआयडीसी केलेल्या मागणीमुळे मंजूर झाली त्यात युवकांना रोजगार मिळणे शक्य झाले आहे.

यापूर्वी ‘डिफेन्स क्लस्टर’ प्रकल्पाला राज्य सरकारकडून मान्यता मिळालेली आहे. विमानतळ, समृद्धी महामार्ग, आधुनिक वाहतूक आणि निवास सुविधा यांमुळे या भागात देशी-विदेशी गुंतवणुकीसाठी अनुकूल वातावरण तयार झाले आहे. या पार्श्वभूमीवर उभारण्यात येणारे हे प्रशिक्षण केंद्र केवळ औद्योगिक विकासच नव्हे, तर स्थानिक उद्योग-व्यवसाय वृद्धिंगत करण्यास देखील हातभार लावणार आहे . राज्यात गेल्या काही महिन्यांत अनेक प्रशिक्षण केंद्रांना मंजुरी देण्यात आली असून, त्याच धर्तीवर सोनेवाडी शिर्डीच्या औद्योगिक वसाहतीसाठी मंजूर झालेले हे केंद्र ठरणार आहे. या दूरदृष्टीपूर्ण निर्णयामुळे कोपरगाव-शिर्डी क्षेत्र नव्या औद्योगिक युगाचे प्रवेशद्वार ठरेल.

या महत्वपूर्ण मागणीसाठी त्वरित सकारात्मक प्रतिसाद देऊन मंजुरी दिल्याबद्दल मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योगमंत्री मा. उदय सामंत यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करत, सौ. स्नेहलताताई कोल्हे व विवेकभैय्या कोल्हे यांनी या प्रशिक्षण केंद्रामुळे स्थानिक युवकांना रोजगाराच्या असंख्य संधी उपलब्ध होतील असा विश्वास व्यक्त केला आहे.






