कडवी जिद्द, अविरत परिश्रम व सातत्याने मानवांचे जीवन सार्थकी :– प्राचार्य डॉ. बी. एस यादव
कडवी जिद्द, अविरत परिश्रम व सातत्याने मानवांचे जीवन सार्थकी :– प्राचार्य डॉ. बी. एस यादव
🔥 आग न्युज पोर्टल नेटवर्क
कोपरगाव :— संघर्ष सातत्य, व जिद्दी परिश्रमातूनच कायमस्वरूपी मानवी विकास घडतो.या विकासाला कमीत कमी श्रम, आणि योग्य मार्गदर्शनातून यशस्वी लाभ मिळविण्यासाठी संपर्किय संवाद, अभास्यु सखोल, सर्वांगीण वाचनाला साध्य केल्यास सहजपणे कोणत्याही परिस्थितीतील संघर्ष, स्पर्धेवर मात करता येत असल्याची ठाम ग्वाही प्राचार्य डॉ बी एस यादव यांनी एका समारंभात बोलताना दिली.
कोपरगांव तालुका एज्युकेशन सोसायटी संचलित के.जे. सोमैया (वरिष्ठ) व के.बी.रोहमारे (कनिष्ठ) महाविद्यालयात अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या वतीने नुकतीच स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेचे उदघाटन पोलीस उपनिरीक्षक व महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी मा.विजय सरवार, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.एस. यादव, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक प्रो. विजय ठाणगे इत्यादी मान्यवरांच्या शुभहस्ते संपन्न झाले.
यावेळी मा. विजय सरवार यांनी विद्यार्थ्यांना विविध स्पर्धा परीक्षेंची माहिती देतांनाच महाविद्यालयीन शिक्षण घेत असणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपली गुणवत्ता व क्षमता ओळखून प्रचंड जिद्दीने स्पर्धा परीक्षांना सामोरे जावे असे सांगितले.
सातत्यपूर्ण परिश्रम केल्यास यश निश्चित मिळते असेही त्यांनी यावेळी नमूद केले. अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक प्रो.विजय ठाणगे यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात महाविद्यालयाच्या स्पर्धा परीक्षा विभागाद्वारे विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली.
स्पर्धा परीक्षा विभागाचे समन्वयक डॉ. व्ही. एस. साळुंके यांनी प्रास्तविकात मान्यवरांचा परिचय करून देतानांच या कार्यशाळेचा उद्देश नमूद केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. रवींद्र जाधव यांनी तर आभार प्रा.सदाशिव नागरे यांनी मानले. सदर कार्यशाळेसाठी महाविद्यालयातील प्राध्यापक व बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.