रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी सदस्यपदी संदीप वर्पे यांचा महात्मा फुले समता परिषदेने केला यथोचित सत्कार..!
अकोले / प्रतिनिधी
सामाजिक व राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय काम करणारे कोपरगावचे सुपुत्र तथा राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे यांची रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी सदस्यपदी नुकतीच निवड झाली आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे यांनी राजकीय, सामाजिक कार्यासह शैक्षणिक क्षेत्रातही कामाचा वेगळा ठसा उमटविला आहे. याची दखल घेत त्यांची आशिया खंडातील सर्वात मोठ्या रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी सदस्यपदी निवड केली आहे. याबद्दल त्यांचा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे प्रांतिक सदस्य व माजी नगराध्यक्ष पद्माकांत कुदळे यांनी यथोचित सत्कार केला. याप्रसंगी सर्वश्री माळी बोर्डिंगचे अध्यक्ष बाळासाहेब पांढरे, प्रगत बागायतदार सोसायटीचे संचालक बाबा रासकर, महात्मा फुले समता परिषदेचे तालुकाध्यक्ष संतोष (बापू) वढणे, मच्छिन्द्र मालकर, बाबासाहेब मालकर, विक्रांत रासकर आदी उपस्थित होते. याचबरोबर सर्वच क्षेत्रांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.